मध्य प्रदेश राज्याच्या सागर जिल्ह्यातील प्राचीन स्थल. खुराईपासून १८ किमी. वायव्येस बीना नदीकाठी हे वसले आहे. पाचव्या शतकामध्ये गुप्तसाम्राज्यात हे भरभराटलेले नगर होते. ऐरिकिण, एरिकिण अशा नावांनी ते प्रसिद्ध होते. युद्धविजयानंतर समुद्रगुप्ताने येथे एक विष्णुमंदिर बांधल्याचा उल्लेख एका शिलालेखात आढळतो. येथे केलेल्या उत्खननात अश्मयुगीन मातीची भांडी, लोहयुगीन कौले, मृत्तिकापात्रे, वन्य जमातींची नाणी, मृत्तिकाशिल्पे, शिंपले व रत्नजडित कंकणासारखे अलंकार आणि मौर्य सम्राटाचा ब्राह्मी लिपीतील शिशाचा ठसा सापडला आहे.
लेखक : चंद्रहास जोशी
स्त्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 6/13/2020
खजुराहो म्हटले कि आठवतात भव्य मंदिरे, अत्युच्च शिल...