एअर सरोवर
दक्षिण ऑस्ट्रेलियातील खाऱ्या’ पाण्याचे सरोवर २८० ३०' द. व १३७० १५' पू. लांबी २०८ किमी.; रुंदी ३२-६४ किमी. व क्षेत्रफळ सु. ९,०६५ चौ. किमी. एअर सरोवर अॅडिलेडच्या उत्तरेस ६०१ किमी. अंतरावर आहे.
एडवर्ड एअर या इंग्रज समन्वेषकाने १८४० मध्ये हे शोधले; त्यावरून त्याच्या नावानेच ते प्रसिद्ध आहे.
सरोवराचे उत्तर व दक्षिण असे दोन भाग असून ते समुद्रसपाटीपासून सरासरी १२-१८ मी. खोल आहे. वॉरबर्टन, बार्कू, डग्लस, पीक, नील्स या नद्या सरोवरास मिळत असल्या, तरी वर्षातील बराच काळ त्या कोरड्या असतात. पावसाची वार्षिक सरासरी १२.७ सेंमी. व बाष्पीभवन मात्र २५४ सेंमी. असल्याने क्षारांचे प्रमाण अधिक होऊन सरोवरात मीठ तयार होते.
गद्रे, वि. रा.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 6/9/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.