महाराष्ट्रात भुईमुगाच्या पिकावर पाने गुंडाळणारी अळी, मावा, फुलकिडे, तुडतुडे या किडी प्रामुख्याने आढळून येतात. याशिवाय काही भागात हुमणी, वाळवी किंवा पाने खाणा-या अळ्या या किडींचाही उपद्रव झाल्याचे आढळून येते. मावा ही कोड विशेषतः पाऊसमान योग्य असेल तेव्हा भुईमूग फुलोन्यात किंवा आन्याच्या अवस्थेत असताना जुलै आणि ऑगस्ट या महिन्यात दिसून येते. तुडतुडे खरीप हंगामात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात जास्त प्रमाणात दिसून येतात.
कमी पाऊसमान आणि उष्ण हवामानात तुडतुड्यांचा उपद्रव जास्त हानिकारक असतो. आपल्याकडे फुलकिड्यांच्या तीन प्रकारच्या जाती असून पाऊसमान व जास्त तापमान असेल त्यावेळी काळसर रंगाचे फुलकिडे दिसून येतात. भुईमुगाच्या खालील पानावर पांढरट चट्टे/पट्टे दिसून येतात. तर इतर दोन प्रकारच्या तुडतुड्यामुळे भुईमुगाच्या वरील आणि मधल्या पानावर पिवळसर चट्टे दिसतात आणि त्यामुळे पाने अत्यंत छोटी राहून 'शेंडामर’ (बूड Necrotic Disease) हा विषाणुयुक्त रोग पडतो. विशेषतः ऑगस्ट-सप्टेंबर आणि जानेवारी-फेब्रुवारी या महिन्यात या किडीमुळे जास्त नुकसान होते. या किडींशिवाय पाने गुंडाळणा-या अळीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणावर पडत असल्याचे दिसून आलेले आहे. विशेषत: खरीप हंगामाबरोबर उन्हाळी हंगामात जिथे भुईमूग घेतला जातो अशा भागामध्ये या किडीमुळे खरीप हंगामात भुईमुगाचे खूप नुकसान होते.
पडून तापमान वाढत जाऊन पाण्याचा ताण जेव्हा पिकावर पडतो अशावेळी ही कोड फार मोठ्या प्रमाणावर पडून भुईमुगाचे संपूर्ण नुकसान झाल्याचे दिसून येते. या किडी बरोबरच निरनिराळ्या प्रकारच्या पाने खाणा-या अळ्या काही वेळेस काही भागात दिसून येतात. तर मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्रात हुमणी/वाळवी सारख्या किडीमुळे झाडे वाळून गेलेली दिसतात. या सर्व किडींच्या उपद्रवाचा काळ फुलो-यात किंवा आन्याच्या अवस्थेत असल्याने पिकाचे नुकसान जास्त होते. भुईमूग उगवणीनंतर ३० ते ६० दिवसांचा काळ हा मावा, फुलकिडे, तुडतुडे, पांढरीमाशी, पाने गुंडाळणारी अळी व पाने खाणा-या अळ्या या किडींच्या नियंत्रणासाठी अत्यंत महत्वाचा असून या अवस्थेत जर पीक संरक्षणाचे उपाय योजले नाहीत, तर उत्पादनात घट येऊन आर्थिकदृष्ट्या किफायतशीर उत्पादन होत नाही.
भुईमुगावर मर, मुळकूज, खोडकूज, तांबेरा, टिका आणि शेंडेमर हे रोग प्रामुख्याने आढळतात.
स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन
अंतिम सुधारित : 10/7/2020
खाद्य तेल पिके-भुईमूग, तीळ, कारळा, मोहरी, जंबो, कर...
उन्हाळी भुईमुगाचे जातीनिहाय उपट्या जातीचे वाळलेल्य...
तेलबिया पिकांपैकी भुईमूग प्रमुख पीक आहे. भुईमुगामध...
महाराष्ट्रात भुईमुग प्रामुख्याने खरीप हंगामात घेतल...