অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सदाशिवगड

सदाशिवगड

सदाशिवगड

२ महाराष्ट्रातील छ. शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांपैकी एक डोंगरी किल्ला.

सातारा जिल्ह्यातील कराड शहराच्या ईशान्येस सु. ६ किमी.वर कराड-विजापूर मार्गावर तो आहे. येथे गडाच्या तटबंदीचे अवशेष आढळतात. त्यावरून भिंतींची उंची सु. २·५ मीटर असावी. उत्तरेकडे खोल दरी असून त्या बाजूला प्रवेशद्वार होते; पण ते खचलेले आहे.

किल्ल्यावर चार भक्कम बुरूज होते. तेही अवशेष रूपात आढळतात.

किल्ल्यावरील प्रशस्त पठार सु. ९ हेक्टर असून पाण्याची टाकी व तळी कोरडी पडली आहेत.

किल्ल्यावर महादेवाचे एक मंदिर असून दरवर्षी श्रावण महिन्यात सोमवारी (शेवटच्या) तेथे छोटी यात्रा भरते.

पायथ्याशी त्याच नावाचे खेडे असून तेथे समाजमंदिर आहे.

 

लेखक - सु. र. देशपांडे

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 5/8/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate