केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत देशातील सर्वात महत्त्वपूर्ण आणि सर्वात कठीण अशी नागरीसेवा परीक्षा घेतली जाते. या परीक्षेविषयी मोठ्या प्रमाणावर जागृती निर्माण झाली आहे. लहान-लहान गावातील अनेक मुले या परीक्षेकडे वळत आहेत.
युपीएसएसीची परीक्षा ही तीन टप्प्यांमध्ये घेतली जाते. त्यामध्ये पूर्व परीक्षा ही 400 गुणांची असते त्यात पहिला पेपर हा सामान्य अध्ययन 200 गुण व दुसरा पेपर सी-सॅट 200 गुण असे 400 गुण या पूर्व परीक्षेसाठी असतात. ही परीक्षा 5वी ते 10वीच्या तसेच एनसीईआरटीच्या पुस्तकांच्या व सामान्यज्ञानाच्या धर्तीवर असते, तर सी-सॅटचा पेपर हा निर्णय क्षमता, संवाद कौशल्य, समस्या सोडवणूक, तर्कनिष्ठपणा, बुद्धिमत्ता यावर आधारित असतो. या परीक्षेत फक्त सामान्य अध्ययन हा पेपरच यशस्वितेसाठी ग्राह्य धरला जातो. तर सी-सॅट पेपरचे गुण हे साधारण 33 टक्के गुण उत्तीर्णसाठी आवश्यक असतात. या परीक्षेत ज्यांना 120 च्या वर गुण मिळतील ते विद्यार्थी शक्यतो मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतात.
दुसरा टप्पा मुख्य परीक्षेचा आहे. ही मुख्य परीक्षा 1750 गुणांची असते. त्यामध्ये इंग्रजी भाषा हा पेपर अनिवार्य असतो. व दुसरा पेपर भाषेचा असतो. यामध्ये कुठलीही भाषा निवडता येते. या दोन्ही पेपरसाठी प्रत्येकी 300 गुण आहेत. मात्र या दोन्ही विषयाचे गुण केवळ उत्तीर्णसाठी ग्राह्य धरले जातात. साधारणत: 35 टक्के गुण त्यामध्ये असणे आवश्यक आहे. या गुणांची मुख्य परीक्षेच्या गुणांमध्ये गणना केली जात नाही. जे गुण मुख्य परीक्षेसाठी ग्राह्य धरले जातात त्यामध्ये पेपर-ख हा निबंधलेखनाचा असतो त्याला 250 गुण असतात. सामान्य अध्ययनांचे एकूण चार पेपर असतात. या प्रत्येक पेपरला 250 एवढे गुण असतात व हे सर्व पेपर वस्तुनिष्ठ स्वरूपात आहेत. यातील सामान्य अध्ययन (खख) या पेपरसाठी भारतीय वारसा, संस्कृती, जागतिक इतिहास-भूगोल आणि समाज इत्यादी घटकांचा समावेश आहे. सामान्य अध्ययन (खखख) या पेपरमध्ये शासन, राज्यघटना, राज्यशास्त्र, सामाजिक न्याय, आंतरराष्ट्रीय संबंध आदी घटकांचा समावेश आहे.
सामान्य अध्ययन (खत) यामध्ये तंत्रज्ञान, अर्थशास्त्र, विकास, जैव वैविधता, पर्यावरण, सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन आदि घटकांचा समावेश आहे. सामान्य अध्ययन (त) यामध्ये नैतिक मूल्य, एकात्मता आणि प्रवृत्ती याचा अंतर्भाव आहे. या परीक्षेसाठी दोन विषय वैकल्पिक म्हणून निवडावे लागतात. प्रत्येकी 250 गुण आहेत. या विषयांची यादी अशी - कृषी, पशु विज्ञान, मानववंशशास्त्र, वनस्पती शास्त्र, रसायन शास्त्र, स्थापत्य अभियांत्रिकिशास्त्र, वाणिज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विद्युत अभियांत्रिकी, भूगोल, भूगर्भशास्त्र, भारतीय इतिहास, कायदा, व्यवस्थापन, गणित, इत्यादींचा समावेश आहे. तर मुलाखतीसाठी 275 गुण आहेत.
स्त्रोत - महान्युज
अंतिम सुधारित : 7/23/2020
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजनेखालील तातडीची वैद्यक...
ज्या विद्यार्थ्याला नागरी सेवेत प्रवेश करावयाचा आह...
दर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात आरोग्य सेवे...
यात पूरक आहार,वजनवाढ-नोंदी, 'अ'जीवनसत्त्व वाटप आणि...