लवंग लागवड ही नारळाच्या बागेत करायची झाल्यास नारळाच्या चार झाडांच्या मध्यभागी (चौफुलीवर) दीड ते दोन वर्षांचे रोप लावावे. लागवडीसाठी 75 x 75 x 75 सें.मी. आकाराचे खड्डे खणून, त्यामध्ये दोन टोपली शेणखत, 1.5 किलो सिंगल सुपर फॉस्फेट मातीत मिसळून खड्डे भरून रोप लावावे. लवंग झाडांना मातीमधील ओलावा मानवतो, परंतु दलदल किंवा कोरडी जमीन ठेवू नये. झाडांना आवश्यक तेवढी सावली करावी किंवा बागेत केळीची लागवड करावी.
दालचिनी लागवड अतिपावसाळा सोडून कोणत्याही महिन्यात करता येते. नारळाच्या बागेत लागवड करायची झाल्यास झाडापासून दोन मीटर अंतरावर लागवड करावी. सलग लागवड करायची झाल्यास 1.25 x 1.25 मीटर अंतरावर 60 x 60 x 60 सें.मी. आकाराचे खड्डे खणावेत. खड्डे चांगली माती, एक घमेले शेणखत, 250 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट व 100 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश यांच्या मिश्रणाने भरून ठेवावेत. लागवडीसाठी कोकण तेज, नित्यश्री, नवश्री या जाती निवडाव्यात. खड्ड्याच्या मधोमध गुटी कलमांची लागवड करावी. कलमांना काठीचा आधार द्यावा.
जायफळाची लागवड 50 टक्के सावली राहील अशा ठिकाणी करावी. नारळ, सुपारीच्या बागांमध्ये 6 x 6 किंवा 7.5 x 7.5 मीटर अंतरावर 90 x 90 x 90 सें. मी. आकाराचे खड्डे खणावेत. खड्डे भरताना वरच्या थरात सुपीक माती आणि दोन घमेले शेणखत, एक किलो नीमकेक, एक किलो सिंगल सुपर फॉस्फेट यांचे मिश्रण भरावे. लागवडीसाठी कोकण सुगंधा, कोकण स्वाद, कोकण श्रीमंती या जाती निवडाव्यात. जून महिन्याच्या सुरवातीस एक वर्ष वयाचे कलम खड्ड्याच्या मधोमध लावावे. मादी कलमांची लागवड केली असल्यास पाच ते सहा टक्के नर कलमे किंवा दहा रोपे परागीकरणासाठी व फळधारणेसाठी बागेत लावावीत. कलमांची लागवड केल्यानंतर कलमाच्या जोडाखालील येणारी फूट सतत काढावी. कलमांना गरजेनुसार पाणी द्यावे.
संपर्क - 02358- 280558
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र,
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली
------------------------------------------------------------------------------------------------
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
नैसर्गिक आपत्तीने अनेक वेळा दस्तक दिल्यानंतर आता र...
पुणे येथील राजलक्ष्मी भोसले यांनी आपल्या 35 गुंठे ...
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...
सांगली जिल्ह्यातील कासेगाव (ता. वाळवा) येथील संपतर...