मोगरा लागवडीसाठी हलकी ते मध्यम, पाण्याचा निचरा होणारी, 60 सें.मी. खोलीची आणि 6.5 ते सात सामू असलेली जमीन निवडावी. हे बहुवार्षिक पीक आहे, त्यामुळे जमिनीची चांगली नांगरट करावी. लागवडीसाठी हलक्या ते मध्यम जमिनीत 1.20 मीटर x 1.20 मीटर अंतरावर 60 सें.मी x 60 सें.मी. x 60 सें.मी. आकाराचे खड्डे खणावेत. यापेक्षा कमी अंतर ठेवल्यास रोग- किडींचा प्रादुर्भाव होऊ शकतो.
गुंडुमलई या जातीसाठी लागवडीचे अंतर जास्त ठेवावे. लागवडीसाठी खड्डे खणल्यानंतर ते शेणखत, पोयटा माती, अर्धा किलो सिंगल सुपर फॉस्फेट यांच्या मिश्रणाने भरावेत. जून महिन्यात लागवड करावी. अधिक माहितीसाठी राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, गणेशखिंड, जि. पुणे (020 - 25693750) येथे संपर्क साधावा.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...
अळूच्या लागवडीसाठी भरपूर सेंद्रिय पदार्थ असणारी, म...
पावसाळा सुरू होताच चांगल्या जातीची कलमे सरकारमान्य...
सध्याच्या काळात मीठा बहराच्या अंजीर फळांच्या वाढीक...