आपल्या शिक्षणातून आणि तसेच्या अभ्यासक्रमातून महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रचारित व प्रसारित होत असतात. या थोर महापुरुषांचे सामजिक, राजकीय आणि सांस्कृतिक स्वरूपातील विचार आपल्याला प्रेरित व प्रोत्साहित करीत असतात. त्याचे विचार २१ व्या शतकात आपल्या विदयार्थी वर्गाला नव्याने देणे आवश्यक आहे.
शिक्षण हा जीवनाचा आधार आहे. शिक्षणापासून आपण आपणास वेगळे करू शकत नाही. प्रत्येक व्यक्ती हा शिक्षण देणारा एक महत्वपूर्ण ग्रंथ आहे. केवळ त्याच्याकडून आपण काय घ्यावे हे आपणास कळायला पाहिजे. शिक्षण ही जीवन जगण्याची गुरुकिल्ली आहे. जीवन म्हणजे काय? जीवन का जगावे, जीवन कसे जगावे, जीवनाची सार्थकता कशामध्ये आहे, जीवन पूर्ण कसे करावे. आपण जीवनातून काय घ्यावे व इतरांना काय दयावे. या सर्व प्रश्नांची उत्तरे म्हणजे शिक्षण होय. म्हणूनच
'शिक्षणानेच सर्व काही होत आहे, त्याकरिता आधी शिक्षण घेतलेच पाहिजे'
जीवन शिक्षण ही काळाची गरज बनली आहे आणि आपल्या सर्व थोर शिक्षणतज्ज्ञांनी, विचारवंतांनी, समाजसुधारकांनी जीवन शिक्षणाची धुरा सांभाळली आहे आणि सर्वांना जगण्याची एक दशा आणि दिशा देण्याची महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. २१व्या शतकामध्ये शिक्षण घेणारा समुदाय मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पण त्यातून जीवनविषयक शिक्षण मिळत आहे काय? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. तेव्हा आपल्या शिक्षणतज्ज्ञांचे आजच्या
शिक्षणातून व अभ्यासक्रमातून प्रकट होणारे विचार निश्चितच येणा-या भविष्यकालीन समस्यांचे निराकरण व उत्तम जीवन जगण्यासाठी दिशादर्शक ठरतील. यामध्ये प्रामुख्याने महात्मा फुले, राजर्षी शाहू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मार्गदर्शनपर आहेत. शिक्षण आणि अभ्यासक्रमामध्ये जे विचार आहेत. ते याच थोरांचे आहेत.
राजर्षी छत्रपती शाहूमहाराजांचे शैक्षणिक कार्य- राजर्षी शाहू महाराजांनी जे शैक्षणिक क्षेत्रात कार्य केले त्या हिताच्या दृष्टीने अलौकिक कार्य केले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने १) विदयार्थ्यांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण उपलब्ध करून दिले. २) शिष्यवृत्तीची सवलत देण्यावर भर देण्यात आला. ३) विदयार्थ्यांसाठी वसतिगृहाची व्यवस्था करण्यात यावी. ४) विदयार्थ्यांना विविध सोयी सवलती देणे. आपल्या शिक्षणातून आणि तसेच अभ्यासक्रमातून म. फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब यांचे विचार प्रचारित व प्रसारित होत असतात. या थोर महापुरुषांचे सामजिक, राजकीय आणि सांस्कृतिक स्वरूपातील विचार आपल्याला प्रेरित व प्रोत्साहित करीत असतात. त्याचे विचार २१ व्या शतकात आपल्या विदयार्थी वर्गाला नव्याने देणे आवश्यक आहे. कारण आपली पिढी भरकटत चालली तेव्हा त्यांना या महामानवाचे आदर्श डोळ्यासमोर ठेवता येईल.
अंतिम सुधारित : 8/22/2020