অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

नीकोलाउस आउगुस्ट ओटो

नीकोलाउस आउगुस्ट ओटो

जन्म

१० जून १८३२

कार्य

जर्मन यांत्रिक अभियंते. यांनी तयार केलेले वायू एंजिन अंतर्ज्वलन एंजिनांच्या विकासातील एक महत्त्वाची पायरी ठरले आहे. त्यांचा जन्म होल्‌त्सहाउसन येथे झाला. १८५३ मध्ये कोलोनला त्यांनी स्वतःचा धंदा सुरू केला. फ्रान्समधील द रोशा यांनी १८६२ मध्ये वायू एंजिनासाठी चार धावांच्या आवर्तनाच्या केलेल्या वर्णनाचा ओटो व त्यांचे सहकारी लांगन यांनी यशस्वीपणे उपयोग करून एक आवाजरहित वायू एंजिन तयार केले व त्याचे १८७७ मध्ये पेटंटही मिळविले. हे एंजिन लहान कर्मशालांना अतिशय उपयुक्त ठरले. ओटो व लांगन यांनी १८६७ मध्ये तयार केलेल्या एक प्रकारच्या सुट्या दट्‍ट्याच्या एंजिनास पॅरिस येथील प्रदर्शनात सुवर्णपदक मिळाले.

मृत्यू

२६ जानेवारी १८९१ रोजी ते कोलोन येथे मृत्यू पावले.

लेखक : बा.मो.कानिटकर

स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/26/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate