अद्भूत निसर्गाचा आनंद लुटायची जर कुणाची इच्छा असेल, तर त्याने नागपुरच्या सक्करदरा भागातील ‘लेक गार्डन’ला अवश्य भेट द्यायला हवी. निसर्गाच्या आनंदासोबतच तुम्हाला मनासारखी विश्रांतीही येथे घेता येईल. या उद्देशासाठी सक्करदर्यातील ‘लेक गार्डन’सारखे दुसरे स्थळ नाही. आठवड्याची सुटी घालविण्यासाठी आणि मनासारखा आनंद लुटण्यासाठी हे सर्वोत्तम स्थळ आहे. या ‘लेक गार्डन’मध्ये खेळण्यासाठी पाच विस्तारित मैदान आहेत.
या गार्डनचे सौंदर्य अप्रतिम आहे. येथील तलावात सूर्योदय आणि सूर्यास्ताचे मनमोहक सौंदर्यही पाहायला मिळते. प्रत्येकांनी आनंद उपभोगावा, असेच हे स्थळ आहे. या गार्डनमध्येच तलाव असल्याने दिवस असो की रात्र, येथील वातावरण नेहमीच थंड असते.
नागपुरच्या महाल भागात असलेला गांधीसागर तलाव हा शुक्रवारी तलाव आणि जुम्मा तलाव या नावानेही ओळखला जातो. रमण सायन्स सेंटरच्या अगदी समोर हा तलाव आहे. सुमारे 275 वर्षांपूर्वी नागपूरचे तत्कालीन राज्यकर्ते चांद सुल्तान यांच्या पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून हा तलाव अस्तित्त्वात आला असल्याचे बोलले जाते. नाग नदीला सोडण्यात येणा-या पाण्यातून या तलावाची निर्मिती करण्यात आली आहे. जलसाठ्याशी संबंधित या तलावाचे नाव जुम्मा तलाव असेही ठेवण्यात आले आहे.
1742 मध्ये पहिले रघुजी यांनी आपल्या राज्याची राजधानी म्हणून नागपूरला घोषित केले आणि भोसले व ब्रिटीशांच्या राज्यकाळात या तलावाचे नाव शुक्रवारी तलाव असेही ठेवण्यात आले. या तलावाच्या मधोमध एक छोटेसे बेट आहे. या बेटावर आकर्षक शिवमंदिर आणि बगिचाही आहे. पिवळ्या रंगांच्या मर्क्युरी दिव्यांमुळे रात्रीच्या वेळी या तलावाचे सौंदर्य अधिकच मोहक असते. येथे येणा-यासाठी नौकाविहाराचीही सोय आहे.
नागपूरच्या फुटाळा तलावाजवळील सेमिनरी हिल्स भागात असलेले सातपुडा बॉटनिकल गार्डन हे अतिशय अदभुत गार्डन असून, हजारो लोकांसाठी ते आकर्षणाचे केंद्रिंबदू ठरले आहे. सिटी सेंटरच्या ईशान्येकडे असलेल्या या सातपुडा बॉटनिकल गार्डनमध्ये अनेक दुर्मिळ वनस्पती आहेत.
जीवशास्त्र, प्राणीशास्त्र आणि पर्यावरण विज्ञानाचा अभ्यास करणार्यांसाठी हे गार्डन अतिशय उपयुक्त ठिकाण आहे. कारण, येथे विविध वनस्पतींची महत्त्वूपर्ण माहिती उपलब्ध आहे. सातपुडा गार्डन आणि आसपासच्या परिसराच्या आल्हाददायक वातावरणात पक्षी तर आहेतच, तरुण जोडपीही वातावरणाचा आनंद घेण्यासाठी येत असतात.
नागपूरपासून 65 किलोमीटर अंतरावर असलेल्या खाप्रा येथील खेकरा नाला हे सौंदर्याने ओतप्रोत असलेले धरणाचे ठिकाण आहे. खापाजवळील छिंदवाडा मार्गावर ते आहे. साहसी कृत्य करणा-यांसाठी विशेषत: पर्वतरोहकांसाठी हे ठिकाण अतिशय आदर्श असेच आहे.
येथील मुख्य आकर्षण म्हणजे, खेकरा नाला धरणाच्या सभोवताल असलेला अतिशय शांत आणि निश्चल असा तलाव, सभोवताल असलेले घनदाट जंगल, हिरवागार निसर्ग, आरोग्यासाठी पोषक वातावरण हे होय. हे सौंदर्य पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातील पर्यटक येथे येत असतात. यामुळेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने पर्यटकांसाठी येथे लॉंजिंग सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
रामटेक तालुक्यात असलेल्या खिंडसी तलावाच्या सभोवताल घनदाट जंगल आहे. नागपूरपासून 53 किलोमीटर आणि रामटेकपासून 3.5 किलोमीटर अंतरावर हा तलाव आहे. वैदर्भिय जनतेसाठी गेल्या अनेक वर्षांपासून हे स्थळ आकर्षक आणि आवडीचे पर्यटन स्थळ बनले आहे. येथे येणारे पर्यटक मोटरबोट्स, पेडल बोट्स, रोवींग बोट्स, वॉटर स्कूटर्स आदींच्या माध्यमातून जलतरणाचा आनंद घेऊ शकतात. लहान मुलांसाठी येथे साहसी पार्कही आहे. तर साहसी साहसी साहसी उपक्रम करणार्या मोठ्यांसाठी जंगलात ट्रेकिंगचीही सुविधा आहे.
नागपूर जिल्हयात नागपूरपासून 80 किलोमीटर अंतरावर असलेल्या रामटेकजवळील पेंच नदीवर असलेले तोतलाडोह नावाचे धरण आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 वर हा परिसर आहे. हे धरण पेंच नदीच्या जलविद्युत प्रकल्पाचा एक भाग आहे. येथील परिसर अतिशय मनमोहक आहे.
नागपूरपासून 56 किलोमीटर अंतरावर पारशिवनी तालुक्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 वर नवेगाव बांध आहे.पारशिवनीच्या वनक्षेत्रात हे धरण अर्थातच बांध आहे. या धरणाच्या सभोवताल अतिशय समृद्ध असे पर्वत आहेत. हिरवळीची चादर सर्वत्र ओढली गेल्यामुळे हा परिसर अतिशय शांत आहे. या क्षेत्रात असलेले विविध पक्षी पाहण्यासारखे आहेत.
नागपूरच्या वायव्येकडे असलेला गोरेवाडा तलाव हा 2350 फूट खोल आहे. या तलावातील पाण्याचा उपयोग पिण्याच्या पाण्यासाठी होतो. राज्य सरकारच्या जल कार्य खात्याने 1911 मध्ये या तलावाची निर्मिती केली होती. या तलावाच्या चहूबाजूला घनदाट जंगल असून या जंगलात वन्यप्राणीही आहेत.
नागपुरातील सेमिनरी हिल ही लहान आकाराची टेकडी आहे. सेंट चार्ल्स यांच्या नावावर या टेकडीचे नाव ठेवण्यात आले आहे. या टेकडीवरून शहराचे विहंगम दृश्य पाहता येऊ शकते. सेमिनरी हिलचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे अगदी लागूनच असलेले जपानी गार्डन होय. सेंट चार्ल्स सेमिनरी आणि एस. एफ. एस. कॉलेज या टेकडीच्या वर आहे.
या टेकडीवरील घनदाट झाडांना नागपूर शहराचे फुप्फुस समजले जाते. येथील चालण्याचे मार्ग लाकडाने तयार करण्यात आल्याने सकाळी ताज्या हवेत चालणार्यांना सुखद अनुभव मिळत असतो. सेमिनरी हिलच्या सर्वात वरून नागपूर शहराचे विहंगम दृश्य अनुभवता येऊ शकते. पर्यटकांसाठी हे अतिशय आकर्षक स्थळ ठरले आहे.
नागपुरातील अतिशय प्रसिद्ध स्थळ म्हणजे फुटाळा तलाव! सर्वच वयोगटातील लोकांसाठी हे ठिकाण अतिशय योग्य आहे. नागपूरचे पूर्वीचे राजा भोसले यांनी हा तलाव बांधला आहे. रंगीत फवारे आणि आल्हाददायक वातावरण येथील वैशिष्ट्य आहे. सायंकाळी हॅलोजन दिव्यांमुळे येथील वातावरण अधिकच आकर्षक होत असते. तीन बाजूंनी वेढलेला तलाव, हिरव्यागार जंगलाचे कवच आणि एका बाजूला अतिशय सुंदर अशी व्यापक चौपाटी हेदेखील येथील मुख्य आकर्षण आहे.
तलावाच्या किना-यावर आणि टेकडीवरून सूर्यास्ताचा मोहक अनुभव घेता येऊ शकतो. हा परिसर निसर्गाचा एक अद्भूत चमत्कारच आहे. सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, अनेक स्थलांतरित पक्षी या तलावाकडे आकर्षित होत असतात. त्यामुळे पक्षीप्रेमींसाठीही हा परिसर उपयुक्त असाच आहे. या विविध वैशिष्ट्यांमुळे गेल्या अनेक वर्षांपासून कुटुंबीयांकरिता हे अतिशय लोकप्रिय पिकनिक स्थळ ठरले आहे.
नागपूरच्या पश्चिमेकडे 6 किलोमीटर अंतरावर अंबाझरी तलाव आहे. शहरातील हा सर्वात मोठा आणि अतिशय मनमोहक तलाव आहे. या तलावाच्या देखभालीची आणि व्यवस्थापनाची जबाबदारी नागपूर महानगर पालिकेची आहे.
तलावाला लागूनच अतिशय सुंदर असा अंबाझरी बगिचा आहे. 1958 मध्ये निर्माण करण्यात आलेल्या या बगिच्याचे क्षेत्रफळ 20 एकर इतके आहे. लहान मुलांसाठी येथे करमणुकीची वेगवेगळी साधने आहेत.
स्त्रोत : http://nagpur.nic.in/#
अंतिम सुधारित : 4/23/2020
रायगड हा समुद्रतळाहून सुमारे ८२० मीटर अंदाजे २७०० ...
हरिश्चंद्रगड किल्ला – ४००० फुट उंचीचा हा किल्ला गि...
महाराष्ट्राची हिवाळी राजधानी असलेले नागपूर हे अतिश...
उस्मानाबाद येथे हजरत शमशुद्दीन गाझी यांचा दर्गा प्...