অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कॅश्गार

कॅश्गार

कॅश्गार

(चिनी शूफू किंवा सूफू). चीनच्या सिंक्यागं ऊईगुर स्वायत्त विभागातील व कॅश्गार मरुद्यानातील व्यापारी शहर. लोकसंख्या १७५०००(१९७० अंदाज). पामीरमधून आलेल्या तिएनशान व मुझाताघ आता ह्या पर्वतरांगा मिळतात, तेथे सु. १२२० मी. उंचीवर कॅश्गार नदीकाठी, तारीम खोऱ्याच्या पश्चिमेस हे वसलेले आहे. या सु. ६,७०० मी. उंचीच्या रांगादंरम्यान ३,७८० मी. उंचीवरील तूरुगार्त खिंडीमार्गे मे रशियाच्या फरगाना खोऱ्यातील ऍरिझन या लोहमार्ग स्थानकाशी आठ दिवसांच्या लमाणमार्गाने जोडलेले आहे. दक्षिणेस खोतान मरुद्यानमार्गे कॅश्गारहून काश्मीरमध्ये ५,५७५ मी. उंचीवरील काराकोरम खिंडीतून जाता येते. तिएनशानमधील सु. ९०० मी. उंचीवरील दोन खिंडीतून कॅश्गारहून ऊरुमचीला व झुंगेरिया खोऱ्यात जाता येते.

कॅश्गार मरुद्यान लोएस मातीमुळे सुपीक झालेले असून नदी व विहिरी यांपासून पाणीपुरवठा होतो. शहरापासून आठ किमी. वरच दगडगोटयांचा रुक्ष प्रदेश सुरु होतो. कॅश्गारचे जानेवारीचे सरासरी तापमान-६ असते. व जुलैचे २७ से. असते. पाऊस सात आठ सेंमी., अनियमित असतो. नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत बर्फामुळे पाणीपुरवठा करता येत नाही. ताल्का माकान वाळवटंतील धुळीने आकाश सदैव व्यास असते. उन्हाळयाच्या सुरुवातीस व शरद ऋतूच्या अखेरीसच फक्त ते स्वच्छ असते. कॉलरा, टायफस, प्लेग हे रोग येथे नाहीत;मात्र मुदतीचा ताप, देवी व सौम्य हिवताप यांच्या साथी येतो. डास व वाळवंटी माशा तापदायक असतात.

कॅश्गार हे सिंक्यांगमधील कापूस उत्पादनाचे केंद्र आहे.याशिवाय या भागात गहू,मका,बार्ली,तांदूळ,भरडधान्ये व डाळी यांची पिके येतात. पीच,जरदाळू,चेरी,तुती,द्राक्षे,कलिंगडे ही फळे विपुल होतात. रेशमाचे उत्पादन होते व तुमन आणि किझिल दर्या नद्यांवर थोडी मासेमारीही चालते. १९४० मध्ये शहराच्या उत्तरेस डोंगरात तांब्याच्या समृद्ध खाणी सापडल्या.

हातसुताचे कापड. लोकरी रंग, फेल्ट, केसाळ कातडी, कातडीसामान, सोन्याचंदीचे अंलकार, मातीची भांडी हे व्यवसाय येथे चालतात. लोकर, कच्चे रेशीम, कातडी, मेंढयांची आतडी, चीज सुकी फळे, रग, घोडयाचे व उंटाचे केस वगैरे पदार्थ मुख्यतः रशियाकडे निर्यात होतात. सुती व लोकरीचे कापड, साखर, लोखंड,पेट्रोलियम च्या वस्तु, आगपेटया,तंबाखूच्या वस्तू,कमावलेली कातडी, कागद, मद्ये व रेशीम   किडयांची अंडी इ. वस्तू आयात होतात.

कॅश्गारचे लाइनिंग हा चिनी भाग व शूफू हा ऊईगूर शहराचा मोठा भाग असे दोन भाग आहेतत्र. कॅश्गार म्हणजे विविधरींगी विटांची घरे. तिसऱ्या शतकात इंडो-सिथियानांची एक शाखा युएची ही कान्सूमधून पश्चिमेकडी रेटली गेली.तिने शकांना घालवून देऊन कॅश्गार मरुद्यान व्यापले. चिन्यांनी इ.स.पू. पहिल्या शतकात चिनी तुर्कस्तान आणि कॅश्गार जिंकले युएचींनी ते पुन्हा जिंकून तेथे बौद्ध धर्म आणला.

अनेक शतके येथे तुर्की ऊईगुर राज्यात होते. १२९९ मध्ये चंगीझाखानाने ते आपल्या साम्राज्यास जोडले. १२७५ मध्ये कुब्लाईखानाच्या राजवटीत मार्कोपोलो कॅश्गारला आला होता. चौदाव्या शतकात तैमूरलंगाने कॅश्गारची धुळधाण केली व पुढे अनेक शतके त्यावर हल्ले होत राहिले. १७५५ मध्ये चिन्यांनी ते पुन्हा जिंकले. १८६१-७८  च्या याकूब बेगच्या बंडानंतर ते चिन्याकडेच होते.

१९२८ मध्ये मुस्लिम जनरल मा चुंग मिगने तारीममध्ये बंड केलेत्र ते रशियाच्या मदतीन १९३७ मध्ये पूर्णपणे शमले.१९४३ मध्ये संपूर्ण चिनी अंमल येईंपर्यंत येथील आर्थिक व राजकीय कारभारात रशियाचे वर्चस्व होते.१९४९ मध्ये चिनी कम्युनिस्ट फौजांनी मुस्लिमांचा पाडाव कन येथे आपली सत्ता जारी केली. आर्थिक आणि राजकीय घडीची संपूर्ण फेररचना केली आणि १९५५ मध्ये सिंक्यांगची सिंक्यांग ऊईगुर स्वायत्त विभाग म्हणून व्यवस्था लावली.


कुमठेकर, ज. ब.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/6/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate