অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

इंजिनियर, एअर मार्शल अ‍ॅस्पी मेरवान

इंजिनियर, एअर मार्शल अ‍ॅस्पी मेरवान

जन्म -१५ डिसेंबर १९१२ . भारताचे माझी हवाईदल-प्रमुख, उच्च शिक्षण कराची येथील दयाराम जेठमल सिंध महाविद्यालयात. इंग्‍लंडमधील क्रॅनवेल व ब्रॅकनेल येथील शाही विमानदलाच्या महाविद्यालयांत विमानोड्डाणाचे प्रशिक्षण. लंडनच्या शाही संरक्षण महाविद्यालयाचे पदवीधर. इंग्‍लंडपासून हिंदुस्थानपर्यंत एका महिन्यात विमानोड्डाण करणारे पहिले भारतीय म्हणून त्याना आगाखान पारितोषिक देण्यात आले (१९३०). क्रॅनवेल येथे वैमानिक कौशल्याबद्दल ग्रोव्ह्‌‌‌ज पारितोषिक (१९३३). १९५८ पर्यंत भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख. पुढे एअर मार्शल म्हणून बढती (१९५९). हिंदुस्थान एअरक्रॅफ्ट लिमिटेड या संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक (मे १९५८–नोव्हेंबर १९६०). भारतीय विमानदलाचे प्रमुख (डिसेंबर १९६०–एप्रिल १९६४). १९६४–६८ या काळात ते भारताचे इराणातील राजदूत होते. दुसऱ्या जागतिक महायुद्धातील कामगिरीबद्दल इंजिनियर यांना विशिष्ट सेवापदक (डिस्टिंग्विश्ड फ्लाइंग क्रॉस) देण्यात आले. या महायुद्धात ते हिंदी विमानदलाच्या ब्रह्मदेश व त्याच्या परिसरातील हवाई कारवाईत सहभागी होते.

लेखक : य. रा. टिपणीस

स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/27/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate