अवधीचे साहित्य बाराव्या शतकापासून सुरू झाले. ðजगनिक कवीने लिहिलेले आल्हखंड हे या भाषेतले पहिले काव्य असून ते ११७४ मधले आहे. चौदाव्या शतकात उसळलेल्या भक्तियुगाच्या लाटेत विपुल प्रमाणात संतकाव्य निर्माण झाले. यापैकी सर्वांत प्रसिद्ध काव्य ðतुलसीदासाचे ðरामचरितमानस आहे. याशिवाय अनेक प्रेमाख्यानेही लिहिली गेली असून त्यांत हिंदूं प्रमाणेच सूफींचाही वाटा मोठा आहे.
संदर्भ : 1. Grierson, G. A. Linguistic Survey of India, Vol. VI, Delhi, 1968.
2. Saksena, Baburam,Evolution of Awadhi (A Branch of Hindi), Alahabad, 1988.
लेखक: ना. गो. कालेलकर
माहिती स्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 2/24/2020
अमेरिकन साहित्य विषयक माहिती.
पाचव्या शतकाच्या शेवटी दक्षिण अरबस्तानात अरबी भाषे...
अर्धमागधी साहित्य विषयक माहिती.
अँग्लो-इंडियन साहित्य विषयक माहिती.