'ब्लु मून' म्हणजेच 'निळा चंद्र'. म्हणजे रोज दिसणारा करड्या रंगाचा चंद्र खरेच निळा दिसणार?
मुळीच नाही. त्या दिवशी देखील चंद्र जसा नेहमी दिसतो तसाच निळा दिसणार.
साधारण एका महिन्यात जेव्हा दोन पौर्णिमा येतात तेव्हा त्या दुसर्या पौर्णिमेस 'ब्लु मून' अशा वेगळ्या नावाने संबोधतात.
आपल्या इथे 'हा कधी तरी अमावास्या-पौर्णिमेला उगवतो' अशी एक म्हण आहे म्हणजेच क्वचित घडणार्या गोष्टींसाठी आपण ही म्हण वापरतो. तशीच परदेशात 'वन्स इन अ ब्लु मून' - 'पुन्हा एकदा निळ्या चंद्राच्या वेळी' अशी म्हण आहे. दुर्मिळ अथवा क्वचित घडणार्या गोष्टींसाठी ही म्हण वापरली जाते. एकाच महिन्यात दोन पौर्णिमा किंवा अमावस्या ही देखिल अशीच एक दुर्मिळ घटना आहे.
ज्या वेळेस एका महिन्यामध्ये दोन पौर्णिमा येतात तेव्हा त्या दुसर्या पौर्णिमेस 'ब्लु मून' ( निळा चंद्र ) तर एका महिन्यामध्ये जेव्हा दोन अमावस्या आल्यास त्यास 'ब्लॅक मून' ( काळा चंद्र ) असे म्हणतात.
आपणास निळा चंद्र पाहायचा असेल तर त्यावर एकच उपाय म्हणजे निळ्या काचेमधून चंद्र पाहायचा आणि जर तुम्हाला हिरवा अथवा लाल चंद्र पाहायचा असेल तर मग आपणास हव्या त्या रंगाची काच वापरून चंद्र पाहायचा.
माहिती स्रोत: अवकाशवेध.कॉम
अंतिम सुधारित : 7/26/2023
पृथ्वीचा उपग्रह चंद्र पृथ्वीपासून साधारण ३ लाख कि....
निळा भुंगेरा या किडीचा प्रादुर्भाव भात पीक फुटव्या...