रात्रीच्या अवकाशामध्ये आपणास अनेक तारे दिसतात. ह्या विखुरलेल्या तार्यांना नंतर समूहांमध्ये विभागण्यात आले. ह्या समूहांना त्यांच्या काल्पनिक आकृतीनुसार नावे देण्यात आली. समूहामध्ये असलेले तारे जवळ जरी वाटत असले तरी प्रत्यक्षात मात्र एकमेकांपासून पुष्कळ लांब आहेत.
पृथ्वीवरून तार्यांना पाहताना आपण त्यांना एका सरळ रेषेमध्ये पाहत असतो त्यामुळे अवकाशातील एका विशिष्ट अंतराच्या प्रतलामध्ये आपणास ते एका समान अंतरावर समूहाने असल्याचा भास होतो.
वरील चित्रावरून आपणास कळेल की मृग तारकासमुहातील तारे एकत्र जरी वाटत असले तरी ते ५० ते २२५ प्रकाशवर्ष एवढ्या प्रचंड अंतरामध्ये विखुरलेले आहेत.
चित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे समोरून पाहिल्यास पुढे-मागे असलेले हे तारे एका सरळ प्रतलामध्ये आढळतात व त्यावरून ते सर्व तारे एकाच समूहातील असल्याचा भास होतो.
माहिती स्रोत: अवकाशवेध.कॉम
अंतिम सुधारित : 8/11/2023
महाराष्ट्र राज्यात डोंगराळ व दुर्गम भागात राहणाऱ्य...
काही महत्त्वाच्या रुपविकारी तारकाबाबत माहिती.
८८ तारकासमुहांची नावे
सूर्यानंतरच्या २० तेजस्वी तारकाबद्दल माहिती.