सुभाषचंद्र बोस यांचे कार्य संपूर्ण विश्वाला व स्वातंत्र्य पथावरील असंख्य वाटसरूंना मार्गदर्शक झाल्याशिवाय राहणार नाही. स्वातंत्र्याच्या कार्यासाठी त्यांना संपूर्ण विश्व आदर्श मानते त्याग, बलिदान हे गुण स्वातंत्र्यासाठी प्रेरणा देणारे आहेत. ज्वलंत देशभक्ती प्रत्येक युवकात जागवायची असेल तर सुभाषचंद्र बोस यांचे कार्य प्रेरणादायी ठरेल.
भारतीय मातृभूमी वीर सुपुत्रांची भूमी आहे. तसेच भारत भूमी थोर क्रांतिकारकांची जननी आहे. या भूमीत जन्म पावलेले शूरवीर, क्रांतिकारक, थोर लढवय्ये यांनी मातृभूमीच्या रक्षणार्थ आपल्या प्राणांची हसत हसत आहुती दिलेली आहे. शत्रूच्या जाचातून मातृभूमीला मुक्त करण्यासाठी या थोरांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी धगधगत्या स्वातंत्र्याच्या लढ्यात स्वत:ला झोकून देऊन शौर्याच्या, त्यांच्या थोर पराक्रमाच्या कथा व प्रसंग आजही मनाला भारावून टाकतात.
स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रत्येक भारतीयाचे एकच ध्येय होते ते म्हणजे भारताचे स्वातंत्र्य! परकीयांच्या जाचातून भारत मातेला मुक्त करून भारतीय जनतेला त्यांचे स्वातंत्र्य मिळवून देणे हे होते. यासाठी लढा देणा-यांमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नाव अग्रस्थानी होते. सुभाषचंद्रांच्या आयुष्याचे ध्येय एकच होते ते म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे. सुभाषबाबूंना स्वतंत्र भारत करावयाचा त्यांचे भारतावर जिवापाड प्रेम होते. भारतीय जनतेवरही ते जिवापाड प्रेम करीत होते. खंत एकच होती, भारत स्वप्न उराशी बाळगलेले होते ते म्हणजे स्वतंत्र भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारीही त्यांनी केलेली होती. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी एक यज्ञ पेटविला आणि या धगधगत्या अग्निकुंडात त्यांनी नीडरपणे उडी घेऊन भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपले सर्वस्व अर्पण केले.
या महावीराच्या जीवनकार्याचे अनेक पैलू आहेत या सर्व पैलूंचा साकल्याने विचार केला तर सुभाषबाबूंनी स्वातंत्र्यासाठी कसा लढा दिला याची प्रचिती येते. प्रखर राष्ट्रभक्ती, राष्ट्रनिष्ठा व राष्ट्रप्रेम उराशी बाळगून लढणारे सुभाषचंद्र बोस असामान्य व्यक्ती होते. भारतीय जनता गुलामगिरीत जगत होती. सुभाषचंद्र बोस या गुलामगिरीचे कट्टर विरोधक होते त्यांनी या गुलामगिरीला कडाडून विरोध केला होता काय वाट्टेल ते होवो परंतु देश स्वतंत्र करावयाचा हा त्यांचा मानस होता.
सुभाषचंद्रबोस अभिजात क्रांतिकारक होते. ही अभिजात वृत्ती जन्मतःच त्यांना प्राप्त झालेली होती. क्रांतिप्रिय मनोवृत्ती हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे स्वातंत्र्याचीच! त्यांना कोणत्याही परिस्थितीत आपला देश गुलामगिरीतून मुक्त करावयाचा होता आणि याचसाठी त्यांनी क्रांतीचे व्रत स्वीकारलेले होते. सुभाषचंद्र बोस यांना अभिजात क्रांतिकारक म्हणतात. ते याचसाठी की ते आपल्या 'तूम मुझे खून दो में तुम्हे आझादी दूंगा' हा त्यांचा नारा अत्यंत प्रभावशाली ठरला. बोस यांच्या अंगी झुंजार वृत्ती, अलौकिक सावधानता प्रतिकारासाठी प्राणार्पण करण्याची तयारी असे विविधांगी गुण होते. सशस्त्र क्रांतीवर त्यांचा पूर्ण विश्वास होता. त्यांचे मत असे होते की परकीयांना देशातून उलथून टाकायचे असेल तर सशस्त्र क्रांतीशिवाय पर्याय नाही त्यांनी यासाठी सशस्त्र सेनाही उभारली होती.
सुभाषचंद्र बोस म्हणजे प्रचंड आत्मबलाचा अविष्कार होय परकीयांशी लढा दयावयाचा म्हटल्यानंतर या आत्मबलाचा गुण क्रांतिकारकाकडे असणे आवश्यक होय. सुभाषचंद्र बोस यांचे आत्मबल खूप मोठे होते. मंडालेच्या कारागृहात साक्षात मृत्यूच्या जबड्यात असतानाही प्रचंड आत्मबलाच्या जोरावर त्यांनी जीवन तारण्यासाठी संघर्ष केला. तुरुंगात ते आजारी पडले. त्यांना क्षयरोग झाला तरी प्रचंड आत्मबलाच्या जोरावर त्यांनी या रोगाशी सामना केला व स्वतःला वाचविले ते एवढ्याचसाठी की, राष्ट्रभक्ती व राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा आत्मबलाचे श्रेष्ठत्व येणा-या पिढीला मार्गदर्शक ठरावे. तत्कालीन शासनाने त्यांचा अतोनात छळ केला परंतु ते जराही डगमगले नाहीत. परतविली.
क्रांतिकारकांच्या अंगी साहसी वृत्ती मोठ्या प्रमाणात असते. ते स्वातंत्र्याच्या ध्येयाने भारावलेले असतात. त्यांना आपले ध्येय गाठावयाचे असते. यासाठी आलेल्या प्रत्येक आपत्तीला व प्रत्येक संकटाला ते समर्थपणे तोंड देतात. सुभाषचंद्र बोस यांच्या आले परंतु त्यांनी आपल्या साहसी वृत्तीने त्या सर्वांचा प्रमाणात होती. त्यांच्या जीवनात या साहसाला खूप मोठे स्थान आहे. साम्राज्यशाहीशी अविरत झुंजणारा वीर म्हणून या महान साहसी वीराच्या साहसाची मुक्तकंठाने प्रशंसा केली होती.
सुभाषचंद्र बोस यांना त्यागमयी वीर म्हणतात. सुभाषचंद्र बोस म्हणजे त्यागाचे पार्थिव रूप होय. त्याग हा त्यांच्या जीवनाचा आरसा आहे. त्याग त्यांचा धर्म होता. त्यांचा स्वभाव होता. सुभाषचंद्र बोस आयुष्याचे साध्य होते. ते त्यांनी राष्ट्रासाठी समर्पित केले. सुभाषचंद्र बोस यांचा त्याग म्हणजे देशासाठी केलेली महान सेवा आहे. सुभाषबाबूंनी मातृभूमीसाठी केलेला त्याग येणा-या अनेक पिढ्यांनी अनुसरावा कारण देशापेक्षा व्यक्ती मोठी नाही व श्रेष्ठही नाही. राष्ट्र श्रेष्ठ असते व्यक्ती श्रेष्ठ नसते आणि देशासाठी केलेला त्याग सर्वश्रेष्ठ त्याग होय हे सुभाषबाबूंनी ओळखून राष्ट्राच्या भल्यासाठी त्यागाचा मार्ग स्वीकारला.
सुभाषबाबू कुशल संघटक होते - सुभाषचंद्र बोस यांनी सार्वजनिक आयुष्यातून समाजात सामाजिक माणसे संघटित केली. अहंकार या अवगुणाला त्यांनी आपल्या जीवनातून तडीपार करून संयम, सामंजस्य व राष्ट्रनिष्ठा, समाजनिष्ठा, सहकार्य व राष्ट्रभक्ती निर्माण केली आझाद हिंद सेनेत सहभागी झाली त्यांच्या या संघटनात्मक गुणावरून ते एक कुशल संघटक होते हे सिद्ध होते.
सुभाषचंद्र बोस म्हणजे स्नेह, प्रेम, आत्मीयता, सहकार्य, सद्भावाचे आदर्श होते. सुभाषचंद्र बोस यांच्याकडे मत्सर, हेवा, हा स्वत:ला झोकून दिलेले होते. ते एका व्रताने भारावलेले होते. त्यांना ते व्रत साध्य करावयाचे होते यासाठी त्यांनी सेना स्थापन करताना या स्नेहशीलतेच्या माध्यमातूनच या स्नेहशीलतेच्या आदर्श गुणानेच निखळ शुद्ध मन, शुद्ध विचार, प्रेम, स्नेह व सद्भाव यावर आधारित त्यांनी संघटना उभी करून लोकांच्या मनात आत्मीयता निर्माण केली होती.
सुभाषचंद्र बोस यांचे वक्तृत्व प्रभावशाली व मनाला तसेच हृदयाला भिडणारे असायचे त्यांच्या वक्तृत्वाची कौशल्ये व आकर्षक वक्तृत्व शैली यामुळे संपूर्ण श्रोता वर्ग तल्लीन होत असे. गंभीर, शांत पण निश्चयी आवाजात ते एका मागून एक प्रगल्भ आणि तीक्ष्ण वाणीने स्वातंत्र्य देवतेची मागणी काय आहे हे सांगितले आणि शेवटी दोनच वाक्ये सांगितली ज्याने असंख्य अंत:करणे पेटली 'तुम तुझे खून दो में तुम्हे आझादी दूंगा' या वक्तव्याच्या सामर्थ्यां ने प्रेरित होऊन हजारो लोक सुभाषबाबूंच्या पाठीशी उभे राहीले इतके सामथ्र्य ऐकणाराच्या हृदयात अस्वस्थता निर्माण करीत असे. सुभाषचंद्र बोस यांची लेखणी ही अशीच धारदार होती मुद्देसूदपणा, मार्मिक शब्द योजना ही त्यांच्या लेखन शैलीची वैशिष्ट्ये होय.
सुभाषचंद्र बोस यांचे आदर्शचारित्र्य - सुभाषचंद्र बोस म्हणजे आदर्श व्यक्तिमत्वाचे आदर्श नेते होते. सुभाषबाबूंच्या आदर्श संघटनात्मक गुणांनी त्याकाळचे महापुरूषही भारावून गेले होते. त्यांचे आपल्या सैनिकांवर मुलांप्रमाणे प्रेम होते.
ध्येयसिद्धीसाठी आत्मार्पण करण्याची त्यांची सदैव सिद्धता होती. शुद्ध चारित्र्य हा त्यांचा अतिशय महत्वाचा व अत्यंत मौल्यवान पैलू होता. त्यांचे चारित्र्य इतके शुद्ध की सा-या जगाने त्यापुढे नम्र व्हावे. सुभाषबाबूंचे चरित्र्य ज्वालेसारखे धगधगीत व शुद्ध होते. यांचे कार्य संपूर्ण विश्वाला व स्वातंत्र्यपथावरील असंख्य वाटसरूंना मार्गदर्शक झाल्याशिवाय राहणार नाही. स्वातंत्र्याच्या कार्यासाठी त्यांना संपूर्ण विश्व आदर्श मानते त्याग, बलिदान हे गुण स्वातंत्र्यासाठी प्रेरणा देणारे आहेत. ज्वलंत देशभक्ती प्रत्येक युवकात जागवायची असेल तर प्रखरतेच्या ज्योतीवर पेटवून घ्यावी. साहस, निश्चयता, धैर्य या गुणांचा अंगीकार करावयाचा असेल तर सुभाषबाबूंच्या देणारे राष्ट्रीय कार्य हजारो वर्ष प्रेरणा देत राहील. भारतीय स्वातंत्र्याचा जन्म जवळ आणणा-या या महापुरुषाच्या स्मृतीला कोटी कोटी प्रणाम!
लेखक : धोंडीरामसिंह राजपूत, औरंगाबाद
स्त्रोत : शिक्षण संक्रमण , जानेवारी २०१७
अंतिम सुधारित : 7/31/2023