सावित्रीबाईंनी शैक्षणिक कार्यातच आमूलाग्र बदल न करता इतरही कार्यात मोठया हिरीरीने पुढाकार घेतला. केशवपन, बालविवाह विधवाविवाह, सती चाल यादी कार्यात त्यांनी सिंहाचा वाटा बजावला. बालहत्या प्रतिबंध गृह स्थापन केल्यावर त्यांनी स्वतःच्या मुलांप्रमाणे सर्वर बालकांची सेवा केली, स्वतःला बोचणारे अपत्यहीनपणाचे दुःख पळवून लावण्यासाठी त्यांनी यशवंत नावाच्या मुलास दत्तकही घेतले त्यांच्या या मानवतावादी कार्याबददल सुधारक लोकांनी तोंडभरून स्तूती केली.
सामाजिक क्रांतीची अग्रदूत लोकमाता सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतल्यास त्या प्रतिभाशाली कवयित्री, प्रभावशाली शिक्षिका, निस्वार्थी व धडाडीच्या समाजसेविका, स्त्री-पुरुष समानतेच्या प्रणेत्या होत्या तसेच स्त्री प्रतिष्ठा वाढविणा-या लोकनेत्याही होत्या. महात्मा फुलेंच्या विचारांची ज्योत तेवत ठेवणा-या पणती मवाल्यांसाठी कर्दनकाळ होत्या. त्या ख-या अर्थाने काळाची पावले ओळखणा-या एक दूरदृष्टी खंबीर, कर्तबगार लोकमाता होत्या. अशा या आदयक्रांतीचा जन्म ३ जानेवारी 1831 रोजी सातारा जिहयातील खंडछाळा तालुक्यातील नायगांव येथे झाला. तो काळ म्हणजे एकोणिसावे शतक पेशव्यांच्या काळात स्त्री आणि शुद्र यांना पशुपेक्षाही करूण आणि दारुण वागणूक देणारा काळ. स्त्री म्हणजे नरकद्वार, स्त्री अशा या महाभयंकर काळात कुणीतरी समाजाला दिशा देणारा, मायेची ऊब देऊन योग्य वाटेने चालते करणारा जन्माला यावा लागतो. त्याचा भाग म्हणून सावित्रींनी जन्म घेतला. त्या जन्मत:च सौदामिनीप्रमाणे तेजस्वी व सुंदर कन्या होत्या चरित्र नायिका युगस्त्री, क्रांतीज्योती होत्या.
सावित्रीबाई फुले ह्या बालपणापासूनच धीट नि तल्लख बुद्धीच्या होत्या. धैर्य, शौर्य, न्याय, नीती आदी लोकोत्तर गुण सावित्रीच्या स्वभावात लहानपणीच झळकू लागले. सात वर्षाची कन्या सुस्वरूप व बांधेसूद होती. त्याकाळी सात वर्ष म्हणजे स्त्रीचे लग्नाचे वय समजले जायचे हा विचार करून खंडोजी पाटलांनी जोतिबाशी सावित्रीचा विवाह १८४० साली मोठ्या थाटामाटात लावून दिला. त्यावेळी ज्योतिबाचे वय केवळ १३ वर्ष आणि सावित्रीचे वय ९ वर्षे होते.
सावित्रीबाई ह्या चुणचुणीत व धाडसी स्वभावाच्या होत्या. गोरगरीबांची सेवा करण्याची त्यांना लहानपणापासूनच अतिशय तळमळ होती पण समाजसेवेसाठी प्रत्येक माणसाला शिक्षणाची गरज असते याची जाणीव त्यांना लगेच झाली. त्यांच्या मनात सतत शिक्षणाचा ध्यास लागला होता म्हणून त्यांनी शिक्षणाचा श्रीगणेशा सुरू केला. त्या नगर येथील मिशन शाळेत जाऊ लागल्या. तेथेच त्यांनी मिशन स्कूलची परीक्षा उत्तीर्ण केली. त्या पाठोपाठ अध्यापनशास्त्राचे शिक्षण घेऊन अध्यापन कला साध्य केली. जोतिरावांनी १ जानेवारी १८४८ रोजी बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा सुरू केली. पहिल्याच दिवशी सहा मुली शाळेत आल्या. तेव्हा् ज्योतीबाराव स्वत: त्यांना शिकवत असत. पण समाजातील कां कू त्यांच्या कानावर गेली म्हणून त्यांनी वेळेचे भान राखून सावित्रीना सहायक शिक्षिका म्हणून काम करण्यास प्रेरित केले. त्या महाराष्ट्राच्या पहिल्या शिक्षिका होत. विदयादान हे आपले जीवनकार्य समजून शिक्षण प्रसारात त्या अधिकाधिक रममाण झाल्या. सनातन्यांच्या छळाला न जुमानता अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ज्ञानदानाचे उज्वल व यशस्वी काम करणाया त्या आदर्श शिक्षिका ठरल्या. ही एक त्यांच्यासाठी तेव्हा गौरवास्पद बाब ठरली.
त्याकाळी एका हिंदू महिलेने शिक्षिकेचे काम करणे म्हणजे अत्यंत समाजद्रोही व धर्मद्रोही गोष्ट समजली जायची. त्यामुळे पुण्यातील सनातन्यांची तळपायाची आग मस्तकात गेली. कलियुग आलं- धर्म बुडाला अशा प्रकारची मुक्ताफळे सावित्रीच्या कानावर नित्यनेम पडत. त्या साध्वी महिलेने अंगीकृत कार्याची महानता जाणून त्याकडे दुर्लक्ष फेकला तरीही त्यांनी ध्येय ढळू दिले नाही. उलट एका गुंडाच्या गालात चांगलीच भडकावली. त्यांच्या या कृत्याने पुण्यातील गुंडांना चांगलीच वचक बसली.
सावित्रीबाईंनी ज्ञानदानाचे कार्य यशस्वीपणे पार पाडून देशापुढे एक नवा आदर्श निर्माण केला. त्यामुळे त्यांचे ज्ञानदानातील अविश्रांत परिश्रम लक्षात घेऊन मेजर कॅडी, रे. रीव्हन इत्यादी तत्कालीन इंग्रज अधिका-यांनी सावित्रीबाई शिक्षणप्रसाराच्या कार्यामुळे जोतिराव आणि सावित्रीबाई फुले कार्याची नोंद घेऊन १६ नाव्हेंबर १८५२ रोजी उभय पतीपत्नीचा सत्कार केला. या सत्कार समारंभाला मिसेस मिचेल, ढमढेरे, प्रा. छत्रे, बापुराव मांडे आदी मान्यवर जातीने हजर होते. सावित्रीबाईंनी शैक्षणिक कार्यातच आमूलाग्र बदल न करता इतरही कार्यात मोठ्या हिरीरीने पुढाकार घेतला. केशवपन, बालविवाह, विधवाविवाह, सती प्रतिबंधक गृह स्थापन केल्यावर त्यांनी स्वतःच्या मुलांप्रमाणे सर्व बालकांची सेवा केली. स्वत:ला बोचणारे अपत्यहीनपणाचे दुःख पळवून लावण्यासाठी त्यांनी यशवंत नावाच्या मुलास दत्तकही घेतले त्यांच्या या मानवतावादी कार्याबददल सुधारक लोकांनी तोंडभर स्तूती केली.
महिलांनी अंधश्रध्दांच्या व जुनाट गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न करून महिला सेवामंडळाची स्थापना केली. त्याव्दारे स्त्री जागृतीसाठी सर्वांगीण्एा प्रयत्नांची पराकाष्टा करून स्त्री मुक्ती आंदोलन उभारले. दीनदलीतांची रखरखत्या उन्हात पाण्यासाठी होणारे हाल पाहून स्वतःच्या घरचा हौद खुला केला. इ.स. १८७६-७७ च्या दुष्काळात फुले दांपत्यानी मिळेल तिथून अत्र जमवून ५२ अत्र छत्रालये चालविली. त्यात बारा वर्षाच्या आतील दोन हजार बालकांना अन्न मिळू लागले. यावरून त्यांच्या मनाची महती, हृदयाचा, दिलदारपणा व लोकहितवादाची तयारी लक्षात येते. दीन दुबळ्यांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा होय असे त्या म्हणत असत.
शैक्षणिक व समाजसुधारणांच्या चळवळीत स्वत:ला वाहून घेताना तत्कालीन समाजातील सनातनी लोक नक्की नामोहराम करण्याचा प्रयत्न करतील याची पूर्वकल्पना असताना त्या कधीही भयग्रस्त व चिंताग्रस्त झाल्या नव्हत्या. बहुजन समाजाला प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी जीवाचे रान केले. त्यांची शैक्षणिक व सामाजिक चळवळ थांबवण्यासाठी अनेक कुटील डाव खेळले गेले पण सावित्रीबाईंनी कुणालाही दाद दिली नाही. शैक्षणिक व सामाजिक कार्याबरोबरच त्यांनी साहित्य क्षेत्रातही भरीव कामगिरी केल्याचे सर्वज्ञात आहे. त्या लेखिका व प्रतिभावंत कवयित्री होत्या. त्यांचे बरेच वाड्मय आजही प्रकाशित राहिले असण्याची व काळाच्या ओघात गहाळ झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. पण त्यांच्या साहित्यामुळे वाचकांच्या जीवनकार्यावर अधिक भर पडेल यात शंका नाही. जे तुकारामाच्या अभंगाप्रमाणे जे जे दिसे। ते तेनासे। हे सूत्र या महान लोकमातेलाही लागू पडते. अशी थोर माय माऊली गोर गरीबांची सावली दि. १० मार्च १८९७ रोजी आपल्यातून जगाचा निरोप घेऊन गेली. सावित्रीबाई आपल्या कार्याच्या रूपाने आजही आपल्यात आहेत. अशा महान थोर महिला भारतात घराघरात जन्माला येवोत व सावित्रीबाईंची विचारज्योत चंद्र सूर्य असेपर्यंत ठेवो हीच अपेक्षा
स्त्रोत : शिक्षण संक्रमण , जानेवारी २०१७
अंतिम सुधारित : 5/17/2020