मंगळ आणि गुरू ग्रहांच्यामध्ये अनेक लघुग्रहांचा शोध लागला. त्याच प्रमाणे नेप्च्यून ग्रहाच्या पुढे देखिल असाच लघुग्रहांचा पट्टा असावा असे सर्वप्रथम गेरार्ड क्युपर या शास्त्रज्ञाने १९५१ मध्ये सुचविले. म्हणून त्याच्या स्मरणार्थ या लघुग्रहांच्या पट्ट्यास क्युपर बेल्ट हे नाव देण्यात आले.
या शास्त्रज्ञाने ह्या पट्ट्याचे सूर्यापासूनचे अंतर ३५ ते ५० खगोलीय एकक इतके असावे असे वर्तविले. क्युपर बेल्टमधिल सर्व खडक गोठविलेल्या बर्फाच्या आवरणामध्ये आढळतात.
१९९२ मध्ये सर्वप्रथम क्युपर बेल्ट मधील पहिला '1992 QB1' हा लघुग्रह शोधला गेला.
काही शास्त्रज्ञांच्या मते नेप्च्यून ग्रहाच्या पुढे असलेल्या प्लुटो ग्रहाचा चंद्र (उपग्रह) शेरॉन हा देखिल सुरवातीला क्युपर बेल्टचाच भाग असावा, जो नंतर प्लुटोचा चंद्र झाला असावा.
माहिती स्रोत: अवकाशवेध.कॉम
अंतिम सुधारित : 7/26/2023