पंचायत युवा क्रीडा व खेळ अभियान (पायाका)
पंचायत युवा क्रीडा व खेळ अभियान (पायाका)
|
क्रीडाविषयक सुविधा केवळ मोठ्या शहरात होण्याऎवजी ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध होणे आवश्यक आहे. या स्तरावर क्रीडा सुविधा उपलब्ध झाल्यास त्याचा लाभ ग्रामीण खेळाडूंना मिळू शकतो. या हेतूने देशातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये किमान क्रीडा सुविधा उपलब्ध करण्याची योजना पंचायत युवा क्रीडा व खेळ अभियान हा महत्वाकांक्षी प्रकल्प केंद्र शासनाच्या युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयामार्फत सन २००८-०९या वर्षात राबविण्यात आला.
|
सदर योजनेंअंतर्गत सन २००८-०९ ते २०१६-१७ या कालावधीत पहिल्या ४ वर्षासाठी दरवर्षी १० टक्के ग्रामपंचायती व उर्वरीत ५ वर्षासाठी १२ टक्के ग्रामपंचायती अशाप्रकारे ९ वर्षात सर्व ग्रामपंचायती व त्याच प्रमाणात पंचायत समित्यांना योजनेचा लाभ दिला जाणार आहे. या योजनेमध्ये देशातील सुमारे ६३६३ पंचायत समित्या व २,००,००० ग्रामपंचायतींना लाभ मिळणार आहे.
|
सदर अभियानाद्वारे संपूर्ण देशातील ग्रामीण भागात पंचायत व ग्राम स्तरावर क्रीडाविषयक किमान क्रीडा सुविधांची निर्मिती, क्रीडा विषयक उपक्रमांचे नियोजन, क्रीडा प्रशिक्षण, क्रीडा स्पर्धा सहभाग, तालुका, जिल्हा, राज्य व राष्ट्रीयस्तरावर क्रीडा स्पर्धाचे आयोजन करून या माध्यमातून क्रीडा वातावरण निर्मिती व क्रीडा विषयक जागृती निर्माण करण्यात येत आहे.
|
|
अनुदानाच्या बाबी :
सदर योजना राज्यात राबविण्याकरिता केंद्रशासनामार्फत बीज भांडवलापोटी ७५ टक्के तर राज्य शासनामार्फत २५ टक्के तरतूद देण्यात येत आहे. इतर सर्व बाबीकरिता १०० टक्के अनुदान केंद्र शासनामार्फत प्राप्त होणर आहे. उपलब्ध होणा-या तरतूदीतून खालील शिर्षावर निधी खर्च होत आहे.
|
अ.क्र.
|
अनुदानाची बाब
|
अनुदानाचा दर
|
१.
|
क्रीडा सुविधा निर्मिती (बीज भांडवल)
|
- १.०० लक्ष प्रति ग्रामपंचायत व - ५.०० लक्ष प्रति पंचायत समिती
|
२.
|
वार्षिक निर्वाह अनुदान
|
- ०.१० लक्ष प्रति ग्रामपंचायत व - ०.२० लक्ष प्रति पंचायत समिती
|
३.
|
व्यवस्थापन अनुदान
|
- ०.१२ लक्ष प्रति ग्रामपंचायत व - ०.२४ लक्ष प्रति पंचायत समिती
|
४.
|
क्रीडा स्पर्धा अनुदान
|
- ०.५० लक्ष प्रति पंचायत समिती व - २.०० लक्ष प्रति जिल्हा
|
५.
|
पारितोषिक अनुदान
|
खेळाडूंना रोख पारितोषिक :
राज्यस्तर |
जिल्हास्तर |
तालुकास्तर |
प्रथम - ४००/- |
प्रथम - १५०/- |
प्रथम - १२०/- |
द्वितीय - २००/- |
द्वितीय - १००/- |
द्वितीय - ८०/- |
तृतीय - १२५/- |
तृतीय - ७५/- |
तृतीय - ६०/- |
|
|
- पंचायत युवा क्रीडा व खेळ अभियान या योजनेच्या प्रभावी अमंलबजावणीबाबत राज्य शासनाने शासन निर्णय क्र.केंपुयो-२००८/(प्र.क्र./२१७/०८)/क्रीयुसे-१ दि.११ जानेवारी, २०१० रोजी निर्गमित केलेला आहे. याअनुषंगाने राज्यस्तरावर मा. मुख्य सचिव यांचे अध्यक्षतेखाली समितीचे गठन करण्यात आले असून जिल्हास्तरावर मा. जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली समितीचे गठन करण्यात आले आहे.
- राज्यातील ३५ पैकी ३३ जिल्हयात सदर योजना राबविण्यात येत आहे. मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे त्या ठिकाणी ग्रामपंचायती नसल्याने वगळण्यात आलेले आहेत.
- सन २००८-०९ मध्ये पायका अंतर्गत निवडण्यात आलेल्या २६८९ ग्रामपंचायाती व ३५ पंचायत समिती करिता बीज भांडवला अनुदान रक्कम ₹.२८६४.०० लक्ष वितरीत करण्यात आलेली आहे व वार्षिक व्यवस्थापन अनुदान ₹.३३१.०८ लक्ष वितरीत करण्यात आलेली आहे. तसेच वार्षिक निर्वाह अनुदान ₹.२७५.९० लक्ष (क्रीडा साहित्य) वितरीत करण्यात आलेले आहे.
- अशाप्रकारे सन २००९-१० मध्ये पायका अंतर्गत निवडण्यात आलेल्या २७५२ ग्रामपंचायाती व ३५ पंचायत समिती करिता बीज भांडवला अनुदान रक्कम ₹.२९२७.०० लक्ष वितरीत करण्यात आलेली आहे व वार्षिक व्यवस्थापन अनुदान ₹.३८.६४ लक्ष वितरीत करण्यात आलेली आहे. तसेच वार्षिक निर्वाह अनुदान ₹.२८२.२० लक्ष (क्रीडा साहित्य) वितरीत करण्यात आलेले आहे.
- सद्य:स्थितीत सन २००८-०९ मध्ये पायका अंतर्गत निवडण्यात आलेल्या २६८९ ग्रामपंचायाती व ३५ पंचायत समिती पैकी २५२६ ठिकाणी जागा प्राप्त झालेले असून १३९३ ठिकाणी काम पूर्ण झालेले आहे. तर १०३१ ठिकाणी काम प्रगतीपथावर आहे तसेच २३८७ क्रीडाश्रीची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
- सद्य:स्थितीत सन २००९-१० मध्ये पायका अंतर्गत निवडण्यात आलेल्या २७५२ ग्रामपंचायाती व ३५ पंचायत समिती पैकी २०५२ ठिकाणी जागा प्राप्त झालेले असून ६२३ ठिकाणी काम पूर्ण झालेले आहे. तर ९३३ ठिकाणी काम प्रगतीपथावर आहे तसेच १४६० क्रीडाश्रीची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
क्रीडाश्री:
- सदर पायका क्रीडा केंद्राच्या ठिकाणी केंद्रशासनाच्या निर्देशाप्रमाणे विविध खेळांचे प्रशिक्षण देण्यासाठी "क्रीडाश्री" च्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत.
- क्रीडाश्री करिता अर्ज करणारी व्यक्ती त्याच गावातील रहिवासी असावी.
- त्याच गावातील माध्यमिक/प्राथमिक शाळॆतील बी.पी.एड. शिक्षक, बी.पी,एड. पदवीधारक बेरोजगार व्यक्ती, बेरोजगार पदवीधर, राष्ट्रीय / राज्यस्तर स्पर्धेत प्राविण्य अथवा सहभागी खेळाडू, गावातील माजी सैनिक, इतर विषयाचा शिक्षक असून खेळाबद्दल आवड व ज्ञान असणा-या व्यक्तीची निवड क्रीडाश्री म्हणून ग्रामपंचायतस्तर समितीद्वारे केली जाते.
- क्रीडाश्री गाव पातळीवरील क्रीडा सुविधांची देखभाल करतात व युवकांना क्रीडा प्रशिक्षण देतात.
- नियुक्त केल्या जाणा-या क्रीडाश्रींना राज्य शासनामार्फत प्रशिक्षण देण्यात येते.
|
माहिती संकलक : अतुल पगार
स्त्रोत : https://sports.maharashtra.gov.in/sportsmh/marathi/pykka_m.html
अंतिम सुधारित : 6/7/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.