बाष्पके संचालनालय, कामगार विभाग, महाराष्ट्र शासन
बाष्पक अपघातापासून मालमत्ता तसेच जीवन संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी बाष्पकाची काटेकोरपणे तपासणी.
बाष्पक म्हणजे ज्या बंद पात्र साधनात दाबाखाली बाष्प निर्मीती होते. हे बाष्प ऑईल मिल, वस्त्र उद्योग, रासायनिक उद्योग, पेट्रोकेमिकल्स, रिफायनरिज (कच्चे खनिज तेल), दुग्ध/खादय व्यवसाय, हॉटेल उद्योग, विजनिर्मीती इत्यादीसाठी वापरली जाते. या सर्व उद्योगात बाष्पकांची गरज भासते.
जरी बाष्पक हा अत्यंत उपयोगी असला तरी त्याच्या स्फोटकतेमुळे तो धोकादायक ठरु शकतो. अपघात हे बाष्पकाच्या स्फोटामुळे होतात व त्यामुळे जिवीत व वित्त हानी होऊ शकते. इ.स.१८६९ मध्ये मुंबईत झालेल्या दोन बाष्पक अपघातात जिवीत व वित्त हानी झाली. म्हणुन इ.स.१८६९ मध्ये मुंबई येथे बाष्पक निरीक्षण विभागाची स्थापना करण्यात आली आणि त्यानंतर भारतीय बाष्पक अधिनियम १९२३, राष्ट्रीय पातळीवर अंमलात आला.
संदर्भ : कामगार विभाग, महाराष्ट्र शासन
अंतिम सुधारित : 8/30/2020