वेबसाईट : ई-प्रशासन प्रशिक्षण आणि प्रमाणन
भारतातील ई-प्रशासनासंदर्भातील पहिल्या ऑनलाईन प्रमाणपत्र प्रशिक्षण कार्यक्रमात आपले स्वागत आहे. महाराष्ट्र शासनाच्या माहिती-तंत्रज्ञान संचालनालयातर्फे हा उपक्रम राबविला जात आहे. या विशिष्ट प्रमाणपत्र कार्यक्रमांतर्गत उमेदवाराच्या ई-प्रशासनासंदर्भातील ज्ञान आणि कौशल्याची चाचणी घेतली जाते. माहिती तंत्रज्ञान संचालनालयातील कर्मचारी, सल्लागार आणि महाराष्ट्र शासनासोबत कार्यरत सर्व सॉफ्टवेअर डेव्हलपर्ससाठी हा कार्यक्रम अनिवार्य आहे. देशभरातील कोणत्याही ई-प्रशासन प्रकल्पात कार्यरत सर्व सहभागींसाठीही या प्रमाणपत्र कार्यक्रमाची शिफारस करण्यात आली आहे.
या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमासाठी वाचन साहित्य आणि महत्वाच्या संकेतस्थळांचे दुवेही (लिंक्स) उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याव्दारे प्रत्यक्ष माहितीच्या माध्यमातून ई-प्रशासनाशी संबंधित प्राथमिक आणि मूलभूत तत्त्वे सहजपणे आत्मसत करता येतील. या पृष्ठावर डावीकडे उपलब्ध वाचन साहित्याव्यतिरिक्त संपूर्ण चाचणीमध्येही ठिकठिकाणी मूलभूत अभ्यासक्रमाच्या साहित्याची नोंद करण्यात आली आहे. वाचा, पुन्हा वाचा आणि त्याच वेळी प्रश्नांची उत्तरेही लिहा.
खुल्या पुस्तकातून परीक्षा अर्थात 'ओपन बुक टेस्ट' हे या उपक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य. केवळ व्याख्यांच्या पाठांतरावर भर नसून मूळ तत्त्वे समजून घेणे आणि ती प्रत्यक्ष आचरणात आणणेही महत्वाचे आहे. उमेदवार मुक्तपणे संकेतस्थळावर माहिती शोधू शकतात आणि वाचू शकतात. मात्र प्रश्नांची उत्तरे त्यांनी स्वतःच्या भाषेत लिहिणे अपेक्षित आहे.
स्त्रोत : महाराष्ट्र शासन
अंतिम सुधारित : 8/30/2020
सातारा जिल्ह्याच्या वाई येथील रेश्मा गाढवे आणि विश...
बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई गावात जन्मल्यापासून आयुष...
भारतरत्न डॉ.बाबासाहेब यांचा सामाजिक समतेचा विचार ज...
शिक्षण हे व्यक्तिविकास साधण्याचे एक प्रमुख साधन मा...