संगणकाच्या क्रांतीमधुनी साकारु या स्वप्न नवे
चला गड्यांनो आरंभू या जलसेवेचे पर्व नवे ॥धृ॥
शिवप्रभूच्या महाराष्ट्राची धुरा आम्ही वाहतो
ईतीहासाच्या पानोपानी हीत जनांचे पाहतो
ईतीहासाला साक्षी ठेऊनी गीत उद्याचे गाऊ नवे
चला गड्यांनो आरंभू या जलसेवेचे पर्व नवे ॥1॥
सोडून देऊ कासवगती ही नकोच नकारघंटा
जनतेचेच सेवक आम्ही का सेवेचा तोटा
जनसेवेस्तव जोडून घेउ संगणकाशी नाते नवे
चला गड्यांनो आरंभू या जलसेवेचे पर्व नवे ॥2॥k
ज्ञानेशाच्या बंधुत्वाचा भाव जाणूनी घेऊ
जनामनांच्या आकांक्षाचा ठाव जाणूनी घेऊ
दश कोटींच्या प्रश्नांसाठी उत्तर शोधू नित्य नवे
चला गड्यांनो आरंभू या जलसेवेचे पर्व नवे ॥3॥
पाणी म्हणजे जीवन गड्या जीवन म्हणजे पाणी
टपोर थेंबामधूनी फुलती शिवारातली गाणी
सिंचित करण्या अवघी मायभू तंत्राचे बळ घेऊ नवे
चला गड्यांनो आरंभू या जलसेवेचे पर्व नवे ॥4॥
आम्ही मावळे सेवक असू कृष्णा भीमा गोदाईचे
खळखळणा-या जलापरी गतीमान आम्हा व्हायचे
प्रगतीसाठी गती असू दे सुत्र जगाचे जाण नवे
चला गड्यांनो आरंभू या जलसेवेचे पर्व नवे ॥5॥
स्त्रोत : महाराष्ट्र शासन
अंतिम सुधारित : 8/17/2020
अरे खोप्यामधी खोपा, सुगडिणीचा चांगला, पहा पिल्लासा...
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, जगी जे हीन अ...
एक होता काऊ, तो चिमणीला म्हणाला, "मला घाल न्हाऊ, घ...
ए आई मला पावसात जाउ दे, एकदाच ग भिजुनी मला चिंब चि...