অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कार्स्ट भूमिस्वरुप

कार्स्ट भूमिस्वरुप

कार्स्ट भूमिस्वरुप

यूगोस्लाव्हियाच्या `कार्स्टविभागात आढळणा.या भूमिस्वरुपाला व फ्रान्ंसइंग्लडं,अमेरिका,क्यूबा, फिलिपीन्सइंडोनिशिया इ. देशांच्या काही भांगात आढळणा-या तशाच भूमिस्वरुपाला कार्स्ट भूमिस्वरुप म्हणतात.

चुनखडकाच्या प्रदेशात हवेतील कार्बन डाय-ऑक्साइडामुळे किंचित अम्लधर्मी झालेले पावसाचे पाणी खडकांच्या फटींत शिरुन चुन्याचा काही अंश विरघळविते. त्यामुळे फटी रुंदावतात;पाणी भूपृष्ठाखालून वाहते व पुढे कोठेतरी बाहेर येते;

भूपृष्ठाखाली लहानमोठया गुहा तयार होतातदीर्घ काळानंतर काहंच्या छपंरापासून लोंबणारे व तळावर उभे असलेले अधोमुख व ऊर्ध्वमुख लवणस्ंतभ तयार होतात;जमिनीवर विवरे तयार होऊन लांबट दरी बनते आणि तेथे न विरघळलेल्या पदार्थांमुळे तयार झालेली मृदा व पाणी यांवर शेती होऊ शकते.  छोटया प्रवाहांचा बहुधा अभावच असतोकारण पावसाचे पाणी चटकन जमिनीतच शिरते. काही गुहा तेथील आश्चर्यकारक नैसर्गिक दृश्यांमुळे प्रवांशाचे आकर्षण ठरल्या आहेत.

कुमठेकरज.ब.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate