शहरभर कालव्यांचे जाळे पसरलेले असून अनेक उद्योगधंद्यांनी शहर गजबजलेले आहे. त्यावर पौर्वात्य राहणीची छाप स्पष्ट दिसून येते, तर सायगाव मात्र आधुनिक फ्रेंच वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना वाटते. येथील लोकवस्ती बहुतांशी चिनी आहे. सडका, रेल्वे आणि कालवे यांनी चोलॉन सायगावला जोडलेले असून आता ते सायगावचे उपनगरच झाले असून ‘भाताचे कोठार ’ म्हणून याचा उल्लेख केला जातो. येथे भात सडण्याच्या गिरण्या, लाकूड कापण्याच्या गिरण्या, साबणाचे कारखाने वगैरे उद्योगधंदे मोठ्या प्रमाणावर चालत असून मासे सुकविणे, छोट्या बोटी बांधणे आणि व्हार्निश, काचसामान, मातीची भांडी,डबाबंद फळे, विटा इ. उद्योगही चालतात.
कापडी, सुलभा
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 8/5/2020
चोलॉन : दक्षिण व्हिएटनाममधील प्रमुख नदीबंदर. लोकसं...