অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ओल्डुवायी गॉर्ज

ओल्डुवायी गॉर्ज

आफ्रिकेच्या टांझानिया प्रदेशातील पुराणाश्मयुगीन अवशषांचे प्रसिद्ध स्थळ. ते व्हिक्टोरिया सरोवराच्या आग्‍नेयीकडील सेरेगेटी ह्या सु. १,५२५ मी. उंच गवताळ पठाराच्या पूर्वेस असलेल्या सुप्रसिद्ध खचदरीत आढळले. ओल्डुवायी नदीच्या पाणलोटाने धुपून जाऊन उघड्या पडलेल्या थरांत एल्. एस्. बी. लीकी यांना १९५९ मध्ये अश्मीभूत मानवी अवशेष सापडले. त्या मानवास त्यांनी झिंजॅनथ्रपस हे नाव दिले. यात मोठे दात व कवटीचे तुकडे होते. या माणसाचा काळ इ. स. पू. सु. १७ लाख असावा, असा तज्ञांचा अंदाज आहे. याच्याबरोबर दगडी हत्यारे, त्रिदळी खूर असलेल्या घोड्याचे व तत्कालीन हत्तीचे अश्मीभूत अवशेषही मिळाले. त्यापेक्षाही प्राचीन अशा होमो  हॅबिलिस या मानवाचे १८ १/४ लाख वर्षांपूर्वीचे अवशेषही तेथेच मिळाले आहेत. दगडांची हत्यारे प्रथम एका बाजूस छिलके  काढून नंतर त्याविरूद्धच्या बाजूची  छिलके काढून धारदार कडा केलेली आढळतात. यातूनच पुढे दगडी हातकुऱ्‍हाड बनविली गेली असावी. त्यामुळे अॅबेव्हिलियन काळापासून ते उत्तर अ‍ॅश्युलियन काळापर्यंतचा उत्क्रम मिळाला आहे.

संदर्भ :Grosvenor, M.B., Ed. National Geographic, November, 1966, Washington, 1966.

लेखक : शां. भा. देव

माहिती स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate