महाराष्ट्रात तेलबियामध्ये भुईमुगाच्या पाठोपाठ सूर्यफूल या पिकाचा जवळजवळ ७0 टक्के क्षेत्र महाराष्ट्र राज्यात आहे. खरीप हंगामात उशिरा पेरणीसाठी योग्य व उपयुक्त असे पीक म्हणून सूर्यफुलास प्राधान्य दिले जाते. वर्षभर तीनही हंगामात घेतल्या जाणा-या या तेलबिया पिकाची खरिपात १५ जून ते १५ जुलै दरम्यान पेरणीची शिफारस असली तरी पाऊसमान उशिरा सुरू झाल्यास किंवा खरीप पिकाची दुबार पेरणी झाल्यास सूर्यफूल पीक घेण्याचा विचार केल्यास पीक वाया जाण्याचा किंवा कमी उत्पादन मिळण्याचा धोका टळतो. दिवसेंदिवस या पिकाखालील क्षेत्रात होणारी घट ही एक चिंतेची बाब आहे.
जगात सोयाबीन खालोखाल सूर्यफूल हे एक महत्वाचे खाद्यतेल आहे. सूर्यफूलाची उत्पादकता ६oo कि.ग्रॅ./हे. म्हणजे जागतिक सरासरी उत्पादकतेच्या (१२०० कि.ग्रॅ./हे.) निम्मी आहे. सूर्यफुलाची लागवड वाढविण्याबरोबरच उत्पादकता वाढविणे आवश्यक आहे. सूर्यफूलाची उत्पादकता वाढविण्यासाठी पूर्वमशागत, योग्य जमिनीची निवड, सूर्यफूलाच्या सुधारित व संकरित जातीचा वापर, वेळेवर पेरणी, प्रतिहेक्टरी बियाणे वापर, पेरणी अंतर, संतुलित खते, पाणी व्यवस्थापन, आंतरमशागत, कीड व रोग
व्यवस्थापन त्याचबरोबरीने परागीभवन वाढविण्यासाठी योग्य ते नियोजन, पक्षांपासून संरक्षण तसेच वेळेवर काढणी इ. गोष्टींचा सुयोग्य विचार होणे आवश्यक आहे.
सूर्यफूलात तेलाचे प्रमाण ३८ ते ४५ टक्के इतके असते तर प्रथिनांचे प्रमाण १४ ते १९ टक्के असते. जास्त लिनोलिक आम्लाचे प्रमाण तसेच अनसॅच्युरेटेड फॅटी अॅसीड असल्यामुळे तेल जास्त काळ टिकते व जास्त ऑक्सिडेटीव्ह स्टॅबिलीटीमुळे तळण्यासाठी चांगले म्हणून सूर्यफूल तेलास आहारात महत्वाचे स्थान आहे.
अ.क्र. | वाण | कालावधी | वैशिष्ट्ये |
---|---|---|---|
१ | मॉडर्न | ७५-८० दिवस | लवकर पक्क होणारा , कोरडवाहू लागवडीस योग्य |
२ | एस.एस.५६ | ८०-८५- दिवस | अधिक उत्पादकता,कोरडवाहू लागवडीस योग्य |
३ | ई. सी-६८४१४ | १०० -११० दिवस | अधिक उत्पादन , उशिरा पेरणीस योग्य , खरीपासाठी चांगला |
४ | भानू | ८५-९० दिवस | सर्व हंगामासाठी तसेच अवर्षण प्रवण विभागासाठी चांगला |
संकरित वाण
अ.क्र. | वाण | कालावधी | वैशिष्ट्ये |
---|---|---|---|
१ | के.बी.एस.एच.-१ | ९०-९५०दिवस | तेलाचे प्रमाण अधिक |
२ | एल.डी.एम.आर.एस.एच.-१७ | ८५-९० दिवस | केवडा रोगास प्रतिकारक्षम , लवकर येणारा वाण |
३ | एस.एस.एफ.एच.-१७ | १००-१०५ दिवस | अधिक उत्पादनक्षमता |
४ | के.बी.एस.एच.-४४ | ९०-९५ दिवस | अधिक उत्पादनक्षमता |
५ | फुले रविराज | ९० -९५ दिवस | अधिक उत्पादनक्षम , उशिरा पेरणीस योग्य , बडनेक्रोसीस रोगास प्रतिकारक |
सूर्यफुलाचे पिक जरी वर्षभर म्हणजे तिन्ही हंगामात घेता येत असले तरी पेरणीची वेळ हि पाण्याची उपलब्धता पाहून निश्चित करावी लागते.कारण सूर्यफुलाला पाण्याचा तान सहन होत नाही . तसेच पिकाची फुलोरा अवस्था आणि दाने भरण्याची अवस्था सततच्या पावसात जास्त प्रमाणात सापडणार नाही , याचे नियोजन करावे . कारण या दोन्हीही गोष्टी उत्पादनावर परिणाम करणाऱ्या आहेत.
हंगाम | जमीन | पेरणीची वेळ |
खरीप | हलकी | १५ जून ते १५ जुलै |
भारी | १५ ऑगस्ट पर्यंत पेरणी करता येते | |
रब्बी | १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर | |
उन्हाळी | जानेवारीचा पहिला आठवडा ते फेब्रुवारीचा पहिला आठवडा |
अपेक्षित उत्पादन मिळविण्यासाठी योग्य हेक्टरी झाडांची संख्या असणे आवश्यक आहे. त्यासाठी सुधारित व संकरित जातीचे बियाणे योग्य प्रमाणात वापरावे.
वाण | कोरडवाहू (कि./हे.) | बागायती (कि./हे.) |
---|---|---|
सुधारित | ८-१०- | ६-७ |
संकरित | ५-६ | ४-५ |
बियांच्या लवकर उगवणीसाठी पेरणीपूर्वी बियाणे १२-१४ तास पाण्यात भिजवून सावलीत वाळवावे. बियाण्यास २-३ ग्रॅम थायरम किंवा कॅप्टन या बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी. सूर्यफुलाची पेरणी जमिनीच्या प्रकारानुसार वेगवेगळ्या अंतरावर पेरणीयंत्राच्या सहाय्याने करावी. टोकण पद्धतीने सुध्दा सूर्यफूल पेरता येते व बियाण्याची बचत होते. सूर्यफूल ५ सें.मी. पेक्षा जास्त खोल पडणार नाही, याची काळजी घ्यावी.
जमीन | पेरणीचे अंतर | हेक्टरी झाडांची संख्या |
---|---|---|
हलकी | ४५*२० से.मी. | ११११११ |
मध्यम | ४५*३० से.मी. | ७४०७४ |
भारी | ६०*३० से.मी. | ५५५५५ |
सूर्यफुलाचे पीक हे रासायनिक खतांना चांगला प्रतिसाद देत असल्याने संतुलित खत व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. सूर्यफुलास नत्र, स्फुरद, पालाश या मुख्य अन्नद्रव्यांबरोबरच सल्फर या अन्नद्रव्यांची गरज आहे.
अन्द्रव्य | कोरडवाहू (कि./हे.) | बागायती (कि./हे.) | ||
पेरणीच्या वेळी | पेरणीनंतर ३० दिवसांनी | पेरणीच्या वेळी | पेरणीनंतर ३० दिवसांनी | |
नत्र | २५ | २५ | ३० | ३० |
स्फुरद | २५ | ३० | ||
पालाश | २५ | ३० | ||
सल्फर | २५ | ३० |
ज्या जमिनीत लोह, मॅगनिज व मॉलिब्डेनियम कमी आहे अशा जमिनीत ही सुक्ष्मअन्नद्रव्ये शिफारशीप्रमाणे दिली असता, उत्पादनात वाढ होते. फुले उमलण्याच्या वेळी बोरॅक्सची (०.२ टक्के) फवारणी केल्यास दाणे भरण्याचे प्रमाण तसेच तेलाचे प्रमाण वाढते, तर १.0 टक्के या प्रमाणात झिंक सल्फेटची फवारणी केल्यास उत्पादनात वाढ होते.
सूर्यफूल हे पाण्यासाठी अति संवेदनशील असे पीक आहे. सूर्यफुलाच्या एकूण पाणी वापराचा विचार केल्यास २० टक्के पाणी वाढीसाठी ५५ टक्के पाणी फुलोरा अवस्थेत तर उरलेले २५ टक्के पाणी दाणे भरण्यासाठी उपयोगात आणले जाते. म्हणून सूर्यफुलात पुढील अवस्था फारच संवेदनशील आहेत.
वाढीची अवस्था | कमी कालावधीचे वाण | जास्त कालावधीचे वाण |
---|---|---|
कळी | ३० - ३५ दिवसांनी | ३५-४० दिवसांनी |
फुलोरा | ४०-५० दिवसांनी | ५५ -६० दिवसांनी |
दाने भरणे | ५५-८० दिवसांनी | ६५- ९० दिवसांनी |
साधारणपणे खरिपात ३-४ पाण्याच्या पाळ्या जमिनीच्या प्रतवारीनुसार आवश्यक आहेत.
सूर्यफुलास फुटवे किंवा फांद्या फुटत नसल्याने तणांच्या वाढीस अनुकूल असे वातावरण तयार होते. म्हणून तण नियंत्रण करण्याच्या दृष्टीने तण विरहीत ठेवावे. तण नियंत्रण करण्यासाठी सूर्यफुलासाठी १५ दिवसांच्या अंतराने २ कोळपण्या व एक खुरपणी करावी. त्याचबरोबर रासायनिक तणनाशके वापरून तणनियंत्रण करता येते. त्यासाठी पेरणीपूर्व व पेरणीनंतर अशी वेगवेगळी तणनाशके वापरता येतात.
ट्रायफ्लुरॅलीन ०.५ ते १ किलो क्रियाशील घटक प्रतिहेक्टरी पाण्यातून फवारावे.
पेंडीमेथिलीन ३0 टक्के ईसी o.७५ ते १ किलो क्रियाशील घटक प्रतिहेक्टरी किंवा अलॅक्लोर १ ते १.५ किलो क्रियाशील घटक यापैकी एकाची ५०० लिटर पाण्यातून पेरणीनंतर पीक उगवणी अगोदर फवारणी घ्यावी व त्यानंतर गरजेनुसार २५ ते ३० दिवसांनी खुरपणी किंवा कोळपणी करुन पीक तणविरहित ठेवावे.
सूर्यफुलावरील पाने खाणारी अळी, केसाळ अळी, घाटे अळी यांच्या नियंत्रणासाठी एच.एन.पी.व्ही. या जैविक कोडनाशकाची फवारणी करावी.
अ.नं | खतांचा हफ्ता देण्याची वेळ | नत्र | स्फुरद | पालाश |
१ | लागवडीच्या वेळी | ४० | ८५ | ८५ |
२ | लागवडीनंतर ६ ते ८ आठवड्यांनी | १६० | ||
३ | लागवडीनंतर १२ ते १६ आठवड्यानी | ४० | ||
४ | बांधणीच्या वेळी | १६० | ८५ | ८५ |
एकूण | ४०० | १७० | १७० |
उसामध्ये आंतरपिकाची निवड केल्यानंतर त्या आंतरपिकाच्या जमीन क्षेत्राच्या प्रमाणानुसार आंतरपिकाचे प्रमाण ठरविणे गरजेचे आहे. जिवाणू खतांच्या बेणे प्रक्रियामुळे ५० टक्के नत्र व २५ टक्के स्फुरद या अन्नद्रव्यांची बचत होते. म्हणून वरील शिफारशीत नत्र व स्फुरद खताची मात्रा हेक्टरी अनुक्रमे ५० व २५ टक्के कमी करावी. सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असणा-या जमिनीसाठी गरजेनुसार एकरी १0 केिली फेरस सल्फेट व ८ केिली झिंक सल्फेट ५0 ते १oo किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये मिसळून द्यावे. स्फुरदयुक्त खताची मात्रा सिंगल सुपर फॉस्फेट या खतामधून द्यावी.त्यामुळे गंधक या दुय्यम अन्नद्रव्याची अतिरिक्त मात्रा द्यावी लागणार नाही. सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर केला नसल्यास एकरी २५ किलो गंधकाची मात्रा द्यावी. उसामध्ये आंतरपिकाची लागवड केली असता आंतरपिकास त्याच्या व्यापलेल्या क्षेत्राच्या प्रमाणानुसार शिफारशीत खतमात्रा द्यावी. आंतरपिके साधारण १oo ते ११o दिवसानंतर काढणीस येतात.अांतरपिकाची काढणी केल्यानंतर पुढीलप्रमाणे खतमात्रा देऊन उसाची बांधणी करावी.
उसातील कांदा अांतरपिकास खतमात्रा देताना १०० टक्के स्फुरद व पालाश आणि ५० टक्के नत्र लागणीच्या वेळी देऊन उरलेले ५० टक्के नत्र लागवडीनंतर एक महिन्याने द्यावे.
सोयाबीन/भुईमूग या पिकांना संपूर्ण खतमात्रा पेरणीच्यावेळी द्यावी. आंतरपिकाच्या रोग व कोड व्यवस्थापनासाठी विद्यापीठाने शिफारस केलेल्या पद्धतीचा अवलंब करावा.
संपर्क क्र. ९४२३८o७५५0
स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन
अंतिम सुधारित : 10/7/2020
सूर्यफूल हे खरिपातील महत्वाचे पीक मानले जाते. या प...
सध्याच्या काळात गहू, ज्वारी, करडई पिकांच्या वाढीच्...
ज्या बियांपासुन तेल मिळ्वता येते त्यांना तेल बिया ...
सुर्यफुल हे पिक कमी कालावधीत येणारे असून सूर्यप्रक...