भाग - १३: हैदराबाद व श्रीशैलम, आंध्र प्रदेश
हैदराबाद
ला ५०० वर्षांचा ईतिहास आहे. हैदराबाद मुहम्मद कुतुब शहा ह्याने १५ व्या शतकात मुसी नदिच्या किनारी वसविले. हैदराबाद चे दोन विभाग पडतात. जुने हैदराबाद व नवे हैदराबाद. जुन्या हैदराबाद मधे चारमिनार, गोलकोंडा किल्ला, सालारजंग म्युझियम अशी ठिकाणे येतात तर नविन हैदराबाद मध्ये हाय्-टेक सिटी, हुसेनसागर तलाव, बिर्ला मंदिर अशी ठिकाणे येतात.
हैदराबाद-सिकंदराबाद पुर्ण पहायचे म्हणजे कमीत-कमी ३ दिवस पाहिजेत.पहिल्या दिवशी गोलकोंडा किल्ला, हुसेनसागर तलाव व बुध्दमूर्ति, हुसेनसागर तलावाजवळील लेसर शो, बिर्ला मंदिर असे पाहता येईल.दुसर्या दिवशी चारमिनार व सालारजंग म्युझियम पाहता येईल. चारमिनारला लागुनच ईथला "प्रसिद्ध चूडी" बाजार आहे. हैदराबाद मोत्यांसाठीही प्रसिद्ध आहे.तिसर्या दिवशी रामोजी फिल्म सिटी पाहता येईल.
छायाचित्रे पाहण्यासाठी खालील वेबसाईटवर क्लिक करा.
स्त्रोत - मायबोली
अंतिम सुधारित : 7/8/2020
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.