অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

यवतमाळ जिल्हा

पूर्व इतिहास

महारष्ट्रातील इतर जिल्ह्य प्रमाणे यवतमाळ जिल्ह्याचा इतिहास घटना क्रमानुसार सांगता येणार नाही. तरीही उपलब्द कागदपत्रांच्या मदतीने मूळ इतिहासाचा मागोवा घेतला जाऊ शकतो. खालील विषद घटनाक्रम या बाबतील नक्कीच पूरक ठरतात.

महाभारतातील उपलब्द माहिती नुसार यवतमाळ जिल्हा हा उर्वरित बेरार परगण्याचा भाग असून हे दोन्ही भाग मिळून वैभवशाली विदर्भ राज्याचा एक प्रांत बनला होता. बिदर हे शहर जे कि पूर्वी निजामांच्या अधिपत्याखाली होते, त्या राज्याची राजधानी म्हणून नावारूपास आले.

संगा वंशावळ

ख्रिस्तपूर्व २७२ ते २३१ मधील काळात राजा सम्राट अशोक मौर्य याच्या राज्याचा बेरार हा सुद्धा भाग होता. परंतु कदाचित मौर्य राज्याच्या अध:पतना अगोदर मौर्यांनी स्थानिक चोरांच्या टोळीच्या मदतीने हे राज्य आपल्या ताब्यात घेतले व अशारितीने पुष्यमित्र संगा राज्याचा शेवट केला. पुष्यमित्र हा शेवटचा मौर्य बृहद्रथा याच्या सैन्याचा सेनापती होता. त्याने आपल्या राजाला फितुरीने मारून स्वतःची राजवट उभी केली व विदिशा जे कि सध्याचे भिलाषा या शहराला राजधानी म्हणून घोषित केले. पुष्यमित्राचा मुलगा अग्निमित्र हा नंतरच्या काळात राज्य कारभार पाहू लागला. राज्याच्या सीमा वाढविण्याच्या प्रयत्नात त्याने विदर्भाच्या राज्याशी युध्द करण्याचा प्रयत्न केला व पराजित झाला. शेवटी दोघांमध्ये तह होऊन वर्धा नदीला दोन्ही राज्यामधील सीमारेषा म्हणून मान्य केले. विदर्भाच्या राजाची राजवट व कुळ याचा कुठेही उल्लेख आढळत नाही. तसेच पुढे त्याचे साम्राज्य कुठपर्यंत स्थापित झाले याची नोंद सुद्धा दिसत नाही. परंतु ह्या घटनेची नोंद मात्र आढळून आली ज्यामुळे पूर्व बेरारच्या साम्राज्याला त्यावेळी बराच फरक पडला

वाकटक व इतर हिंदू राजवट

यवतमाळ जिल्ह्याच्या इतिहासाचा शोध घेताना जरी आंध्र, शक, पहालव व बेरारचे यवतमाळ यांचा संबंध विचारात घेणे जरुरी नसले तरी प्रत्यक्षात पूर्ण यवतमाळ जिल्हा जो कि संपूर्ण परगण्यातील काही भाग होता हा वाकटक वंशाच्या साम्राज्या खाली येत होता. या वंशाच्या राजांबद्दल विशेष काही उल्लेखित नाही. परंतु चंद्रपूर जिल्ह्यातील भांडक या गावात आढळलेल्या माहिती नुसार विचार केला तर यवतमाळ जिल्हा हा शासन दरबारी महत्वाचा मानला जात असे. अजिंठा लेण्यांपैकी १६ क्रमांकाच्या लेण्यामध्ये वाकटकच्या कुटुंबातील ७ सदस्यांची नावे आढळली गेली. तसेच इतर ठिकाणाहून काढलेल्या माहिती नुसार १० राजांपैकी ज्यात फक्त एकच राजा जिवंत राहिला व त्याने नंतर बराच काळ राज्य केले. पहिला राजा विद्याशक्ती ज्याने निरनिराळ्या काळात म्हणजे ख्रिस्त नंतर २७५, ४०० मध्ये सरासरी २५ वर्षे राज्यपद सांभाळले. परंतु ह्या सर्व तारखांमध्ये सुसूत्रता आढळत नाही.

चालुक्य व राष्ट्रकुट यांच्या जिल्ह्यात कुठेही अस्तित्याच्या खाना-खुणा दिसत नाहीत. परंतु पुढे १०व्या शतकाच्या पुढील अर्ध्या भागात मात्र वागपती -२ (मुंजा जो कि माळवा प्रांताचा परमार होता) याच्या राज्यात या बद्दल नोंद आढळते. याचे राज्य दक्षिणेला गोदावरी पर्यंत विखुरलेले होते. परंतु. ९९५ ख्रिस्त नंतर, तैला-२ याने त्याला हरवून माळवा राज्य व बेरार ताब्यात घेतले, अशा प्रकारे पुन्हा ते चालुक्याच्या साम्राज्य खाली आले.

पुढे बाराव्या शतकाच्या शेवटी देवगिरीच्या यादवांनी चालुक्य राज्यामधील बहुतांश उत्तरेकडील जिल्हे ताब्यात घेतले. परंतु यातही शंका आहे की, यवतमाळ जिल्ह्याचा संपूर्ण कि काही भाग ह्या संस्कृतीशी निगडीत आहे. पूर्वेकडील भूभाग कदाचित गोंड जमातींनी ताब्यात घेतला असावा त्यांचे चंद्रपूर जिल्ह्या शेजारी मोठ्या प्रमाणात अस्तित्व आहे. ज्याचे वरून चालुक्य राजवटीचा शेवट झाल्याच्या खुणा मिळतात.

ब्रिटीश राज्यकर्त्यांना हस्तांतरण

पुढे १८३३ मध्ये यवतमाळ जिल्हा उर्वरित बेरार सोबत ईस्ट-इंडिया कंपनी ला हस्तांतरीत करण्यात आला. यात प्रक्रियेत कोणतीही अडचण उदभवली नाही. पुढे तेव्हा पासून नियमित विकास वगळता इतर कोणत्याही महत्वाच्या घटने बद्दल लिखित गोष्टी आढळत नाहीत.

प्रशासन

बेरारच्या हस्तांतारानंतर त्याचे पूर्व व पश्चिम बेरार अशा दोन जिल्ह्यात विभाजन करण्यात येवून प्रत्येकी अमरावती व अकोला अशी मुख्यालये करण्यात आली. यवतमाळ जिल्हा हा पुसद तालुका वगळून पूर्व बेरार मध्ये समाविष्ट करण्यात आला. परंतु १८६४ मध्ये यवतमाळ, दारव्हा, केळापूर व वणी मिळून स्वंतंत्र जिल्हा स्थापन करण्यात आला व त्याचे नाव प्रथम दक्षिण-पूर्व बेरार व नंतर वणी असे ठेवण्यात आले. जेंव्हा निजामाने बेरार हे भारत सरकारला भाडे पट्ट्या वर दिले तेंव्हा सदर हस्तांतरण १९०३ मध्ये रद्द केले गेले व त्याचे प्रशासन हैदराबाद वरून केंद्रीय परगण्यात बदलण्यात आले. १९०५ मध्ये भाडे पट्ट्याचा कालावधी संपल्यानंतर बेरारच्या सहाही जिल्ह्याची पुनर्बांधणी करण्यात आली व वणी तालुका वाशीम जिल्ह्यातून परत घेण्यात आला जो कि पूर्वी पुसद जिल्ह्यातून विभागल्या गेला होता. त्याच वेळी जिल्ह्याचे नामकरण वणी बदलून यवतमाळ करण्यात आले.

स्थान व क्षेत्रफळ

यवतमाळ जिल्हा हा वर्धा पैनगंगा-वैनगंगा खो-याच्या दक्षिण-पश्चिम भागात वसलेला आहे. भौगोलिक दृष्ट्या जिल्ह्याचे स्थान १९.२६' व २०.४२' उत्तर अक्षांश मध्ये आणि ७७.१८'व ७९.९'पूर्व रेखांशा मध्ये मोडते. उत्तरे कडून अमरावती व वर्धा जिल्हा, पूर्वेकडून चंद्रपूर जिल्हा, आंध्र प्रदेश व नांदेड जिल्हा दक्षिणेकडून तर परभणी व अकोला जिल्हा पश्चिमे कडून वेढलेला आहे.

जिल्ह्याचे क्षेत्रफळ १३५८२ चौ.कि.मी.(राज्याच्या ४.४१ टक्के) असून २०७७१४४ (राज्याच्या २.६३ टक्के) एवढी लोकसंख्या आहे. लोकसंख्येची घनता १५३ व्यक्ती प्रती चौ.कि.मी. एवढी आहे. राज्याच्या एकूण ३५ जिल्ह्यांपैकी यवतमाळ जिल्ह्याचा क्षेत्रफळाच्या बाबतील ६वा तर लोकसंख्येच्या बाबतीत १९वा क्रमांक लागतो.

यवतमाळ हे शहर जिल्ह्याचे मुख्यालय असून त्याची लोकसंख्या १९९१ च्या जनगणनेनुसार १०८५७८ एवढी आहे. यवतमाळ शहर हे जिल्ह्याचा इतर तालुक्यांशी चांगल्या प्रकारच्या रस्त्यांनी जोडले आहे. तसेच जिल्ह्यात रेल्वेची छोटी लाईन सुद्धा वापरामध्ये असून मुर्तीजापुर व इतर शहरांशी त्याने प्रवास करता येतो.

यवतमाळ जिल्हा हा ब-याच प्रमाणात डोंगराळ भाग तसेच रुंद व खोल द-यांनी बनलेला असून समतल भूपृष्ठांनी वेढलेला आहे. संपूर्ण जिल्हा असंख्य पूर्व पश्चिम रांगांनी व्यापलेला आहे. मध्य भाग पठारी असून खूप सरळ बाजूंनी उभा आहे व त्यामुळे समुद्र सपाटी पासून त्याची उंची ३०० ते ६०० मीटर पर्यंत पोहोचल्या गेली. इकडे तिकडे सर्वदूर पहाडी किंवा समतल उंच व अणकुचीदार डोंगरांनी भरलेले दिसतात. हे सर्व भूभाग बेरारच्या दक्षिणी पर्वत रांगांनी तयार झाले आहेत. उत्तरेकडे जिल्हा पायनघाट ज्याला बेरारची दरी म्हणतात पर्यंत वाढलेला आहे. ह्या द-या ६५ ते ८० किलोमीटर रुंद आहेत. याचा छोटासा भाग जो यवतमाळ जिल्ह्यात येतो तो समतळाचा पत्ता म्हणून तयार झाला. ज्याची रुंदी ८ ते २२ किलोमीटर असून ती जिल्ह्याची उत्तरीय सीमारेषा आहे. जिल्हा ढोबळ मानाने खालील सहा भौगोलिक क्षेत्रात विभागल्या गेला आहे.

  • उत्तरे कडील बेंबळा खोरे व बाभूळगाव तहसील क्षेत्र

  • वर्धा भूसमतळ जो कि कळंब मधील वर्धा नदी, राळेगाव, मारेगाव व वणी तहसील मध्ये विखुरलेला आहे

  • यवतमाळ पठार ज्यात बराच भाग यवतमाळ, कळंब, केळापूर, घाटंजी तहसीलचा आहे व काही प्रमाणात बाभूळगाव, राळेगाव व मारेगाव तहसीलचा आहे

  • दारव्हा पठार ज्यात संपूर्ण दारव्हा तहसील, ब-याच प्रमाणात दिग्रस तहसील, तसेच नेर, यवतमाळ, घाटंजी तहसीलचा काही भाग

  • पुसद डोंगराळ प्रदेश हा पुसद, महागाव आणि उमरखेड तहसील करिता

  • पैनगंगा दरी जी जिल्ह्याची दक्षिण सीमारेषा तसेच इतर तहसील चा काही भाग जसे पुसद, उमरखेड, महागाव, दारव्हा, घाटंजी, केळापूर, मारेगाव व वणी

जिल्ह्यातील मुख्य नद्या वर्धा व पैनगंगा ज्या उत्तर-पूर्व सीमारेषेत प्रत्येकी वाहतात. वर्धा नदीचा उगम मध्यप्रदेश मधील मुलताई च्या पूर्वेस होतो. ती सर्वसाधारणपणे दक्षिण-पूर्व दिशेने जिल्ह्याच्या उत्तर-पूर्व सीमारेषेत वाहते. वर्धा अशी एकमेव नदी आहे कि काही अंशी दिशादर्शक आहे. तिचे पात्र रुंद असून खोल आहे परंतु पूर परिस्थितीमध्ये नदी काठच्या भागात पाणी शिरून प्राणहानी व वित्तहानी सुद्धा करते. पावसाळ्यात नदी दुथडी भरून वाहते परंतु उन्हाळ्यात मात्र ब-याच ठिकाणी कोरडी असते.बेंबळा व निर्गुडा ह्या वर्धा नदीच्या मुख्य उपनद्या असून जिल्ह्यात दोन्हीही बारमाही वाहतात. बेंबळा नदीचा उमग अमरावती जिल्ह्यात असून शेवटचे ३० किमी.अंतर यवतमाळ जिल्ह्यात कापते. निर्गुडा नदी यवतमाळ जिल्ह्यातच उमग पावते व तिची लांबी जवळ जवळ १६५ किमी. आहे.

पैनगंगा नदीचे उगमस्थान अजंठा पर्वत रंगातील दक्षिण-पश्चिम बुलढाणा शहरात आहे. ती वर्धा नदीची मुख्य उपनदी म्हणून सुद्धा मान्यता पावली आहे. नदी तळ खूप खोल असून तिचा मार्ग बराच नागमोडी स्वरूपाचा आहे पैनगंगा आपल्या संपूर्ण नागमोडी मार्गामुळे जिल्ह्याची दक्षिण सीमारेषा तयार करते. पूस, अ-हा, अडान, वाघाडी व कुंज ह्या पैनगंगेच्या जिल्ह्यातील महत्वाच्या उपनद्या होत.

सीमारेषा

जिल्ह्याची उत्तर ते दक्षिण सर्वदूर लांबी हि १२० मैल असून जास्तीत जास्त रुंदी उत्तर ते दक्षिण १०० मैल आहे. जिल्ह्य हा बेरारचा दक्षिण-पूर्व १/४ भाग व्यापत असून पश्चिमेला वाशीम व अकोला जिल्हे लागून आहेत. उत्तरेला अमरावती जिल्हा असून पूर्वेला वर्धा नदी हि सीमारेषा म्हणून ओळखली जाते त्या दिशेला मध्य परगण्याचे वर्धा व चंद्रपूर जिल्हे लागून आहेत. दक्षिणेकडे नांदेड जिल्हा व आंध्र प्रदेश आहे.मोठमोठे वळणे घेवून वाहणारी पैनगंगा नदी जिल्ह्यासाठी संपूर्ण दक्षिण सीमारेषा तयार करते व शेवटी दक्षिण-पूर्व टोकाशी वर्धा नदीला जावून मिळते.

 

माहिती संकलक : अतुल पगार

स्त्रोत : http://yavatmal.nic.in/mHistory.htm

अंतिम सुधारित : 7/9/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate