या सुविधेमुळे सरकारी हॉस्पिटलमधील सेवा अधिक सोयीस्कर होतील. शिवाय ओपीडीमध्ये डॉक्टरांना भेटणंही अधिक सुलभ होणार आहे. विशेष म्हणजे या सुविधेमुळे घरातूनच एखाद्या डॉक्टरच्या भेटीची वेळ घेऊ शकता.
ऑनलाइन नोंदणी प्रणाली आधार क्रमांकाद्वारे देशातील विविध रुग्णालयांना जोडण्याचा एक प्रयत्न आहे.
कोणत्याही सरकारी रुग्णालयात ओपीडी मध्ये डॉक्टरांच्या भेटीची वेळ घेणे, लॅब रिपोर्ट मिळवणे आणि रक्त उपलब्धता पाहणे हे ऑनलाइन आणि सोपे झाले आहे.
१. सरळ अपॉइंटमेंट प्रक्रिया : रुग्णालयातील पहिली नोंदणी आणि डॉक्टरांची भेट घेण्याची प्रक्रिया अधिक सोपी. आपण फक्त आपला आधार क्रमांक वापरून पडताळणी करून घ्यायचे आणि त्यांनतर रुग्णालय व विभाग निवडून डॉक्टरांना भेटीची तारीख निवडायची आणि त्याचा लगेच आपणास एसएमएस येईल.
२. डैशबोर्ड रिपोर्ट. : ज्या रूग्णालयातील विविध विभागामध्ये इंटरनेट द्वारे अपॉइंटमेंट घेत येईल अशा एकूण रुग्णालयांची संख्या यामध्ये पाहता येईल
३. रुग्णालय जोडणी : रुग्णालये या प्लॅटफॉर्म बोर्डवर येऊन रुग्णांना ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी त्यांच्या भेटीचे स्लॉट प्रदान करू शकतात. हि प्रणाली रुग्णालयांना सहजपणे त्यांच्या नोंदणी आणि नियुक्ती प्रक्रिया व्यवस्थापित करण्यासाठी आणि रुग्ण प्रवाह नियंत्रीत करण्यासाठी सोय उपलब्ध करून देते.
संदर्भ : ओआरएस वैद्यकीय देखभाल (मेडिकल केअर, एक डिजिटल इंडियाचा उपक्रम )
संकलन : छाया निक्रड
अंतिम सुधारित : 10/28/2019