অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

डिजीलॉकर

डिजीलॉकर

डिजिलॉकर काय आहे

डिजिलॉकर व्यक्तिगत माहितीसाठ्यासाठी ठराविक क्षमतेची स्टोरेज स्पेस पुरवते. ही जागा रहिवाशांच्या आधार क्रमांकाशी जोडलेली असते. ई-कागदपत्रे सुरक्षितपणे जपून ठेवण्यासाठी तसेच विविध जारीकर्ता विभागांकडून आलेल्या कागदपत्रांच्या युनिफॉर्म रिसोर्स आयडेंटीफायर (URI) लिंक जपून ठेवण्याकरिता डिजिलॉकर उपयुक्त ठरते. इ-साइन सुविधा हा डिजिलॉकर व्यवस्थेचा भाग म्हणून देण्यात आलेला असल्यामुळे ई-कागदपत्रांवर डिजिटल स्वाक्षरी करता येते. वेब पोर्टलद्वारे किंवा मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे डिजिलॉकर वापरता येते.

डिजिलॉकरची महत्त्वाची अंगे

प्रत्येक नागरिकाच्या डिजिलॉकर अकाउंटमध्ये खालील वर्गीकरण आढळते :

  • डॅशबोर्ड – या अंतर्गत लॉगइन केल्यानंतरचे पहिले पान दिसते. तुमच्याजवळच्या सर्व कागदपत्रांचा गोशवारा ते दाखवते.
  • जारी कागदपत्रे -   या अंतर्गत कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे जिथून मिळाली ती संबंधित सरकारी खात्याची यूआरएल लिंक दाखवली जाते.  किंवा डिजिलॉकरमध्ये सहभागी एजन्सीद्वारे ते मिळाले असल्यास तिची संबंधित लिंक दाखवते.
  • अपलोड केलेली कागदपत्रे – या अंतर्गत तुम्ही अपलोड केलेली सर्व कागदपत्रे दिसतात. डॉक्युमेंट टाइप (प्रकार), ई-साइन या बाबी तुम्ही अपडेट (ताजी) करू शकता. आणि अपलोड करण्यात आलेली ही कागदपत्रे शेअर करू शकता.
  • शेअर केलेली कागदपत्रे -  या अंतर्गत तुम्ही जी जी कागदपत्रे इतरांना ई मेलने शेअर केली त्यांची यादी दिसते.
  • कृतीक्रम – या अंतर्गत तुम्ही डिजिलॉकरमध्ये ज्या कृती केल्या आहेत त्यांचा क्रम दिसतो त्या क्रमाने दिसतात. उदा. फाइल अपलोड, डाउनलोड करणे, ई साइन यांसारख्या कृती.
  • जारीकर्ते  – या अंतर्गत डिजिलॉकरवर जारीकर्ता म्हणून नोंदणीकृत असलेल्या सरकारी विभाग तसेच एजन्सींच्या नावांची यादी असते. यापैकी एखाद्या विभागाने तुम्हाला कागपत्र अथवा प्रमाणपत्र जारी केले तर ते यूआरएल – लिंकच्या स्वरूपात दिसेल आणि ते तुम्हाला ‘जारी केलेली कागपत्रे’ या वर्गवारीमध्ये आढळेल.

वापर कसा करावा

नागरिकांकरिता

  • लॉगइन करण्यासाठी प्रत्येकाने आपला मोबाइल क्रमांक लॉगइनसाठी दिलेल्या रिकाम्या चौकटीत भरायचा आहे.
  • मोबाइलवर एकदाच वपारण्यासाठीचा - वन टाइम पासवर्ड (OTP) पाठवला जाईल.
  • हा OTP संबंधित रिकाम्या चौकटीत भरून लगेचच यूजर नेम व पासवर्ड सिलेक्ट करावा. आता तुमचे डिजिलॉकर खाते तयार झाले.
  • डिजिलॉकर खाते यशस्वीपणे उघडले गेले की तुम्ही तुमचा आधार क्रमांक पुरवून (UIDAI ने दिलेला) आणखी सेवा मिळवू शकता.
  • या कृती पूर्ण केल्यानंतर नागरिक विविध जारीकर्ते जारी करत असलेली ई-कागदपत्रे डिजिटल लॉकरमध्ये पाहू शकतात.
  • नागरिक आपल्या डिजिटल लॉकरमध्ये ई-कागदपत्रे अपलोड करू शकतात तसेच त्यांच्या ई-स्वाक्षरी करू शकतात.
  • नागरिक मागणीकर्त्यांना पाहण्यासाठी खासगी कागदपत्रेसुद्धा शेअर करू शकतात. मागणीकर्त्यांच्या ई-मेल पत्त्यावर हे पाठवता येते.
  • ही सर्व प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली की डिजिटल लॉकर खात्यामध्ये साइन-इन करू शकता. त्यासाठी आधार, OTP, किंवा युजरनेम, पासवर्ड वापरावा किंवा सोशल मीडिया खात्याने साइन-इन करावे.

जारीकर्त्यांकरिता

  • - जरीकार्त्याने डिजिटल लॉकर व्यवस्थेवर नोंदणी करून जारीकर्ता ओळखपत्र  मिळवावे.
  • - ओळखपत्र मिळाल्यानंतर जारीकर्ताने स्टॅंडर्ड XML फॉरमॅटमध्ये विहित ठिकाणी कागपत्र अपलोड करावे. त्यासाठी API विहित जागा पुरवणाऱ्या सेवेची मदत घ्यावी.
  • - प्रत्येक दस्तऐवज अपलोड केल्यांनतर त्याचे स्वतःचे ठिकाण असते व त्याची नक्कल होत नाही कारण अद्वितीय असा URI (Uniform Resource Identifier) त्याला देण्यात आलेला असतो. त्यामध्ये जारीकर्त्याचा ओळखक्रमांक, कागदपत्राचा प्रकार व कागदपत्राचा ओळखक्रमांक असतो. कागदपत्राचा URI संबंधित नागरिकांच्या डिजिटल लॉकरकडे आधार क्रमांकानुसार जातो.

मागणीकर्त्यांकरिता

  • मागणीकर्त्यांने सर्वप्रथम डिजिटल लॉकर व्यवस्थेच्या बोर्डावरीव प्रवेशसुविधेकडे नोंदणी करणे आवश्यक आहे.
  • कागदपत्र URI (Uniform Resource Identifier) हे मागणीकर्त्याने संबंधित प्रवेशद्वारातून सुरक्षितपणे प्राप्त करावे.

नागरिकांच्या डिजिटल लॉकरची विविध अंगे कोणती?

प्रत्येक रहिवाशाच्या डिजिटल लॉकरमध्ये खालील वर्गीकरण असते :

i. माझी प्रमाणपत्रे : यामध्ये दोन भाग असतात.

. डिजिटल कागदपत्रे - यात सरकारी खात्याने वा एजन्सीने जारी केलेल्या कागपत्राची URI (लिंक) असते. प्रत्येक कागदपत्रात खालील माहिती असते

  • URI
  • कागदपत्राचे नाव
  • जारी करण्याची तारीख
  • शेअर करण्यासाठीचा विकल्प

. अपलोड केलेली कागदपत्रे - रहिवाशाने अपलोड केलेल्या सर्व कागदपत्रांची यादी या उपविभागात दिसते. . प्रत्येक कागदपत्रात खालील माहिती असेल

  • कागदपत्राचे नाव
  • अपलोड करण्याची तारीख
  • सद्यस्थिती : कागदपत्रावर ई-स्वाक्षरी केली आहे की नाही ते दर्शवते.
  • कृती : डिजिटल लॉकरमधून कागदपत्र काढून टाकण्यासाठी
  • तपशील
  • शेअर : अपलोड केलेले कागदपत्र याद्वारे ई-मेल माध्यमातून शेअर करता येते.
  • डिजिसाइन विकल्प : कागपत्रावर ई-स्वाक्षरी झाली की येथे ‘√’ अशी खूण दिसते.

ii. माझी वैयक्तिक माहिती

रहिवाशाची संपूर्ण वैयक्तिक माहिती या विभागात दाखवली जाते. (नाव, जन्मतारीख, लिंग, निवासाचा पत्ता, ई- मेल, मोबाइल क्रमांक) ही माहिती UIDAIच्या माहितीबरहुकुम हवी.

iii. माझा जारीकर्ता

जारीकर्त्याचे नाव आणि त्याने रहिवाशास री केलेल्या कागदपत्रांची संख्या या विभागात दाखवली जाते.

iv. माझे मागणीकर्ते

कागदपत्रांची मागणी करणाऱ्या मागणीकर्त्याचे नाव व त्याने रहिवाशाकडून मागवलेल्या कागदपत्रांची संख्या या विभागात दाखवली जाते.

v. डिरेक्टरी

या विभागात सर्व नोंदणीकृत जारीकर्त्यांच्या व मागणीकर्त्यांच्या नावांची यादी त्यांच्या संबंधित लिंकसकट असते.

माझ्या डिजिटल लॉकरमध्ये कागपत्र कसे अपलोड करावे?

अपलोड डॉक्युमेंट ही सुविधा ‘माझी प्रमाणपत्रे’ या सदरात उपलब्ध आहे.

  1. सर्वप्रथम दिलेल्या यादीतून कागदपत्राचा प्रकार निवडा. (एसएससी प्रमाणपत्र, एचएससी प्रमाणपत्र, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र इ.)
  2. कागदपत्राचे नाव पुरवा.
  3. कागदपत्राचा जो प्रकार असेल त्यानुसार, त्याच्याशी संबंधित अन्य तपशील भरायचा आहे.
  4. आपल्याजवळील मशीनमध्ये असलेली या कागदपत्राची फाइल डिजिटल लॉकरवर अपलोड करण्यासाठी निवडा.  अपलोड करण्यात येणाऱ्या प्रत्येक फाइलचा आकार 1MB हून अधिक नसावा. [1 MB हा फाइलचा जास्तीत जास्त मोठा आकार] pdf, jpg, jpeg, png, bmp and gif प्रकारच्या फाइलच केवळ स्वीकारल्या जातील. कागदपत्राचे वर्णन द्या. (कमाल 50 वर्ण)
  5. ‘अपलोड’ बटन दाबा.

अपलोड यशस्वी झाल्यानंतर ते कागदपत्र ‘अपलोड झालेली कागदपत्रे’ या सदरात दिसतील.

माझ्या डिजिटल लॉकरमधील ई कागदपत्रे मी शेअर कशी करावीत?

  • तुमचे ई-कागदपत्र शेअर करण्याकरिता (जे ‘डिजिटल कागदपत्रे’ सदरात URI म्हणून उल्लेखिलेले असेल किंवा ‘अपलोडेड कागदपत्रे’ सदरात असेल) कागदपत्रासमोर देण्यात आलेल्या ‘शेअर करा’ या विकल्पावरचे बटन निवडा.
  • एक संवाद चौकट समोर येईल. तिथे विचारल्यानुसार कृपया तुमच्या प्राप्तकर्त्याचा ई-मेल पत्ता भरा. मग शेअर बटन दाबा.
  • शेअर केलेले कागदपत्र प्राप्तकर्त्याला ई-मेलद्वारे पोहोचेल.  प्राप्तकर्त्याला ‘no-reply@digitallocker.gov.in’. यांच्याकडून तो मेल आलेला दिसेल. ई-मेलमधील विषयाच्या सदरात कागदपत्राचे नाव आणि कागदपत्राचा प्रकार नमूद केलेला दिसेल. ई-मेलमधील मजकूर लिहिण्यासाठीच्या सदरात URI लिंक असेल. आणि प्रेषकाचे नाव व आधार क्रमांक असेल.
  • ई- मेलमधील URI लिंक वापरून प्राप्तकर्ता कागदपत्र पाहू शकतो.

याद्वारे मला कोणते लाभ होतात?

याद्वारे कागदपत्रांचे गठ्ठे जवळ बाळगण्याचा व्याप राहणार नाही आणि ई-कागदपत्रांची अधिकृतता राखली जाईल. सरकारद्वारे जारी करण्यात आलेले दस्तावेज सुरक्षित मार्गे मिळतात. सरकारी खात्यांना व एजन्सींना कागपत्रे सांभाळण्यासाठी जे व्यवस्थापन करावे लागते, त्यावरील बोजाही याने कमी होतो. परिणामी नागरिकांना सेवा मिळणेही सरल होते.

नोंदणी करा

डिजिलॉकर सपोर्ट टीम इ-मेल support@digitallocker.gov.in

स्रोत :  DigiLocker.gov.in

अंतिम सुधारित : 8/7/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate