ऑग्यूस्त मारी फ्रांस्वा बेरनार्त : (२६ जुलै १८२९-६ ऑक्टोबर १९१२) बेल्जियमचा पंतप्रधन व शांततेच्या नोबेल पारितोषिकाचा सहमानकरी. ऑस्टेन्ड (बेल्जियम) येथे प्लेमिश कुटुंबात जन्म. कायद्याच्या परीक्षेपर्यंत शिक्षण घेऊन वकिली करीत असतानाच ते राजकारणाकडे आकृष्ट झाला आणि संसदेवर निवडून आला(१८७३). कॅथलिक पक्षाच्या मंत्रिमंडळज्ञत त्याच्यां कडे सार्वजनिक बांधकाम खाते होते. तदनंतर तो कृषी व उद्योगखात्यांचा मंत्री झाला(१८७८-८४) आणि पुढे त्याची अर्थमंत्री व पंतप्रधान म्हणून निवड झाली(१८८४-९४). १८९५ मध्ये संसदेच्या लोकप्रतिनिधिगृहाचे अध्यक्षपद त्यास मिळाले(१८९५-१९००). आंतरराष्ट्रीय विधिसंसस्थेचाही तो १९०३-०५ दरम्यान अध्यक्ष होता. बेरनार्तने आपल्या पंतप्रधानकीच्या दहा वर्षांच्या कारकीर्दीत निर्वाचन विषयक कायदा आणि मजुरांची परिस्थिती सुधारणारे कायदे करून देशात आमूलाग्र सुधारण घडवून आणल्या प्रागतिक विचारांचा पंतप्रधान आधी त्यांची पक्षात ख्याती होती. द हेग येथील आंतरराष्ट्रीय शांतता परिषदास (१८९९ व १९०७) उपस्थित राहणारा तो पहिला बेल्जियम सभासद होता. कामगारांच्या हिताचे कायदे करण्याबरोबरच त्याने हेग येथील परिषदात जागतिक शांततेसाठी प्रयत्न केले. स्वा.वि.दा. सावरकरांचा खटला हेगच्या ज्या आंतरराष्ट्रीय न्यायाधिकारणापुढे चालला, त्या न्यायाधिकरणाचा अध्यक्ष बेरनार्तच होता (१९११). या परिषदांत त्याने निःशस्त्रीकरण आणि शांततेसाठी लवाद या गोष्टींचा हिरिरीने पुरस्कार केला.
नाविक युध्दात मिळालेल्या शत्रूच्या संपत्तीची विल्हेवाट कशी लावली जावी, याविषयी निर्णायक चर्चा व्हावी, अशी मागणी त्याने केली; पंरतु त्याचे हे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. तथापि त्याच्या शांतता कार्याची दखल घेऊन बॅरन द एस्तौरनेल्स दी काँस्ता (२२ नोव्हेंबर १८५२-१५ मे १९२४) याच्याबरोबर शांततेचे नोबेल पारितोषिक त्यास देण्यात आले(१९०९). बेरनार्तने आपले उर्वरित जीवन शांतता कार्यातच व्यतीत केले. तो लूर्सन (स्वित्झर्लंड) येथे मरण पावला. काँस्तां हा फ्रेंच मुत्सद्दी व संसदपटू. त्याचा जन्म ला फ्लेश (सार्त)येथे झाला. पुढे त्यास सिनेटचे सदस्यत्व आणि कालांतराने फ्रान्सचे मंत्रिपदही लाभले. १८८९ मध्ये सुरू झालेल्या आंतरराष्ट्रीय संसदीय परिपदांत त्याने भाग घेतला. द हेग येथ १८९९ व १९०७ साली झालेलया शांतता परिषदांत फ्रान्सचे त्याने प्रतिनिधित्व केले. आंतरराष्ट्रीय सहकार्य, सामजस्य, निःशस्त्रीकरण व शांतता या तत्वांचा पुरस्कार करून आंतरराष्ट्रीय लवाद न्यायालयाच्या स्थापनेत त्याने पुढाकार घेतला; पण या न्यायालयाकडून कोणतीच कार्यवाही होत नाही, असे दिसताच अमेरिकेसारख्या देशांना शांततेसाठी पुढाकार घेण्यास उद्युक्त केले व अमेरिकेचे अनुकरण इतर देशांनी करावे, असा सल्ला त्याने दिला.
व्याख्याने -लेखन यांद्वारे त्याने आपले मौलिक विचार प्रसृत केले. ला कन्सिलेशन इंटरनशॅनल (१९०६), पोअर ला सोसायटी देस नेशन्स (१९१२), अमेरिका अँड हर प्रॉब्लेम्स (१९१५ इं.भा.) इ. त्याचें काही महत्त्वाचे ग्रंथ. त्याच्या या कार्याचा गौरव नोबेल पारितोषिक देऊन करण्यात आला. तो बॉर्दो येथे मरण पावला
लेखक - रुक्साना शेख
स्त्रोत - मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/21/2020
गीधांडांच्या संरक्षणाकडे गंभीरपणे पाहिले जावे यासा...
संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण कार्यक्रमानुसार (...
जंगलतोडीला अटकाव करण्यासाठी अक्षरशः स्वत:चे प्राण ...
२१ जून आंतरराष्ट्रीय योगा दिवस आणि योगाचे महत्त्व ...