1) रबराची वाढ उष्ण व दमट हवामानात चांगली होते. भरपूर सूर्यप्रकाश व 75 ते 95 टक्के आर्द्रता असलेल्या परिसरात याची वाढ चांगली होते. या पिकास 21 ते 35 अंश सेल्सिअस तापमान मानवते.
2) चांगला निचरा होणारी, आम्लधर्मीय, साधारण उताराची जमीन निवडावी.
3) लागवडीसाठी जी.टी. 1, पी.आर. 107 आणि आर.आर.आय.एम. 600 या जातींची निवड करावी. साधारण उताराची जमीन या पिकासाठी आवश्यक असते. उताराच्या जमिनीत 5 x 5 मीटर अंतरावर लागवड करावी. जमिनीच्या मगदुराप्रमाणे हे अंतर 5 x 4.5 मीटरही ठेवता येते. लागवडीसाठी 75 x 75 x 75 सें.मी. आकाराचे खड्डे खोदावेत. दोन आठवडे खड्डे उघडे ठेवावेत.
4) खड्ड्याच्या वरील 25 सें.मी. भागात 175 ग्रॅम रॉक फॉस्फेट, पाच किलो निमकेक व 10 ते 15 किलो चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत टाकून खड्डे भरावेत.
5) लागवड जून महिन्यात पहिला पाऊस पडल्याबरोबर करावी. खड्ड्याच्या मधोमध पहार किंवा खणतीने कलमाच्या मुळाच्या लांबीएवढे छिद्र पाडावे. कलम लावताना इजा होणार नाही, याची काळजी घ्यावी. कलमाच्या बाजूला माती ओढून घट्ट बसवावी.
6) कलमाचे ऊन, पाऊस, जनावरे इत्यादींपासून रक्षण करावे. एक जोमदार कोंब ठेवून इतर कोंब, तसेच खोडावर आलेले फुटवे काढून टाकावेत. बेणणी करून शेत स्वच्छ ठेवावे. झाडाच्या बुंध्याजवळ गवत, पालापाचोळा इत्यादींचे आच्छादन करावे. .
संपर्क -02358 - 280558
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र,
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली
----------------------------------------------------------------------------------------------
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020