অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

देन वुई मस्‍ट फॉलो हिम - स्वामी विवेकानंद

देन वुई मस्‍ट फॉलो हिम - स्वामी विवेकानंद

भारतातील सनातन वैदिक धर्माचा प्रतिनिधी म्‍हणून स्‍वामीजी उभे राहिले. हातात कसलाही कागद नाही. ग्रंथ नाहीत, पुरावे नाहीत. त्‍यांचा विषय होता, हिंदूचे प्राचीन धर्मविचार स्‍वामीजींनी भाषणाला सुरूवात केली. अमेरिमेतील माझया भगिनींनो आणि बंधूंनो आणि अक्षरशः जणू बॉंब पडला. अवघे पाचच शब्‍द पण त्‍यात जणू पंचमहाभूतांनी ताकद एकवटली होती. मोजून तीनच सेकंद लागतात हे पाच शब्‍द उाच्‍चारायला पण मित्रहो, 'नवीन' तेच आकर्षण सर्वच आबालवृद्धांना असतं. बाळाचं 'नवीन' खेळणं असो वा आजोबांचा ‘नवा' वर्षाचं- इ. स. १९१७ चं- स्वागतही तुम्ही मध्यरात्री बारा वाजता फटाके वगैरे उडवून जोरदारपणे नक्कीच केलं असेल. पण मित्रहो, आता जरा वेगळ्या दिशेनं 'जानेवारी' २०१७ बद्दल विचार करूयात.

हा अंक तुमच्या हातात पडेल तेव्हा कदाचित देशाची पहिली 'शिक्षिका' म्हणून इतिहासात चिरंजीव झालेल्या सावित्रीबाई फुलेंची जयंती जानेवारीच्या तीन तारखेला होऊनही गेली असेल. सावित्रीबाई म्हणजे अतुलनीय धैर्याचा सागर. पराकोटीची ज्ञानसाधना म्हणजे सावित्रीबाई. अगदी टोकाचा, जीवघेणा जीवनसंघर्ष म्हणजे सावित्रीबाई. एकदा काय झालं, त्यांचा भाऊ त्यांना म्हणाला, 'ताई, सोडून दे हे सारं आणि रुढीप्रमाणं वाग.” त्यावेळी त्या म्हणाल्या, पाजतोस. मग आपल्यासारखीच हाडामांसाची, जितीजगती माणसं तुला का बरं अपवित्र वाटतात? अरे, माण्णूस म्हणून त्यांना स्वाभिमानानं जगता यावं यासाठीच तर मी त्यांना या उपेक्षितांनाच आम्ही आमची पंढरी मानतो. त्यांची सेवा करतो. यात काय वाईट आहे? तूच सांग दादा!”

मित्रहो, उपेक्षितांसाठी चंदनासारखं झिजणा-या फुले दाम्‍पत्‍यानं स्‍वातंत्रय समता लोकशाही सर्वधर्मसमभाव साक्षरता यासाठी आपल्या एका आयुष्यात जेवढं प्रचंड अन् उतुंग कार्य करून ठेवलंय तेवढं अनेकांना अनेक जन्म घेऊनही करता येणार नाही. नेमकी हीच गोष्ट लालबहादुर शास्त्री आणि डॉ. होमी भाभांची दोघांचाही स्मृतिदिन 'जानेवारी' तलाच. त्या भिजलेली आठवण मुलांना अवश्य सांगा मित्रांनो!

घडलं असं होतं की, लालाबहादुंर शास्‍त्रीजीसारख्‍या शांतिदूताचं अकाली, अचानक, दु:खद निधन झाल्यार्च प्रत्यक्षात उतरवलं, पण त्याच रात्री '१० जानेवारी' १९६६ त्या हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन हा महान शांतिदूत अनंतात विलीन झाला होता. शास्त्रीजी आयुष्याच्या सांगितलं, 'आपणही आज सुट्टी न घेता दुप्पट काम करूयात.” त्यांनी शास्त्रीजींची पत्नी ललितागौरीजींना लिहिलेल्या पत्रात असं महटल होत की, 'मी करू शकेन अशी कोणतीही मदत जर आपणास हवी असेल तर मला जरुर सांगा. कसलाही संकोच बाळगू नका. निःसंकोचपणे करता आलं तर मला ते फार आवडेल. त्यांच्यासारख्या महान आणि धाडसी नेत्याच्या अकाली मृत्युमुळे आपल्या देशाची अपरिमित हानी झाली आहे.”तेवीस 'जानेवारी' १९६६ चं हे पत्र! दुस-याच दिवशी म्हणजे चोवीस 'जानेवारी’ ला एका आंतरराष्ट्रीय शांतता परिषदेसाठी ते जिनिव्हाला जायला निघाले होते. वाटेत आल्प्स पर्वत शिखरांवर त्याचं बोईंग ७०७ हे विमान कोसळलं आणि

एक निसर्गप्रेमी

एक निसर्गप्रेमी, शांततेचा उपासक, कलासक्त मनाचा, प्रतिभासंपन्न शास्त्रज्ञ निसर्गाच्या कुशीत कायमचा विसावला.

काय योगायोग पहा! शास्त्रीजी आणि होमी भाभा दोघंही परदेशातच मरण पावले; ‘जानेवारी' महिन्यातच; अवघ्या येण्याविषयी विचारणा केली होती. पण अणुसंशोधनात रमून गेलेल्या या महामानवानं शास्त्रीजींना विनम्र नकार देऊन एक फार मोठा आदर्श इतरांपूढे उभा केला होता.

बघितलात नं'जानेवारी'चा महिमा? पण हे तर काहीच नाही अशा एका महान क्रांतिकारकांची तेजस्वी आठवण आपण 'जानेवारी' च्या वीस तारखेला नक्की न विसरता केलीच पाहिजे. त्याचं नाव, बटुकेश्वर दत. धाडसी कृत्यं केली त्यात आठ एप्रिल १९२९ रोजी दिल्लीतल्या असेंब्ली हॉलमध्ये केलेला बाँबस्फोटचा धमाका आणि या धाडसी कृत्यात शहीद भगतसिंगांच्या खांदयाला खांदा लावून उभे होते. निर्भय, नीडर, निधड्या छातीचे बटुकेश्वर दत! त्यांनी ब्रिटिशांच्या विरोधात तुरुंगात ११४ दिवस उपोषण केले होतं. भगतसिंगांना फाशीची शिक्षा झाली होती पण बटुकेश्वर दतांना मात्र आजन्म करावास. या शिक्षेवर दत्त फारच नाराज होते. त्यांनाही फाशीच हवी होती! त्यावेळी त्यांची समजूत घालण्यासाठी भगतसिंगांनी त्यांना एक पत्र लिहिलं होतं. आपल्या पत्रात ते लिहितात, ‘मेरे दोस्त, तुम जीवित रहोगे। जीवित रहकर ही तुम्हें दुनिया को यह दिखाना है कि क्रांतिकारी अपने आदशोंके लिए केवल मर ही नहीं सकते बल्कि जीवित रहकर भी हर मुसीबत का मुकाबला बहुत दृढ़तासे कर सकते है!” भेट व्हावी अशी बटुकेश्वर दत्तांची खूपखूप तळमळ होती. पण निर्दय ब्रिटिश सरकारनं परवानगी दिली नाही. उलट त्यांना दूर, खूप खूप दूर 'सालेम' (मद्रास) च्या तुरुंगात किशनसिंगांना-लिहिलेल्या पत्रात बटुकेश्वर दत्तांनी असं आजमाइश है कडी, लबपर कोई शिकवा न हो फिर मिलेंगे जा यकी दिल में कोई धडका न हो। (मित्रा, आपण 'पुन्हा'नक्की भेटणार आहोत हा विश्वास पक्का असल्यानं आता भेट होत नाही याबद्दल मनात हुरहुर किंवा ओठांवर शिकायत असायची गरजंच काय?)

तर शिक्षक मित्रांनो, या अशा अनेक चित्तथरारक आणि संस्मरणीय घटना घडून गेल्यात या 'जानेवारी' महिन्यात सन्मानित झालेल्या पहिल्या मराठी लेखकाचा- वि. स. पुण्यातल्या न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना (इ. स. १८८०), महात्मा गांधीजींचा स्मृतिदिन अशा किती किती तरी ऐतिहासिक घटना याच 'जानेवारी'तल्या!

पण या सगळ्या विशेषदिनांपेक्षाही सर्वात जास्त महत्वाचा, आदराचा, सन्मानाचा विशेषदिन म्हणजे २६ 'जानेवारी' अर्थातच भारताचा प्रजासत्ताक दिन. या दिवसाबाबत अधिक काहीही न लिहिता मी तुम्हाला एवढीच विनंती करेन की २५ 'जानेवारी' ला मुलांना त्यांच्या पाठ्यपुस्तकातली भारताच्या राज्यघटनेतली उद्देशिका (Preamble) नीट वाचून दाखवा. तिचा अर्थ मुलांना समानता आणि बंधुता या जीवनमूल्यांबद्दल खूप खूप मनापासून बोला मुलांशी! मुलांना एक गोष्ट सांगा. कोणती? गोष्टीचं नाव आहे.

देन वुई मस्‍ट फॉलो हिम मुलांनो अमेरिकेतलं शिकागो रेल्वेस्टेशन! नुकतीच एक ट्रेन बोस्टनहून आलीये. ऐन मध्यरात्रीची वेळ. सप्टेंबर महिना. कडाक्याची थंडी. त्या ट्रेनमधून एक युवक खाली उतरला. नरेंद्रनाथ हे त्याचं नाव. त्याला जायचं होतं त्या ऑफीसचा पत्ता होता तो; पण ती चिठ्ठी काही सापडेना. तो अस्वस्थ, बेचैन झाला. सैरभैर झाला. काय करावं? काय करावं? कुणीही ओळखीचं नव्हतं तिथ. भारतापासून हजारो मैल दूर अमेरिकेतल्या त्या अतिविशाल शिकागो शहारात तो त्या क्षणी एकटा, अगदी एकाकी होता, असहाय्य होता.

त्यानं प्लॅटफॉर्मवर एक नजर टाकली. दूर एक लाकडी खोकं त्‍याला दिसलं रिकामं खोक, त्‍यात बसता येईल एवढी जागा होती. त्यानं ठरवलं, 'उरलेली रात्र या खोक्यातच काढायची!' त्या जीवघेण्या थंडीपासून बचाव करण्याचा तेवढा एकच मार्ग होता. खोक्याच्या फळ्यांना टेकून तो विसावला. शरीरानं मनात खूपच थकून गेला होता तो. डोळे मिटून शांत पडून राहिला होता तो. डोळे मिटले होते, पण मन? ते जागंच होतं, असंख्‍य विचारांचे तरंग त्‍याच्‍या मनावर उमटत होते.

'कुठं आलोय आपण? आणि कशासाठी? ही अशी खोक्यात रात्र काढायची का आपण? भारतातून निघालो तेव्हा काय ठरवून निघालो होतो आपण? आणि प्रत्यक्षात हे काय घडतंय? कोणत्या ध्येयासक्तीनं आपले पाय अमेरिकेकडे वळले होते? उदयाही ती चिठ्ठी नाहीच सापडली तर? बापरे!."

मातृभूतीची आठवण

त्याक्षणी त्याला मातृभूतीची, भारताची प्रचंड आठवण झाली. तिथून निघतानाचा तो क्षण आठवला. ते मुंबईचं बंदर, बंदरात उभी असलेली 'पेनिनशुलर' बोट, प्रवाशांची किना-यापासून दूरदूर जात असलेली बोट, पाणावलेले आपले डोळे, खोक्यात बसल्या बसल्या आता त्याचं मन आई. प्रेमळ आई, गरिबांचा कळवळा येऊन मुक्तहस्तानं ते अवखळ दिवस, आपला खोडकरपणा....

लहानपणापासूनच हा नरेंद्र इतरांपेक्षा वेगळा होता. त्याचे वडील विश्वनाथ दत. ते कलकत्ता हायकोर्टात एक नररत्नाला जन्म दिला होता. वडिलांची परदुःखकारकता नरेंद्रातही उतरली होती. प्रसंगी अंगावरचे कपडे काढून तो ते कपडे गरीब मुलांना देऊन टाकत असे! परिवारात सर्वांचा आवडता, लाडका, मित्रांमध्ये प्रिय. शाळेत सुरुवातीला तो इंग्रजी शिकायला मुळीच तयार नव्हता. तो म्हणायचा, 'का म्हणून ही विदेशी भाषा मी शिकायची' बालवय होतं, विचारापेक्षा भावनेचा पगडा जास्त; पण पुढे जाऊन तो उत्तम इंग्रजी शिकला. आईनेच त्यालाA,B,C,D चे धडे दिले होते. त्याचा अभ्यास पटकन संपून जात असे. कारण तो जन्मतःच सांगितली तरी त्याला ते पुरेसे असे. पुन्हा पुन्हा सांगायची वेळच येत नसे त्याच्याबाबतीत. तसाच तो 'स्मृतिधर' ही होता. त्याची स्मरणशक्ती एवढी पक्की होती की तो जे वाचायचा, ते तो जसंच्या तसं म्हणून दाखवीत असे. अभ्यास असो वा खेळ, नरेंद्र सर्वात पुढे. शालेय शिक्षण एक प्रगल्भ युवक झालेल्या नरेंद्राला गहन चिंतनात बुडून गेल्यावर प्रश्न पडत असे की, ‘खरंच, केवढं आहे हे विश्व? कुणी निर्माण केला हा विश्वाचा पसारा? कोण चालवतं या विश्वाचा कारभार? त्यालाच ईश्वर म्हणतात का? कुठे भेटेल तो? कधी? त्याला नेहमी वाटे की, एकीकडे प्रचंड वैभव तर दुसरीकडे पराकोटीचं दैन्य अशी विषमता कशासाठी? हे जातीभेद, धर्मभेद कुणी निर्माण केले? ते दूर कसे होतील? फार हळवं मन होतं त्याचं, जणू दवबिंदूनी धुतलेलं प्राजप्तचं फुलंच कितीतरी रात्री तो झोपेविना ध्यानधारणेत घालवीत असे. विश्वकल्याणाच्या वेदीवर आपली जीवनसमिधा अर्पण करण्याची जणूकाही ही पूर्वतयारीच चालू होती.

या तयारीला पूर्णत्व प्राप्त झालं ते रामकृष्ण असलेल्या एका कालीमंदिराचे पुजारी होते. कालीमातेचे ते निस्सिम भक्त होते. नरेंद्राच्या मनात प्रपंचाविषयीचं असलेलं वैराग्य त्याच्या एका नातेवाईकांच्या लक्षात आलं होतं. त्यांनी नरेंद्राला सुचवलं;'एकदा तू रामकृष्णांना का भेटत नाहीस? जाऊन तर बघ.” आणि तोच क्षण युगप्रवर्तक ठरला. सा-या जगाला दिपवून टाकणारं एक अभूतपूर्व कार्य सुरू होण्याचा तो परम भाग्यवान क्षण आला होता. इ. स. १८८१ च्या डिसेंबरात नरेंद्र रामकृष्ण परमंहंसाकडे गेला. दोघांच्यात संवाद झाला. विषय होता, 'ईश्वराचे संपूर्ण श्रद्धा अर्पित करावी असंच हे व्यक्तिमत्व आहे.

मग तो पुन्हा पुन्हा त्यांच्याकडे जात राहिला. एका लोकोत्तर देवमाणसाच्या सहवासाने, त्यांच्या परिसस्पशनेि ससेमिरा, संधीसाधू नातेवाईक, बेकारी, पैशाची चणचण या दुष्टचक्रात तो पुरता अडकला. फारच हलाखीचे दिवस होते ते. अनेकदा तर घरात पुरेसा शिधा नसे. खिशात पैसा नसे. अशावेळी तो 'आज मला एके ठिकाणी जेवायला आमंत्रण नोकरीच्या शोधात उपाशीपोटी भटकून सायंकाळी तो परत येत असे घरी. काही केल्या त्याच्या समस्या सुटेचनात. शेवटी एकदा तो रामकृष्णांकडे गेला, म्हणाला, करा आणि माझ्या अडचणी दूर करा.” ते म्हणाले, 'नरेन, आणि म्हणाला, 'आई मला ज्ञान दे. भक्ती दे.” तो बाहेर आला. रामकृष्णांनी विचारलं; 'काय मागितलंस?” आणि नरेंद्र भानावर आला. 'अरे, आपण काय मागायला गेलो आणि काय मागितलं? तो म्हणाला; 'मी तर देवीजवळ भक्‍ती मागीतली रामकृष्‍ण म्‍हणाले हरकत नाही पुन्‍हा एकदा जा तू देवीकडे आणि तुला जे हवंय ते माग. जा.”

नरेंद्र पुन्‍हा गेला मंदिरात. थोडया वेळानं बाहेर आला. याही वेळी पुन्‍हा तेच सारं घडं होतं. त्‍याच्‍या तोंडून देवीसमोर पैशांची, नोकरीची मागणी बाहेर पडलीच नाही. तिस-याही वेळी तसेच घडले. 'आई, मला ज्ञान दे भक्ती दे.” मग मात्र नरेंद्रला समजून चुकलं की भक्ती हेच आता निधनाचाही आघात सहन करावा लागला. त्यांनी एका करेल.' मग त्यानं कलकत्याजवळ रामकृष्णमठाची स्थापना तेजःपुंज जीवन नरेंद्राला खुणावत होतं.

म्हणूनच तर वैदिक धर्माचा प्रसार सा-या जगभर करून संपूर्ण विश्व चैतन्यमय करण्यासाठी नरेंद्राने एका मंगलदिनी संन्यास घेतला आणि नरेंद्राचे 'स्वामी विवेकानंदांमध्ये' रूपांतर झाले! आता ध्येय सापडलं होतं, दिशा दिसली होती. इ. स. १८९१ मधला 'जानेवारी' महिना. एका अन् सांगितलं; 'मी रामकृष्ण मठाचा त्याग करीत आहे. संपूर्ण भारतभर मी भ्रमण करणार आहे.”

आणि स्वामीजी बाहेर पडले. त्यांनी मीरत शहराची वाट धरली. मीरतहून ते दिल्लीला गेले. तिथून अलवार, जयपूर, अबूचा पहाड या मार्गे ते खेत्री संस्थानात पोहोचले. तिथल्‍या महाराजांनी स्‍वामीजींना तिथच राहण्‍याचा प्रचंड आग्रह केला. पण स्वामीजींचा निश्चय पक्का होता. खेत्रीहून ते गुजरातला गेले. तिथे पोरबंदर, द्वारका, बडोदा, खांडवा अशा अनेक ठिकाणी गेले. ते जिर्थ जिर्थ जात होते तिर्थ तिर्थ स्पृश्य-अस्पृश्य, लहानमोठे, चांगले वाईट, सा-यासा-यांना भेटत होते. हा केवळ प्रवास नव्हता, तो तर सगळेच करतात; काढलं तिकीट की सुरू प्रवास. पण तो फक्त संवेदनांचा प्रवास होता! राष्ट्राला देव मानून समाजभक्ती करणा-या एका संवेदनशील मनाचा तो प्रवास होता!!

योगायोगानं गुजरातेत खांडव्याला एक ऐतिहासिक घटना घडली. धन्यधन्य ते खांडवा शहर. कारण इथंच त्‍यांना समजलं की अमेरिकेत शिकागो इथं जागतिक सर्वधर्म परिषद होणार आहे. 'या परिषदेला आपण जायचं’ हा विचार सर्वप्रथम इथेच या खांडव्यातच स्वामीजींच्या मनात चमकून गेला आणि तिथून पुढच्या त्यांच्या भ्रमंतीला एक वेगळेच परिणाम लाभले. या भ्रमंतीत स्वामीजींना भारतासारख्या धर्मभूतीत सर्वत्र विखुरलेलं अमूल्य विचारधन गवसलं. सर्व धर्मामध्ये समानतेनं अढळणारं 'मानवता' हे शाश्वत तत्त्व आता त्यांना स्पष्टपणे जाणवू लागलं होतं. हा मानवतेचा विचार आता पक्का झाला होता.

खांडव्याहून ते महाराष्ट्रात पुण्याला आले. मुंबई ते पुणे या रेल्वेप्रवासात योगायोगानेच त्यांची भेट लोकमान्य टिळकांबरोबर झाली. ते पुण्यात टिळकांच्या घरी राहिले. पुण्यात बेळगाव, म्हैसूर, कोचीन, त्रिवेंद्रम करत करत स्वामीजींनी त्या अथांग जलाशयात एक विस्तीर्ण शिलाखंड दिसला. पोहत पोहत ते तिथपर्यंत गेले. त्या शिलाखंडावर उभे राहिले. निसर्गाच्या त्या विराट दर्शनानं स्वामीजी भारावून गेले. ते ध्यानस्थ बसले; कितीतरी वेळ एक नवा प्रकाश त्यांना जाणवला. त्यांच्या अंत:करणात एका अभूतपूर्व संजीवनशक्तीचा संचार झाला. तिथंच त्यांनी निश्चय केला; 'देश आणि काल यांच्या सीमा भेदून मी अमेरिकेत जाईन. माझ्या देशाचं, माझ्या धर्माचं प्रतिनिधत्व मी पाश्चात्य देशांमध्ये करेन. मानवतेची पताका मी सातासमुद्रापलीकडे फडकवेन!”

नंतर पॉंडेचरी, मग मद्रास; आणि मग पैसे, तिकीटे, पासपोर्ट, कागदपत्रे हे सारे सोपस्कार पूर्ण करून स्वामीजी दिनांक ३१ मे १८९३ रोजी मुंबई बंदरातून “पेनिनशुलर’ बोटीने अमेरिकेला रवाना झाले. त्याक्षणी कुणालाही माहीत नव्हतं की विवेकानंदांचं पाऊल'विश्वविजयी' पाऊल ठरणार होतं!

१५ जुलैला ते अमेरिकेत पोहोचले, आणि एकामागून एक अडचणी सुरू झाल्‍या. त्‍यांना समजलं की ती परिषद सप्‍टेबरात आहे. तब्बल दोन महिने ते कुठं राहणार होते? परिषदेत सहभागी व्हायला, भाषण करायला कुणा प्रतिष्ठित व्यक्तीचं परिचयपत्र दयावेच लागते! कुठून आणणार ते? कोण त्यांना ओळखत होतं? कुणीही नाही. सर्वात मोठा धक्का परिषदेसाठीच्या नावनोंदणीची मुदत केव्हाच संपली होती सगळाच अंधार कुठेही आशेचा प्रकाश किरण दिसत नव्‍हता.

त्‍यांनी शिकागो सोडलं, बोस्‍टन गाठलं, कारण बोस्टनमध्ये थोडीशी स्वस्ताई होती. बोस्टनच्या प्रवासात एका अमेरिकन महिलेशी त्यांचा परिचय झाला. तिनेच घरी .नेलं दोन महिने ठेवून घेतलं. तिच्‍याच घरी स्वामीजींचा प्रोफेसर जे. एच. राईट यांच्याशी परिचय झाला. अत्यंत हुशार, गाढे पंडित राईट हॉर्वर्ड विदयापीठात प्राध्यापक होते. पहिल्याच भेटीत स्वामीजींबरोबर चार तास चर्चा झाली त्यांची. स्वामीजींच्या प्रगल्भ बुदिधमतेनं ते अडचणी सांगितल्या ते म्हणाले; 'चिंता नको. परिषदेत तुम्‍हाला प्रवेश मिळवून दयायची जबाबदारी माझी

त्‍यांनी स्‍वामीजींचे एक विस्‍तृत परिचयपत्रक तयार केलं. परिषदेसाठी प्रतिनिधींची निवड करणा-या समितीच्या अध्यक्षांच्या नावे एक पत्र लिहिले. स्वामीजींना प्रतिनिधित्व देणं आवश्यक का आहे हे त्यांनी सविस्तर लिहिले. त्यांनी असेही लिहिले की, 'स्वामी विवेकानंद इतके विद्वान आहेत की आमच्या हॉर्वर्ड विदयापीठातील सर्वच्यासर्व विद्वान प्राध्यापकांची विद्वत्ता जरी एकत्र केली तरी स्वामीजींच्या तुलनेत ती कमीच भरेल.” त्यांनी त्या सर्वधर्म परिषदेच्या अध्यक्षांच्या नावेच एक पत्र लिहिलं आणि तेही विवेकानंदांकडे दिले. परिषदेच्या ठिकाणाची संपूर्ण माहिती दिली. एका कागदावर तिथला पत्ता लिहून दिला आणि शिकागोचं तिकीटही दिल! स्वामीजी बोस्टनहृन शिकागोला स्टेशनवर उतरल्यावर ते पता असलेली चिठ्ठी शोधू लागले आणि चिठ्ठीच सापडेना! शेवटी स्टेशनवरच्या एका लाकडी खोक्यातच त्यांना ती रात्र काढावी लागली. थंडीत कुडकुत आठवणींमध्‍ये . . .

सकाळ झाली स्वामीजी स्टेशनबाहेर आले. आता कुठं जायचं? कुणीही त्यांना परिषदेच्या स्थळाचा पत्ता नीट सांगत नव्हते. 'काळा' माणूस म्हणून 'गो-या' च्या देशात त्यांना उपेक्षाच सहन करावी लागली. त्यांना पाहून लोक घराचं दार बंद करू लागले. त्यांची कुचेष्टा करू लागले. थकून भागून ते रस्त्याच्या कडेला बसले. तेवढ्यात.......तेवढ्यात रस्ता ओलांडून एक महिला त्यांच्याकडे आली. तिनं स्वामीजींना परिषदेच्या ठिकाणी नेलं, आणि...आणि त्यानंतर एक अभूतपूर्व इतिहास घडला! एक असं अघटित घडलं जे पूर्वी कधीही घडलं नव्हतं. त्यानंतरही घडलं नाही. त्या सर्वधर्म परिषदेत प्रत्येक धर्माच्या प्रत्येक वक्त्यानं स्वतःसोबत लिहून आणलेली प्रदीर्घ भाषणं वाचून दाखवली होती. स्वामीजींना मात्र फक्त पाचच मिनिटे-मोठी मेहेरबानी म्हणून मिळाली होती. 'भारतातील सनातन वैदिक धर्माचा प्रतिनिधी' म्हणून स्वामीजी उभे राहिले. हातात कसलाही कागद नाही. ग्रंथ धर्मविचार.’ स्वामीजींनी भाषणाला सुरुवात केली; अक्षरश: जणू बाँब पडला. अवघे पाचच शब्द. पण त्यात सेकंद लागतात हे पाच शब्द उच्चारायला; पण त्या तीन सेकंदांनी, त्या पाचच शब्दांनी भारत आणि अमेरिका अवघं जग जिंकल स्वामीजींनी त्या तीन सेकंदात. संवेदनशील, नि:स्वार्थी, पवित्र, अंत:करणाच्या गाभ्यातून उत्सफूर्तपणे उमटलेले मोजकेच शब्द केवढी प्रचंड वैचारिक आणि भावनिक क्रांती करू शकतात हे सा-या जगाला कळलं होतं. मानवतेच्या यापेक्षा दुसरा मोठा विजय तो कोणता?

दुस-या दिवशीच्या वृत्तपत्रांमध्ये पहिल्याच पृष्ठावर 'सायक्लेनिक हिंदू मंक' (वादळी व्यक्तिमत्वाचा हिंदू संन्यासी) 'लायटनिंग ओरेटर' (वैखरीचा स्वामी, विद्युल्लतेसारखा वक्ता) 'सर्वधर्मपरिषदेतील सर्वश्रेष्ठ धर्मपरिषद पुढे सतरा दिवस चालली आणि तिच्यात स्वामीजींना बारा व्याख्याने दयावी लागली. केवळ धर्मपरिषदेसाठी तीन महिन्यांकरिताच अमेरिकेला गेलेल्या स्वामी विवेकानंदांना पुढे चार पाच वर्ष अमेरिकेत राहावं लागलं, शेकडो व्याख्याने देण्यासाठी.

स्‍वामीजी भारतात येण्‍यापूर्वीचं अखेरचं व्‍याख्‍यान. स्‍वामींजींचे बोलणं प्राणांतिक उत्‍कट होतं. श्रोत्‍यांच्‍या थेट हृदयात घुसणारं ते भाषण म्हणजे अखंड प्रेरणेचा स्रोत होता. उठता उठता पती पत्नीला म्हणाला, 'डस धिस यंग मॅन मीन व्हॉट ही सेज?” ( हा युवक जे काही बोलतोय ते तो वाटतंय का?”) पत्नी म्हणाली, 'येस. आय थिंग सो.” (होय, नक्कीच मलातरी तसंचं वाटतंय.”) यावर पती म्हणाला, 'इन देंट केस वुई मस्ट लिव्ह ऑल अँड फॉलो हिम.”(तसे असेल तर सर्व काही सोडून आपल्याला त्याच्या मागे जावेच लागेल) आणि अमेरिकेतलं आपलं घरदार विकून ते दोघेही स्वामी विवेकानंदाबरोबर भारतात आले.

मुलांनो, बारा 'जानेवारी' हा स्वामी विवेकानंदांचा जन्मदिन. भारतभर हा दिवस 'युवकदिन' म्हणून साजरा केला जातो. यंदा आपण तो कसा साजरा करायचा हे तुम्हीच सुचवा.

शिक्षक मित्रहो इर्थ तुमचं कथाकथन संपवा अन्मुलांना कामाला लावा!!

त्‍या तीन सेकंदानी त्‍या पाचच शब्‍दांनी भारत आणि अमेरिका यांच्‍यातलं हजारो मैल लांबीच्‍या सेतुबंधनाचं काम केलं.

लेखक : प्रकाश गोपाळ बोकील, पुणे ९८९०९o ११५९

स्त्रोत : शिक्षण संक्रमण , जानेवारी २०१७

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate