অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

'संगणक' बदलत्या जीवनशैलीची गरज...

'संगणक' बदलत्या जीवनशैलीची गरज...

सन 1822 मध्ये 'चार्ल्स बॅबेज' यांनी पहिला संगणक बनविला. हा संगणक फक्त आकडेमोड करण्यासाठी वापरला जात होता. नंतर त्यात अनेक शोध लागले आणि बदलही घडून आले. 1975 साली पहिला पोर्टेबेल कम्प्युटर बनविण्यात आला. आज आपण पाहतो तो कम्प्युटर टॅब आणि मोबाईलमध्येही वापरता येऊ शकतो इतक्या छोट्या स्वरूपात आणि जास्तीत जास्त वापरात असलेला आहे. मोबाईल जेवढी काळाची गरज आहे तेवढाच संगणकही, प्रचंड मोठ्या प्रमाणात संगणकात बदल घडून आले आणि संगणकाशी संबंधित आणि त्यावर अवलंबून असलेले क्षेत्र जलद गतीने विकसीत होत आहे.

माहिती पाठवणे, तिचे वर्गीकरण करणे इतकेच नाही तर ध्वनी निर्मिती, चित्रीकरण अन्य असंख्य कामासाठी संगणकाचा वापर होवू लागला आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर संगणक हे माहिती स्वीकारणारे, दिलेल्या सूचनानुसार माहिती प्रक्रिया करून अचूक उत्तर देणारे वेगवान इलेक्ट्रोनिक्स यंत्र आहे.

आज खाजगी कंपन्यांपासून ते सरकारी कार्यालयांपर्यंत पेपरलेस वर्क करण्याचा प्रयत्न सुरू असून, संगणकाचे वापराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. संगणक क्षेत्रात करियरच्या संधीही तेवढ्याच मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर इंजिनिअरींग असे दोन प्रकार असून, आपण दोन्ही क्षेत्राशी संबंधित शिक्षणक्रमांची माहिती घेऊ.

बी.सी.ए. (बॅचलर इन कम्प्युटर अप्लीकेशन) शिक्षणक्रमाचे 81 महाविद्यालय महाराष्ट्रात आहेत.

बी.सी.ए. - हा तीन वर्षाचा पूर्ण वेळ शिक्षणक्रम असून, 10+2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. हा शिक्षणक्रम तुम्ही यशस्वीरित्या पूर्ण केल्यास दीड लाख ते साडे तीन लाख वर्षाचे वेतन तुम्ही कोणत्याही नामांकित कंपनीमध्ये मिळवू शकता. पुणे येथे 49 महाविद्यालयांत, मुंबई आणि उपनगरात 24 महाविद्यालय आहेत. तर ॲपटेक कम्प्युटर एज्युकेशन आणि संदीप विद्यापीठ नाशिक यासह इतर जिल्ह्यातही संबंधित शिक्षणक्रम उपलब्ध आहेत.

डिप्लोमा इन कम्प्युटरायझींग ॲण्ड डाटा प्रोसेसिंग ॲण्ड मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम - हा मुंबई विद्यापीठाचा दोन वर्षाचा पदविका शिक्षणक्रम आहे. फोर्ट येथील मुंबई विद्यापीठ येथे हा शिक्षणक्रम सुरू आहे.

बी.एसस्सी. हार्डवेअर ॲण्ड नेटवर्कींग - हा तीन वर्षाचा पदवी पूर्ण वेळ शिक्षणक्रम आहे. यास प्रवेश घेण्यासाठी 10+2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. कम्प्युटर आर्कीटेक्चर नंबर सिस्टम, ऑपरेटिंग सिस्टम, इन्स्टॉलेशन ॲण्ड युटीलिटी, स्ट्रक्चर ऑफ प्रोग्रामींग, फंडामेंटल ऑफ कम्प्युटर ॲण्ड बेसिक इलेक्ट्रॉनिक्स आदि विषयांचा अभ्यासक्रमात समावेश असतो.

बी.सी.ए. इन गेम सॉफ्टवेअर ॲण्ड डेव्हलपमेंट - हा तीन वर्षाचा पदवी शिक्षणक्रम असून, मॅथ्स आणि फिजीक्ससह 10+2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. इन्ट्रो टू जावा प्रोग्रामींग, गेम डिझाईनिंग, प्रोग्रामींग युजींग C++, सॉफ्टवेअर इंजिनिअरींग, मल्टिप्लेअर प्रोग्रामींग, प्रोजेक्ट मॅनेजमेंट आदीसारखे विषय अभ्यासक्रमात असतात. अंदाजे साडेतीन लाख शिक्षणक्रमाचे शुल्क असते. ए.के.स्टुडिओ, एशियानेट न्युज, सीएनएन आयबीएन, ग्लोबल डीजे, रिलायन्स मिडीया वर्क आदी नामांकित कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी प्राप्त होते.

बीबीए इन कम्प्युटर अप्लीकेशन - हा तीन वर्षाचा पूर्णवेळ शिक्षणक्रम असून, 12 वीमध्ये किमान 40 टक्के असणे आवश्यक आहे. बिझनेस कम्युनिकेशन, एलिमेंट ऑफ स्टॅटिस्टीक, सॉफ्टवेअर इंजिनिअरींग, व्हीज्युअल बेसिक, कोरल जावा, मल्टिमिडीया सिस्टम आदी विषयांचा अभ्यासक्रमात समावेश आहे. अंदाजे एक लाख शैक्षणिक शुल्क आकारले जाते.

डिप्लोमा इन कम्प्युटर अप्लीकेशन - हा दोन वर्षाचा पूर्ण वेळ पदविका शिक्षणक्रम आहे. या शिक्षणक्रमाचे अंदाजे 40 ते 50 हजार शुल्क असून, विविध सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी प्राप्त होते.

सॉफ्टवेअर आणि हाडॅवेअर या संबंधित शिक्षणक्रम पूर्ण केल्यानंतर नोकरीच नाही तर तुम्ही स्वत:चा व्यावसायही सुरू करू शकता. सॉफ्टवेअर चे विद्यार्थी ऑनलाईन राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कोणतेही प्रोजेक्ट किंवा काम ऑनलाईन घरी बसूनही पूर्ण करू शकतात. प्रामणिकपणे आणि वेळेत काम पुर्ण केल्यास जागतिक बाजारात तुम्हाला अनेक संधी उपलब्ध आहेत. जगातील इतर देशांपेक्षा भारतातील सेवा शुल्क कमी असल्याने सॉफ्टवेअरच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रोजेक्ट/कामाच्या अधिकाधिक संधी उपलब्ध असतात. हार्डवेअर क्षेत्रात तुम्ही स्वत:चा उद्योग सुरू करू शकता. भविष्यात शाळेतही पूर्णत: डिजीटलाझेशन होईल आणि विद्यार्थीही संगणकावरच अभ्यास करतील ही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या क्षेत्रात भविष्यात करियरच्या प्रचंड संधी उपलब्ध आहेत.

लेखिका - श्रद्धा मेश्राम नलावडे

meshram.shraddha@gmail.com

माहिती स्रोत : महान्यूज

अंतिम सुधारित : 4/9/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate