हलकी व मध्यम माळरानाची, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन या पिकास योग्य असते. पाणथळ, चोपण, क्षारयुक्त जमिनीत या पिकाची लागवड टाळावी.
हेक्टरी ५ टन शेणखत / कंपोस्ट खत द्यावे. मृगाचा पाऊस झाल्यानंतर कुळवाच्या दोन पाळ्या द्याव्यात.
हेक्टरी बियाणे प्रमाण : १२ ते १५ किलो.
पेरणी अंतर : दोन ओळीत ३० सें.मी. व दोन रोपात १० सें.मी. ठेवावे.
बीजप्रक्रिया - १ किलो बियाण्यास २ ग्रॅम थायरम + २ ग्रॅम कार्बेन्डेझीम चोळावे यानंतर २५० ग्रॅम रायझोबियम जीवाणू संवर्धन १० ते १५ किलो बियाण्यास गुळाच्या थंड द्रावणातून चोळावे.
१२-१५ किलो नत्र आणि २५-३० किलो स्फुरद या प्रमाणे रासायनिक खताची मात्र द्यावी. म्हणजेच ७५ किलो डीएपी प्रति हेक्टर प्रमाणे पेरणी करताना खत द्यावे.
पीक २०-२५ दिवसाचे असताना पहिली कोळपणी आणि ३० ते ३५ दिवसाचे असताना दुसरी कोळपणी करावी.
पेरणीनंतर ३० ते ३५ दिवस पीक तणविरहीत ठेवावे.
अ.नं. |
वाण |
प्रसाराचे वर्ष |
पिकाचा कालावधी (दिवस) |
उत्पादन क्विं./हे. |
वैशिष्ट्ये |
लागवडीचा प्रदेश |
कुळीथ वाण |
||||||
१. |
सीना |
१९८४ |
११५ - १२० |
७ - ८ |
फिक्कट रंगाचे तपकिरी दाणे, पिवळा विषाणू रोगास प्रतिकारक्षम |
पश्चिम महाराष्ट्र |
२. |
माण |
१९८६ |
१०० - १०५ |
६ - ७ |
गर्द लालसर रंगाचे दाणे, उभट वाढ |
पश्चिम महाराष्ट्र |
माहिती स्रोत : कृषी विभाग महाराष्ट्र शासन
अंतिम सुधारित : 3/31/2020