महाराष्ट्र राज्यातील नामवंत सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्याची योजना सन १९६९-७० पासून आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नांव उज्ज्वल करणारे खेळाडू घडविणा-या क्रीडा मार्गदर्शकांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार देण्याची योजना सन १९८८-८९ पासून शासनाने अंमलात आणली आहे. तसेच ज्येष्ठ क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक, संघटक/कार्यकर्ते व क्रीडा क्षेत्राशी संबंधित अशा ज्या व्यक्तींनी क्रीडा व खेळासाठी आपले सर्वस्व पणाला लावून आपले जीवन क्रीडाविकासासाठी व्यतीत केले आहे, अशा ज्येष्ठ क्रीडा महर्षिचा गौरव करण्यासाठी सन २००१-२००२पासून महाराष्ट्र शासनाने शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कारदेण्याची योजना अंमलात आणली आहे.
आपल्या खेळाबद्दलच्या भावना आणि संस्कृती जपण्यासाठी क्रीडा संचालनालय प्रयत्नशीलपूर्वक विविध गौरवशाली पुरस्कार देत आहे. शासन निर्णय,शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.शिछपु-२०११/ प्र.क्र.१९८/२०११/क्रीयुसे-२, दि.१ ऑक्टोबर,२०१२ अन्वये पुरस्काराच्या सुधारित नियमावलीस मान्यता देण्यात आलेली आहे.
क्लीक करा. ऑनलाईन शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार अर्ज.
माहिती संकलक : अतुल पगार
स्त्रोत : https://sports.maharashtra.gov.in/sportsmh/marathi/awards_m.html
अंतिम सुधारित : 4/27/2020
राज्यात पुणे, कोल्हापूर, सांगली, ठाणे, अमरावती, अक...
आशियातील खेळाडूंसाठी सुरू झालेले आंतरराष्ट्रीय साम...
ट्रॅक्टरचलित "क्रिडा' टोकणयंत्राचा वापर केल्यास उ...
आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक संघटनेमार्फत सर्वराष्ट्रांकर...