অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

नौदलातील संधी..!

नौदलातील संधी..!

आयुष्याला वळण देणारे करियर…

आपण सर्वांनाच नौदलाचे नेहमीच आकर्षण राहिले आहे. सर्वसामान्यांपेक्षा वेगळ्या पद्धतीने आयुष्य जगण्याची संधी, उत्तम पगार, जग फिरण्याची संधी, समाजात मिळणारा मान अशा अनेक गोष्टी तरूणांना या क्षेत्राकडे आकर्षित करतात. नौदलातील अनुभव आयुष्याला वेगळे वळण देऊन जाते. विविध कौशल्य विकसीत करण्याची संधी इथे मिळते, स्वत:चे व कुटूंबाचे आयुष्य सुरक्षित करता येते…अशा एक ना अनेक कारणांमुळे तरूण इतर क्षेत्रापेक्षा नौदलातील क्षेत्राकडे वळताना दिसत आहेत.

आव्हानात्मक आणि अफाट समाधान देणारे नौदल क्षेत्र असून, भारत सरकारच्या सुरक्षा मंत्रालयाअंतर्गत कार्यरत आहे. राष्ट्पती हे नौदलाचे प्रमुख हे असतात. तर नौदलातील ॲडमिरल हे सर्वोच्च पद आहे. समुद्रातील आव्हानात्मक वातावरणात साहस आणि कार्य करण्याची संधी नौदल देते. नौदलात नाविक आणि अधिकारी या दोन विभागात तुम्ही करियर करू शकता. उच्च तंत्रज्ञान असलेल्या संस्थेचा एक भाग होण्याची संधी या विभागातील विविध पदांद्वारे तुम्हाला प्राप्त होते. आपली शिक्षण आणि कौशल्य याद्वारे या विभागातील विविध पदांसाठी अर्ज करता येतो.

नाविक विभागातील पदांसाठी डिसेंबर - जानेवारी आणि जुन-जुलै या कालावधीत अर्ज करता येतो. आर्टीफिशीयर आणि नाविक या पदासाठी १०+२ शिक्षण पूर्ण असणे आवश्यक असून, मॅथ्स् + फिजीक्स् किंवा केमेस्ट्री किंवा बायोलॉजी किंवा कम्प्यूटर सायन्स हे विषय असणे आवश्यक आहे. मॅट्रीक रिक्रूटमेंट अंतर्गत शेफ, स्टीवड्र, सॅनिटरी हायजिनीस्ट या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. या तीनही पदासाठी १७ ते २१ वयोमर्यादा असलेले उमेदवार अर्ज करू शकतात किमान १० वी उत्तीर्ण व त्या क्षेत्रातील कौशल्य असणे आवश्यक आहे. याचबरोबर म्युझिक इन्स्ट्रूमेंट (संगीत वाद्य) वाजविण्याचे ज्ञान असलेला १० वी उत्तीर्ण व्यक्ती म्युझिशियन या पदासाठी अर्ज करू शकतो.

अधिकारी या विभागात कार्यकारी, अभियांत्रिकी, इलेक्ट्रीकल (विद्युत), एज्युकेशन (शिक्षण), मेडीकल (वैद्यकीय) या विविध क्षेत्रातील उमेदवार अर्ज करून सरळ अधिकारी पदावर रूजू होऊ शकतात. केंद्रीय लोकसेवा आयोग, शॉर्ट सर्व्हीस कमिशन आणि युनीर्व्हसीटी एन्ट्री स्कीम याद्वारे अधिकारी पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. जहाजाचा कार्यभार सांभाळण्याची संधी कार्यकारी अधिकारी या पदावर असताना मिळते. या विभागात सामान्य सेवा अधिकारी, जलमापनचित्र अधिकारी (Hydrographer) या पदासाठी बी.ई. किंवा बी.टेक्नॉलॉजी शिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे.

पायलट आणि निरिक्षक (स्त्री/ पुरूष) आणि हवाई वाहतूक नियंत्रक अधिकारी या पदासाठी अर्ज करावयाचा असेल तर भौतिकशास्त्र आणि गणितासह १२ वी आणि बी.ई. किंवा बी.टेक्नॉलॉजी शिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे. लॉजिस्टीक या पदासाठी बी.ई. किंवा बी.टेक., किंवा एम.बी.ए. किंवा बी.एस.सी.,

/बी.कॉम./बी.एसस्सी आय.टी प्रथम श्रेणीमध्ये, किंवा एम.सी.ए./एम.एस.स्सी प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

नौदल शस्त्र तपासणीक या पदासाठी अर्ज करण्यासाठी बी.ई./बी.टेक ६० टक्केसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. माहिती तंत्रज्ञान अधिकारी या पदासाठी अर्ज करण्यासाठी बी.ई./बी.टेक किंवा बी.एसस्सी, आयटी किंवा एम.टेक. किंवा एम.एसस्सी किंवा बी.सी.ए./एम.सी.ए. ६० टक्केसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. कायदा विभागात जज ॲडव्होकेट जनरल या पदासाठी अर्ज करावयाचा असेल तर कायदा विषयाची पदवी असणे आवश्यक आहे. तर, क्रीडापट्टू पदव्युत्तर पदवी आणि क्रीडा प्रशिक्षणार्थीची पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. म्युझिशियन या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे.

इंजीनिअरींग या विभागात इंजीनिअर जनरल सर्व्हीस, इलेक्ट्रीकल जनरल सर्व्हीस आणि नेव्हल आर्कीटेक्चर या पदासाठी अर्ज करावयाचा असेल तर बी.ई किंवा बी.टेक. ६० टक्केसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सबमरीन या पदासाठी बी.ई./बी.टेक. ५५ टक्केसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. इलेक्ट्रीकल या विभागात सबमरीन बी.ई./बी.टेक ५५ टक्केसह उत्तीर्ण असणे आवश्यक असून, मेडीकल विभागात बी.एस.सी., एमबीबीएस किंवा विज्ञान क्षेत्रातील १० +2 उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.

वैयक्तीक गुणवत्ता आणि क्षमतेच्या आधारावर नौदलात संधी प्राप्त होतात. या क्षेत्रात कार्य करून देशाप्रती सेवा करण्याची संधीही नौदल आपणास देते.

लेखक: श्रद्धा मेश्राम नलावडे

ईमेल: meshram.shraddha@gmail.com

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 4/28/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate