অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पांडू

पांडू

पांडू

आसाम राज्याच्या कामरूप जिल्ह्यातील एक अंतर्गत बंदर व रेल्वे प्रस्थानक. लोकसंख्या उपनगरांसह ४७,९५४ (१९७१. हे गौहातीच्या पश्चिमेस ६ किमी. ब्रहापुत्रेच्या डाव्या तीरावर वसले आहे.

१९५८ पासून बिहारमधील कटिहार स्थानकापासून पूर्वेकडील संपूर्ण रेल्वेविभाग ‘ईशान्स सरहद्द रेल्वे’ या नवीन विभागात समाविष्ट करण्यात आला असून, या विभागाचे पांडू येथे प्रमुख कार्यालय आहे.

पांडूचा आसाममधील एक प्रमुख बंदर म्हणून विकास करण्याच्या योजना आहेत. कलकत्त्याकडे जाणाऱ्या मोठ्या बोटींमध्ये मालाची चढउतार करण्यासाठी येथे मोठा मालधक्का आहे.‌

 

आठल्ये, द. बा.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/23/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate