जपानच्या होक्काइडो बेटाचे प्रमुख ठिकाण. देशाचे एक सांस्कृतिक केंद्र व व्यापारी शहर. लोकसंख्या १९,२१,८३१ (२०११) ते बेटाच्या नैर्ऋत्य भागातील इशिकारी मैदानात इशिकारी नदीकाठी वसले
साप्पोरो १९७२ मधील हिवाळी ऑलिंपिक सामन्यांमुळे जगभर प्रसिद्घ झाले. येथे प्रथमपासूनच हिवाळी खेळांना प्राधान्य दिलेले असून स्कीइंग हा बर्फावरील खेळ अत्यंत लोकप्रिय आहे. येथे दरवर्षी हिमोत्सव भरतो. या उत्सवात हिमराशीतून बर्फ जमा करून त्यांची अजस्त्र शिल्पे बनविण्यात येतात. येथे ३ ते १३ फेबुवारी १९७२ मध्ये हिवाळी ऑलिंपिक क्री डा स्पर्धा भरविण्यात आल्या होत्या. त्यांमध्ये स्कीइंग, स्केटिंग, बर्फावरील हॉकी व घसरगाड्यांच्या शर्यती, धावण्याच्या शर्यती इ. खेळांचा अंतर्भाव होता.
मारुयामा आणि मोईवायामा या येथील अभयारण्यांमुळे तसेच वनस्पतिउद्यानामुळे साप्पोरो हे पर्यटकांचे आकर्षण बनले आहे. शहरात होक्काइडो विद्यापीठ (स्था. १८७६) असून तेथे अमेरिकन शिक्षणतज्ञ विल्यम स्मिथ क्लार्क यांचा पुतळा आहे. उद्याने, मारुयामा अभयारण्य, जोझांकेई हा गरम पाण्याचा झरा ही शहराच्या परिसरातील अन्य प्रेक्षणीय व पर्यटकांची आकर्षण स्थळे आहेत.
चौंडे, मा. ल.
स्त्रोत - मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020