অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पूला

पूला

पूला

पॉला. यूगोस्लाव्हियाच्या क्रोएशिया विभागातील प्रमुख नैसर्गिक बंदर. लोकसंख्या ४७,४१४ (१९७१).

हे एड्रिॲटिक समुद्रावरील इस्त्रीया द्वीपकल्पाच्या दक्षिण टोकावर वसले आहे.

ख्रिस्तपूर्व १७८ मध्ये येथे रोमनांचा लष्करी व नाविक तळ होता. इ. स. पू. ३९ मध्ये इलिरियन-डाल्मेशियन युद्धात ते उदध्वस्त झाले; तथापि चार वर्षांनीच त्याची पुनर्रचना करण्यात आली.

१९४७ मधील पॅरिसच्या तहानुसार पूला यूगोस्लाव्हियाच्या ताब्यात आले. येथे जहाजबांधणी व दुरूस्ती, यंत्रसामग्री, सिमेंट, काच, वस्त्रनिर्मिती इ. उद्योग चालतात.

येथील रोमन रंगमंदिर, विजय-कमान (इ. स. पू. पहिले शतक), तसेच पुरातत्त्वीय संग्रहालय इ. उल्लेखनीय आहेत.


चौधरी, वसंत

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 5/6/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate