অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अन्नाटटो (सिंदूर)

झाडाचे वर्णन

कुल:- बिक्सासी

इंग्रजी नाव:- अन्नारटो अथवा अन्नाटटो प्लान्ट

भारतीय नाव:- सिंदुरि (संस्कृत), सिंदुरिया, लटकन (हिंदी), रंगमाले (कानडी), सप्पिरा विरै, उरागुमंजल (तमिळ)

जाती (स्पिसिज):- बिक्सा ओरेलाना

बिक्सा ओरेलाना ह्या जातीच्या झुडूपापासून सिंदूर हे लाल द्रव्य (करॅटोनोईड) मिळवले जाते. ह्याच्या बियांना आजकाल व्यापारी महत्व येऊ लागले आहे कारण रंगद्रव्य म्हणून त्याचा अधिकाधिक वापर होतो आहे. अन्नारटोची पिकलेली फळे वाळवून त्यांमधून निघणाऱ्या बिया म्हणजे सिंदुरी रंगाच्या उत्पादनाचा कच्चा माल होय.

उपयोग

  • रासायनिक शाई, औषधे, कपडे रंगवणे, खाण्यायोग्य रंग, केशतेले, पॉलिश, कोंबड्यांचे खाद्य
  • सिंदूर हा बिनविषारी रंग असल्यामुळे तो मुख्यतः दुधाचे पदार्थ, मार्गारिन, चीज, वनस्पती तूप, चॉकोलेट्स, सौंदर्यप्रसाधने इ. च्या उत्पादनात वापरला जातो. हा मिसळल्याने पदार्थाच्या रुचीमध्ये अथवा रंगांमध्ये फरक पडत नाही. लिंबूवर्गीय फळांचे रस रंगीत करण्यासाठी हे रंगद्रव्य वापरतात. बूटपॉलिश, फरशीचे पॉलिश, केशतेले ह्यांमध्ये देखील हा वापरतात.

जमीन

हे काटक झाड असून त्याच्या वाढीसाठी अतिशय चांगल्या कसाच्या जमिनीची गरज नसते. पाणी धरून घेणारी कोणतीही जमीन ह्यास चालते. मात्र पाणबोडाद होणारी व दगडगोटे मिश्रित जमीन टाळा.

हवामान

ही उष्ण कटिबंधीय वनस्पती आहे. उष्ण, कोरड्या हवेमध्ये हिचे पीक व्यवस्थित घेता येते. मात्र हिला धुके/हिम चालत नाही व त्यामुळे अशा प्रदेशात हिचे पीक घेऊ नये.

जाती

हिच्या कोणत्याही जातीचे आजपर्यंत नामकरण झालेले नाही.

आवश्यक वस्तू

अ.क्र.

वस्तू

दर एकरी

दर हेक्टरी

रोपांची संख्या

२००

५००

शेणखत (टन)

१०

२५

खते (टन) NP2Os
K2O

सध्यातरी हे झाड कुम्पांसाठी अथवा रस्ताच्या कडेलाच लावले जात असल्यामुळे खते देण्यासंबंधी माहिती उपलब्ध नाही.

सध्यातरी हे झाड कुम्पांसाठी अथवा रस्ताच्या कडेलाच लावले जात असल्यामुळे खते देण्यासंबंधी माहिती उपलब्ध नाही.

लागवड

रोपवाटिका तयार करण्यासाठी योग्य काळ म्हणजे एप्रिल-मे. अन्नाटटोची वृद्धी बिया अथवा खोडाच्या कटिंग्ज द्वारे करता येते.

रोपांची वाढ पॉलिथिन पिशव्यांमध्ये माती-वाळू-खताचे मिश्रण भरून करतात. ८-१० दिवसांनी बिया अंकुरतात. मात्र एका पिशवीमध्ये एकच रोप वाढवले जाते.

पुनर्लावणी

  • रोपांची उंची २० सें.मी. झाल्यानंतर त्यांची पुनर्लावणी करतात. मार्चच्या सुरुवातीस ३० घनसेंमी आकाराचे खड्डे ४.५ X ४.५ मी. अंतरावर करतात. पावसाळ्यापूर्वी त्यांमध्ये माती- कंपोस्ट खताचे मिश्रण भरतात. एक वर्ष वयाची निरोगी रोपे पाऊसकाळ सुरु होताच शेतात लावतात.

जलसिंचन


  • लावल्यानंतर रोपांना लगेच पाणी देतात. पिकाच्या चांगल्या वाढीसाठी व नंतरच्या भरपूर उत्पन्नासाठी हवामानानुसार नियमित जलसिंचन करणे गरजेचे आहे.

पिकाचे संरक्षण

आजपर्यंत ह्यावर कोणत्याही किडीने अथवा गंभीर रोगाने हल्ला केल्याचे आढळलेले नाही.

काढणी व उत्पादन

  • लावणीनंतरच्या पहिल्या अथवा दुसऱ्या  वर्षी फुले येऊ लागतात. पुढील काळात पर्णसंभाराची चांगली वाढ होण्यासाठी पहिल्या दोन वर्षांतील फुले खुडून टाकतात.
  • लावणीनंतर तीन वर्षांनी पहिले पीक हाती येते व व्यवस्थापन चांगले असल्यास पुढील ८-१० वर्षांपर्यंत किफायतशीर उत्पादन मिळत राहते.
  • साधारणपणे ऑगस्टच्या अखेरपासून ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत फुले येत राहतात. ३० दिवसांच्या बहारानंतर झाडावर शेंगा दिसू लागतात व त्यानंतर ९० दिवसांनी ह्या शेंगा पिकतात व जानेवारीपर्यंत वाळतात.
  • वाळलेल्या शेंगा खुळखुळ वाजतात व एका बाजूने तडकू लागतात.
  • वाळलेल्या ह्या शेंगा पोत्यांमध्ये भरून पोती काही दिवसांपर्यंत बंद करून ठेवतात. नंतर त्या उन्हात वाळवतात.
  • शेंगान्मधून बिया वेगळ्या करण्यासाठी त्या काठीने बडवतात. त्यानंतर बिया उन्हात वाळवून, स्वच्छ करून पोत्यांत भरून पाठवतात.
  • ४ वर्षे वयाच्या झाडांपासून दरवर्षी दर हेक्टरी २५०-५०० किलो बिया मिळू शकतात.
  •  

    स्त्रोत : पोर्टल कन्टेट टिम

अंतिम सुधारित : 5/29/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate