पारंपारिक शेतीमध्ये कष्ट जास्त करावे लागत होते व उत्पन्न कमी होत असे पण सध्याच्या काळात कमी खर्चामध्ये दुप्पट उपन्न वाढू लागले. विविधता असल्यामुळे उत्पनात वाढ झाली असून रोगराई जास्त प्रमाणात वाढू लागल्याने खर्चात वाढ झाली.
आमच्या गावात सुरेश भांगरे या शेतकऱ्याने टोमॅटोची शेती केली. आधी माती परीक्षण केल्यावर किती खत वापरायचे व कोणते खते वापरायचे. किती प्रमाणात वापरायचे यांची माहिती मिळून घेतली व मातीचे गुणधर्म जाणून घेतले.
जमिनीचे मुलभूत तीन गुणधर्म असतात. ते म्हणजे भौतिक, रासायानिक व जैविक गुणधर्म आढळतात. पिकांच्या वाढीसाठी पोषक वातावरण राहावी म्हणून या तिन्ही गुणधर्मांची माहिती पाहिजे. मातीच्या कणांचे प्रकार आढळतात. त्यामध्ये जाड वाळु, सबाकी वाळु, पोयण व चिकण माती असे प्रकार पडतात.
वाळूचे कण बारीक आकाराचे, चिकट व गुळगुळीत असतात व हलकी व मध्यम भाती जमिन टोमॅटोसाठी निवडतात.
जमिन कशी तयार करावी, त्यामध्ये टोमॅटोचे पीक व कमी अधिक जास्त उत्पन्न देणारे पीक असल्यामुळे जमिनीची सुपीकता चांगली असणे आवश्यक आहे. जमिनीची नांगरणी करताना जमिनीची पृष्ठभागावर उघडे पडलेले तण आणि किडी किंवा कोश यांचा नाश करावा. नंतर कुळवाची पाली देऊन जमिन भुसभूशीत करावी. नांगरलेली जमिन सपाट करावी व जमिनी गरजेनुसार थोडासा ढाळ द्यायचा व पहिल्या पिकांच्या वेळी ज्या बाजूने पाणने पाणी दिले जाते त्याच्या विरुद्ध बाजूवर उतार द्यावा. म्हणजे आधीच्या पिकाच्या वेळी साठवलेले क्षार धुवून जाईल. तर एक एकरसाठी २० बैलगाड्या टाकावे. काढण्यापूर्वी सुफलता (२०:२०:००) तर १२५ किलो पालाश, ४० किलो निंबोळी पेंड त्यानंतर ७५ सें.मी. अंतरावर सप्यापाडून वाफे तयार करण्यात व वाळवी साठी एक एकरसाठी ८ किलो १० टक्के दाणेदार मिसळावे.
टोमॅटोची जात निवडताना उन्हाळी व हिवाळ्यात येणाऱ्या जातीची निवड करावी. त्यासाठी एक एकरसाठी ४० ग्रम बियाणे लागते. टोमॅटोची योग्य अवस्थेतील रोपे लागवडी करिता तयार केलेल्या जमिनीत लागवड करावी.
माहितीदाता : दिपक हेमा भांगरे
अंतिम सुधारित : 7/24/2020