आरोग्य क्षेत्र दिवसेंदिवस विस्तारणारे क्षेत्र आहे. या क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध होत आहेत. डॉक्टरांबरोबरच अनेकजन या क्षेत्रात कार्यरत असतात. मानवसेवा ही भूमिका घेऊन करिअर करू इच्छित असणाऱ्यांसाठी परिचारिका (नर्सिंग) हा उत्तम पर्याय होऊ शकतो. गरजवंताचे संगोपन करणे, संवर्धन करणे, पोषण करणे तसेच त्यांना शिक्षण देण्याचे कार्य जी व्यक्ती करते, तिला 'परिचारिका' असे ढोबळ मानाने म्हणतात. सामाजिक आरोग्यसेवा पुरविणे, माता-बाल सेवा पुरविणे तसेच नर्सिंगसंबंधीचे प्रशासन तसेच व्यवस्थापन विषयक कामे पाहणे रुग्ण व नातेवाईकांना आरोग्य सल्ला देणे अशी कामे त्यांना करावी लागतात. अलिकडे समुपदेशनाचे कार्यही परिचारिका करीत आहेत. हे क्षेत्र तरुणींसाठी जास्त सुरक्षित असल्याचे मानले जाते. केरळ व इतर दक्षिणेतील तरुणींचा या क्षेत्राकडे जास्त ओढा असल्याचे दिसून येते. परदेशातही नोकरीच्या अनेक संधी आता सहजरीत्या उपलब्ध होत आहेत. देशातही रुग्णालयांची संख्या वाढते आहे आणि उपलब्ध मनुष्यबळाची आवश्यकता भासत आहे. अधिक सुरक्षित समजल्या जाणाऱ्या या क्षेत्रात करिअर करतानाचे अचूक टप्पे कोणते याची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.
नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ या संस्थेमार्फत बीएस्सी इन नर्सिंग, बेसिक बीएसस्सी इन नर्सिंग, फेलोशिप कोर्स इन ऑर्थोपेडिक अॅण्ड रिहॅबिलिटेशन इन नर्सिंग, फेलोशिप कोर्स इन ऑपरेशनरूम नर्सिंग, पोस्ट सर्टिफिकेट इन बीएस्सी इन नर्सिंग, सर्टिफिकेट इन बीएस्सी इन नर्सिंग हे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
इंदोर येथील बॉम्बे हॉस्पिटल कॉलेज ऑफ नर्सिंग या संस्थेच्या बीएस्सी इन नर्सिंग या अभ्यासक्रमाला ४० विद्यार्थिनींना प्रवेश दिला जातो. प्रवेशपरीक्षेतील यशस्वी उमेदवारांना अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जातो. पत्ता- बॉम्बे हॉस्पिटल, रिंगरोड, इंदोर- ४५२०१०. अधिक माहिती www.bombayhospitalindore.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी (अभिमत विद्यापीठ) या संस्थेच्या बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमाला देशस्तरीय सामायिक प्रवेश चाचणी एआयईटी, या परीक्षेद्वारे प्रवेश दिला जातो. एकूण जागा ५० असतात. ही परीक्षा मे महिन्यात नवी मुंबई, पुणे, कोल्हापूर, हैद्राबाद, नवी दिल्ली या केंद्रांवर घेतली जाते. पत्ता- ८६९, ई कसबा बावडा, कोल्हापूर- ४१६००६. ई मेल- info@dypatilunikop.org
कऱ्हाड येथील कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या संस्थेकडून कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (अभिमत विद्यापीठ) अंतर्गत बॅचलर ऑफ नर्सिंग या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी देशस्तरीय सामायिक प्रवेश चाचणी मे महिन्यात मुंबई, नागपूर, पुणे या शहरांमध्ये घेतली जाते. या परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांला बारावी विज्ञान परीक्षेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि इंग्रजी या विषयांमध्ये सरासरीने ५० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. पत्ता- कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस युनिव्हर्सिटी कराड. वेबसाइट- www.kimsuniversity.in
भारती विद्यापीठाच्या स्कूल ऑफ नर्सिग (सांगली, पुणे आणि नवी मुंबई) येथे बीएस्सी इन नर्सिंग हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. पत्ता- भारती विद्यापीठ, अभिमत विद्यापीठ, भारती विद्यापीठ भवन, दुसरा मजला, सीईटी डिपार्टमेंट, एलबीएस मार्ग, पुणे- ४११०३०. वेबसाइट- www.bharatividyapeethuniversity.net
कोकिलाबेन धीरुभाई अंबानी कॉलेज या संस्थेने बीएस्सी इन नर्सिंग हा चार वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. येथे ५० विद्यार्थिनींना प्रवेश दिला जातो. निवडीसाठी शासनाच्या सामायिक प्रवेश चाचणी किंवा खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या असोसिएट सीईटीमधील गुणांचा आधार घेतला जातो. पत्ता- कोकिलाबेन हॉस्पिटल, चार बंगला, अंधेरी पूर्व, मुंबई- ४०००५३.
खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील नर्सिंग अभ्यासक्रम - असोसिएशन ऑफ मॅनेजमेंट ऑफ अनएडेड प्रायव्हेट मेडिकल अॅण्ड कॉलेजेस ऑफ महाराष्ट्र या संस्थेमार्फत मेडिकल सामायिक प्रवेश चाचणीसाठी सीईटी साधारणत: मे महिन्यात घेतली जाते. या परीक्षेद्वारे ५३ नर्सिग महाविद्यालयांतील २२४० जागा भरण्यात येतात. (दरवर्षी यात वाढ होऊ शकते.) पत्ता- असोसिएशन ऑफ मॅनेजमेंट ऑफ अनएडेड प्रायव्हेट मेडिकल अॅण्ड कॉलेजेस ऑफ महाराष्ट्र, एएमयूपीएमडीसी ऑफिस, श्रीजी हाऊस, ७५, मिंट रोड, फोर्ट, मुंबई- ४००००१.
अमृता विद्यापीठम या संस्थेच्या स्कूल ऑफ नर्सिंगमार्फत बॅचलर ऑफ नर्सिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मे महिन्यात अमृतापुरी, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, कोची, कोलकाता, कोझिकोड, नवी दिल्ली, थिरुवनंतपूरम या ठिकाणी प्रवेश परीक्षा घेतली जाते. अर्हता- बारावी विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र किंवा जैवरसायनशास्त्र या विषयांमध्ये सरासरी ६० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. पत्ता- द अॅडमिशन, को-ऑर्डिनेटर, ऑफिस ऑफ द अॅडमिशन्स, अमृता इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस, एआयएमएस- पोनेक्करा, पोस्ट ऑफिस- कोची- ६८२०४१ केरळ. वेबसाइट- www.amrita.edu
या संस्थेत एएनएम हा पदविका अभ्यासक्रम चालविला जातो. प्रवेश अर्हता- दहावी उत्तीर्ण), विद्याशिक्षण प्रसार मंडळाचे कॉलेज ऑफ नर्सिंग अॅण्ड रिसर्च सेंटर, दिगडोह हिल्स, हिंगणा रोड, नागपूर- ४४००१० या उपलब्ध ठिकाणी परिचारिका(नर्सिंग) या क्षेत्राचे व्यावसायिक शिक्षण दिले जाते.
विज्ञान तंत्रज्ञानाचा या क्षेत्रातील वाढता वापर लक्षात घेता नवनवीन संज्ञा, शाखा उदयास येत आहेत. यासाठी कुशल प्रशिक्षित मनुष्यबळाची नितांत गरज भासते आहे. आकर्षक वेतन आणि पूरक सोयीसुविधा उपलब्ध होत असल्याने या क्षेत्रात करिअर करणे हा यशाचा राजमार्ग ठरू शकतो.
लेखक - सचिन पाटील
स्त्रोत - महान्युज
अंतिम सुधारित : 6/25/2020