वेबसाईट : मराठी भाषा विभागा
मराठी भाषेच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्र राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये "मराठी भाषा विभाग" असा स्वतंत्र प्रशासकीय विभाग स्थापन करण्याचा निर्णय दि.२४ जून, २०१०च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. नव्याने निर्माण करण्यात आलेल्या विभागामध्ये महाराष्ट्र शासन कार्यनियमावलीच्या अनुसूचीमधील सामान्य प्रशासन विभाग, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग आणि शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या अखत्यारितील मराठी भाषेशी संबंधित विषय तसेच मराठी भाषा विषयक कामकाज पाहणारे भाषा संचालनालय, राज्य मराठी विकास संस्था, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ इ.कार्यालये/संस्था/मंडळ मराठी भाषा विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली वर्ग करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सदर निर्णयास अनुलक्षून स्वतंत्र मराठी भाषा विभागाच्या स्थापनेबाबत आदेश शासन निर्णय, सा.प्र.विभाग क्र.मभावा-२०१०/४५८/प्र.क्र.९५(भाग-२)/२०-ब, दि.२२जुलै, २०१० अन्वये निर्गमित करण्यात आले असून याबाबतची अधिसूचना दि.२९ नोव्हेंबर, २०१० रोजी निर्गमित करण्यात आली आहे.
नवनिर्मित मराठी भाषा विभाग लवकर कार्यान्वित होण्याच्या दृष्टीने मा.मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली शक्ती प्रदत्त समिती शासन निर्णय सा.प्र.वि.क्र.शप्रस-२०१०/प्र.क्र.११६/२०-ब, दि.१४जुलै, २०१० व दि.१० ऑगस्ट, २०१० अन्वये स्थापन करण्यात आली आहे. सदर समितीची कार्यकक्षा खालीलप्रमाणे आहे.
मराठी भाषा विभागात अन्य विभागातील वर्ग होणारे विषय विचारात घेऊन विभागासाठी समितीने प्रथम ३५ पदांना मंजुरी दिली. याबाबतचा शासन निर्णय सा.प्र.विभाग दि.३१ जानेवारी, २०११ रोजी निर्गमित करण्यात आला. तसेच दिनांक ६.९.२०११ रोजी सचिव कार्यालयासाठी ४ व विभागासाठी ६ अशा १० अतिरिक्त पदांना मंजुरी देण्यात आली. याबाबतचा शासन निर्णय दिनांक ४ ऑक्टोबर, २०११ रोजी निर्गमित करण्यात आला. तसेच वाढीव कामकाज विचारात घेऊन आणखी अतिरिक्त ८ पदांना मंजुरी देण्यात आली असून त्याबाबत शा. नि. दि. २७/४/२०१२ रोजी निर्गमित करण्यात आला. अशा प्रकारे एकूण ५३ मंजूर पदांपैकी ३४ पदे भरण्यात आलेली असून उर्वरित पदे भरण्याची कार्यवाही सुरु आहे. मराठी भाषा विभागात वर्ग करण्यात आलेले विषय व मंजूर कर्मचारीवृंद विचारात घेऊन शासन निर्णय दिनांक ६ मे, २०११ दि. १४/११/२०११ व दि. २/५/२०१२ अन्वये विभागातील कामकाजासाठी ८ कार्यासने निर्माण करण्यात आली व कर्मचारीवृंदाचे वाटप करण्यात आले आहे. विभागासाठी नवीन प्रशासन भवनाच्या ८ व्या मजल्यावरील २४०० चौ.फू.च्या जागेचे वाटप माहे जुलै, २०११ मध्ये करण्यात आले असून, विभागाचे कामकाज सुरु झाले आहे.
स्त्रोत : महाराष्ट्र शासन
अंतिम सुधारित : 3/25/2020
मानवाच्या उक्रांतीमध्ये त्याचं द्विपाद होणं जितकं ...
यूरोपियन भाषाकुटुंबातील इटालिक समूहाच्या लॅटिन भाष...
भाषेचा विचार करताना किंवा तिचा भाषा म्हणून अभ्यास ...
इंग्रजीचा किंवा मराठीचा द्वेष आणि अभिमान बाळगणं नव...