कर्नाटक राज्याची निर्मिती १ नोव्हेंबर १९५६ ला झाली. कर्नाटक राज्याला ३००० वर्षांचा इतिहास आहे.
कर्नाटकात होयसळा राजांनी १०व्या ते १४ व्या शतकांत राज्य केले. ह्या दरम्यान त्यांनी बर्याच उत्तोमत्तम मंदिरांची निर्मिती केली.
होयसळा राजांची अशी लोककथा सांगण्यात येते की एक सळा नावाचा मुलगा होता. एकदा तो त्याच्या गुरुंबरोबर (सुदत्त) जंगलात जात असताना त्यांच्यावर सिंहाने हल्ला केला. हे पाहुन गुरुंनी त्या मुलाला आज्ञा केली "होय सळा"(कन्नड भाषेत होय म्हणजे "मारणे"(strike/blow)). ती आज्ञा ऐकुन त्या मुलाने सिंहाला ठार मारले. म्हणुन त्या मुलाचे नाव होय-सळा असे पडले.
बेलुर बंगलोर पासुन २५० किमी वर येते. जवळचे रेल्वे स्टेशन म्हणजे अर्सिकेरे. ईथे हसन मार्गेही बसने जाता येते. हि होयसळा राजांची पुर्व राजधानी होती. ईथे चन्नाकेशवा (विष्णु) चे १११७ मध्ये बांधलेले सुप्रसिद्ध मंदिर आहे.
छायाचित्रे पाहण्यासाठी खालील वेबसाईटवर क्लिक करा.
स्त्रोत - मायबोली
अंतिम सुधारित : 8/30/2020