उंच आणि ढेंगू अशा दोन जाती आढ्ळून येतात. नारळामध्ये परपरागीकरण होत असल्याने विविधता आढ्ळून येते. यामध्ये फळांचा आकार, तेलाचे प्रमाण वगैरे गुणधर्मानुसार अनेक पोटजाती आहेत. तसेच एकच जात अनेक देशांत अगर देशाच्या अनेक भागात वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते, त्यावरून तिला त्या देशाचे अथवा विभागाचे नाव दिले जाते.
जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी नारळाची लागवड आहे त्या त्या ठिकाणी उंच जातींच्या नारळाची झाडे आहेत सर्वसाधारणपणे अशा झाडांची उंची १५ ते १८ मीटर असते व त्याचे आयुष्यमान ४० ते ९o वर्षे किंवा त्याहूनही अधिक असते. यामध्ये ५ ते ४ वर्षात फळधारणेला सुरुवात होते. याचे नारळ मध्यम ते मोठ्या आकाराचे असून चांगल्या प्रतींचे अधिक खोबरे मिळते. त्याचप्रमाणे तेलाचे प्रमाणही अधिक (६८.७५ टक्के) असते. यामध्ये विविध प्रकार आढ्ळून येतात.
भारताच्या पश्चिम किंना-यावर जी उंच नारळाची लागवड झालेली दिसते, तिला वेस्ट कोस्ट टॉल या नावाने संबोधले जाते. कोकणात तेिला बाणवली या नावाने ओळखतात. तिचे आयुष्य ७0 ते ८o वर्षे असून ती ६ ते ७ वर्षात फुलोन्यास येते. प्रत्येक झाडापासून प्रति वर्षी ५० ते १oo नारळ मिळतात. तर सरासरी ८o नारळ मिळतात. काही नारळ माडापासून प्रति वर्षाला २oo ते २५o नारळाचे उत्पादन मिळाल्याचे आढ्ळून येते. या नारळ जातीच्या फळात सरासरी १७६ ग्रॅम खोबरे आणि तेलाचे प्रमाण ६७ ते ७o छक्के असते. एक टन खोबरे तयार करण्यासाठी ५,000 ते ७.४00 नारळ फळे लागतात. या जातीमध्ये रंग, आकारमान, उत्पादन, खोबरे, तेलाचे प्रमाण यामध्ये विविधता आढ्ळून येते.
ही लक्षद्वीप बेटावरील नारळाची जात आहे. माडाची वाढ आणि नारळ फळांचा विंचार करता ही जात बाणवली सारखीच आहे. यामध्ये फरक एवढाच की नारळाच्या फळाच्या तीनही कडा उठावदार असतात. या जातीपासून प्रति वर्षी ८० ते १७८ फळे मेिळतात. तर सरासरी १४७ फळे मेिळतात. नारळामध्ये सरासरी १४g ते १८g ग्रॅम खोबरे मेिळते. तसेच खोंब-यामध्ये ७२ टक्के तेलाचे प्रमाण असते. माडीसाठी ही जात सर्वात चांगली असून यापासून बाणवली पेक्षा माडीचे जवळजवळ दुप्पट उत्पादन मिळते. केंद्रीय रोपवन पीक संशोधन संस्था, कासारगोड, केरळ यांनी ही जात केरळ, कर्नाटक, तमिळनाडू आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्र राज्यासाठी चंद्रकल्प या नावाने प्रमाणित केली आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाने प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्चे येथील संशोधनावरून ही जात महाराष्ट्रासाठीही प्रमाणित केली आहे.
ही जात लक्षद्वीप बेटावरील असून दरवर्षी प्रत्येक माडापासून १00 ते ३२0 नारळ मिळतात. जरी नारळ आकाराने लहान असला तरी खोबरे जाड़ असतें. एका नारळात खोबरे ८0 तें १00 ग्रंम तर सरासरी १00 ग्रॅम असते. त्यामध्ये तेलाचे प्रमाण सर्वात अधिक म्हणजे ७५ टक्के असते. ही जात गोटा नारळ तयार करण्यास उत्तम आहे. एक टन खोबरे तयार करण्यासाठी सुमारे १0,000 ते १३,000 नारळ फळे लागतात.
ही उंच प्रकारातील जात असून (वेस्ट कोस्ट टॉल) सारखीच आहे परंतु ती पूर्व किना-यावर वाढते. म्हणून तिला ईस्ट कोस्ट टॉल हे नाव देण्यात आले आहे. ही जात फळश्धारणेस येण्यासाठी ६ ते ८ वर्षे लागतात. या जातीच्या माडापासून ४० ते १२0 नारळ तर सरासरी ७३ नारळ प्रति माड प्रतिवर्षी मिळतात. या जातीचे नारळ बाणवली जातीच्या नारळापेक्षा श्रोडे लहान असतात. या जातीच्या एका नारळात १gg ते १४g ग्रॅम तर सरासरी १२५ ग्रॅम खोबरे मिळते तसेच तेलाचे प्रमाण ६४ टक्के असते. एक टन खोबरे तयार करण्यासाठी ७.१४३ ते १0,000 नारळ लागतात.या जातीची लागवड प्रामुख्याने आंध्रप्रदेश आणि तमिळनाडूमध्ये केली जाते.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाच्या प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ने, जिं.रत्नागिरी येथे ही जात बाणवली प्रकारातून निवड पध्दतीने शोधून काढण्यात आली असून महाराष्ट्रासाठी ती 'प्रताप' या नावाने प्रमाणित करण्यात आलेली आहे. याचे नारळ आकाराने मध्यम असून गोल असतात. ही जात फलधारणेस येण्यास ६ ते ७ वर्षे लागतात. नारळाचे प्रतेि माड उत्पादन १३९ ते १६० असून सरासरी १४३ फळे मिळतात तसेच एका नारळात खोबरे १२0 ते १६0 ग्रॅमतरसरासरी १५g ग्रॅम मिळते. खोब-यात तेलाचे प्रमाण ६८ टक्के असते.
ही उंच प्रकारातली जात असून याची लागण मोठ्या माणात फिलिपिन्स येथे केली जाते. या जातीचे नारळ आकाराने फारच मोठे असतात. एका नारळापासून सरासरी २१५ ग्रॅम खोबरे मिळते, तर प्रति झाड नारळाचे उत्पादन ९० ते २०० नारळ असून सरासरी प्रति झाड १o५ नारळ मिळतात. तसेच तेलाचे प्रमाण ६९ टक्के आहे. ही जात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाच्या प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राने महाराष्ट्रात लागवडीसाठी प्रमाणित केली आहे.
ही जात इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रासाठीही शिफारस करण्यात आली असून सरासरी नारळाचे उत्पादन ११o नारळ प्रति माड प्रति वर्ष आहे. यापासून २.९७ टन खोबरे प्रति हेक्टर तर तेलाचे उत्पादन २.o४ टन इतके मिळते.
ही अंदमान बेटावरील जात आहे. ही जात बाणवली सारखीच आहे. तिचे सरासरी उत्पादन ९४ नारळ प्रति माड प्रति वर्षी मिळते. या जातीचे नारळ आकाराने मोठे असतात. सरासरी १६९ ग्रॅम खोबरे मिळते. तेलाचे प्रमाण ६७ टक्के असते.
जाडीचे असते. अशा जातींना लवकर म्हणजेच ३ ते ४ वर्षात फलधारणेस सुरवात होते. याचे आयुष्यमान ४० ते ५० वर्षे असते आणि नारळ लहान असून खोबरे फारच पातळ व चोथट असते. तसेच तेलाचे प्रमाण कमी (६६.६८ टक्के) असते. यामध्ये हिरवा, नारिंगी, पिवळा अशा तीन रंगांची फळे आढळून येतात. पूर्वीच्या काळी या जातीची घराशेजारी शोभेसाठी व शहाळ्याचे पाणी पिण्यासाठी म्हणून लागवड करीत असत. आता उंच x टेंगू (टी × डी) आणि टेंगूx उंच (डी × टी ) या संकरित जाती निर्माण करण्यासाठी त्यांच्या उपयोगास जगातील सर्वच शास्त्रज्ञांनी मान्यता दिली आहे.
ही जात केरळ राज्यातील त्रिचूर या जिल्ह्यातील चौघाटामध्ये प्रथम आढळून आली. या जातीच्या पानांच्या देठांच्या आणि फळांच्या हिरव्या रंगावरून तिला 'चौघाट ग्रीन डॉर्फ' हे नाव मिळाले. या जातीस ३ ते ४ वर्षात फलधारणेस सुरुवात होते. या जातीच्या प्रति झाडापासून प्रतिवर्षी ३० ते १o७ नारळ मिळतात. तर सरासरी ६६ नारळ मिळतात. प्रति नारळात ३८ ते १oo गॅम खोबरे असते. प्रति नारळात सरासरी ६0 ग्रॅम खोबरे मिळते. या जातीच्या नारळाचे खोबरे पातळ व चवीला चोथट असून तेलाचे प्रमाण ६६ टक्के आहे. या जातीचे नारळ लहान असून त्यात ६० ते १oo मि.ली. पाणी असते.
ही जात देखील केरळ राज्यातील त्रिचूर या जिल्ह्यातील चौघाटमध्ये प्रथम आढळून आली. या जातीच्या नारळाचा फुलोरा तसेच झावळीचा देठ यांचा रंग नारिंगी असतो. या जातीच्या झाडाचे प्रतिवर्षी उत्पादन ५० ते १२० फळे एवढे असून सरासरी ६५ नारळ एवढे आहे, तर खोबरे ११२ ते १८८ गॅम मिळत असून सरासरी १५o ग्रॅम एवढे असते. केंद्रीय रोपवन पिके संशोधन संस्था, कासारगोड (केरळ) यांनी ही जात शहाळ्याच्या पाण्यासाठी प्रमाणित केली आहे. या जातीच्या शहाळ्याचे पाणी गोड असून १oo मि.ली. पाण्यात ७ ग्रॅम साखरेचे प्रमाण असते.
या जाती मलेशियातील असून पानाच्या देठांचे रंग, फुलोरा व फळांचा रंग यावरून त्यांना मलायन ग्रीन डॉर्फ आणि मलायन यलो डॉर्फ ही नावे प्राप्त झाली आहेत. या जातीमध्ये ३ ते ४ वर्षात फुलोरा येण्यास सुरुवात होते. मलायन ग्रीन डॉर्फ या जातीच्या नारळाचे उत्पादन प्रती झाड प्रती वर्षी ३९ ते १२० नारळ असून सरासरी ८९ नारळ एवढे आहे. प्रत्येक नारळात १२५ ते १६७ गॅम तर सरासरी १४0 ग्रॅम खोबरे असते. तेलाचे प्रमाण ६६ ते ६७ टक्के असते.
या जातीची लागवड आंध्रप्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात आढळून येते. यांच्या पानाचा, फुलोन्यांचा व फळांचा रंग हिरवा असतो. याची फळे आकाराने पपयासारखी असतात. या जातीचे माड ४ ते ५ वर्षात फलधारणेस येतात. माडाचे उत्पादन प्रति वर्षी प्रति माड ५0 ते ९0 नारळ तर सरासरी ६८ नारळ एवढे आहे. तसेच सरासरी १६0 ग्रॅम खोबरे आणि ६८ टक्के तेलाचे प्रमाण असते.
इतर पिकांप्रमाणे नारळामध्ये संकरित जाती निर्माण करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये उंच आणि टेंगू या जातीच्या संकरीकरणासाठी वापर करण्यात आला आहे. भारतामध्ये सर्वप्रथम १९३२ साली नारळामध्ये संकरित जाती चांगल्या प्रकारे उत्पादन देऊ शकतात, हे आढळून आले. या संकरित जाती दोन प्रकारे तयार करण्यात आल्या आहेत. एक म्हणजे उंच जात मातृवृक्ष म्हणून (टी x डी) आणि दुसरी टेंगू जात मातृवृक्ष म्हणून (डी × टी) निर्मित करण्यात आली आहे.
यामध्ये बाणवली ही उंच वाढणारी जात मातृवृक्ष म्हणून तर 'चौघाट ऑरेंज डॉर्फ' ही जात पितृवृक्ष म्हणून वापरण्यात आली आहे. या जातीची झाडे ४ ते ५ वर्षात फळधारणेस येतात. याचे उत्पादन प्रति झाड प्रती १00 ते १६0 नारळ एवढे आहे. तर सरासरी १३८ नारळ एवढी आहे. तसेच नारळात खोबरे १७४ ते १९६ ग्रॅम असून सरासरी १८o गॅम आहे. तसेच तेलाचे प्रमाण ६८ टक्के आहे. ही जात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली अंतर्गत प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाट्ये, रत्नागिरी यांनी महाराष्ट्रात लागवडीसाठी प्रमाणित केली आहे. या संकरित जातीची रोपे या संशोधन केंद्रावर तयार करून दरवर्षी शेतक-यांना माफक दरात पुरविण्याचे काम चालू आहे
यामध्ये 'चौघाट ऑरेंज डॉर्फ' ही टेंगू जात मातृवृक्ष म्हणून तर बाणवली (उंच) ही जात पितृवृक्ष म्हणून वापरण्यात आलेली आहे. या संकरित जातीची फळधारणा ४ ते ५ वर्षांनी होते. या जातीचे उत्पादन प्रती वर्षी ५o ते २oo फळे असते. तर सरासरी उत्पादन १४o फळे एवढे आहे. या जातीच्या फळात खोब-याचे प्रमाण १६0 ते २३० गॅम असून सरासरी २१५ गॅम असते. तसेच तेलाचे प्रमाण ६८ टक्के असते. ही जात चंद्रसंकरा या नावाने लागवडीसाठी प्रमाणित केली आहे.
ही जात गंगाबोंडम ग्रीन डॉर्फ (टेंगू) आणि ईस्ट कोस्ट टॉल (उंच) यांच्या संकरातून निर्माण करण्यात आली आहे. ही जात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाने कोकणात लागवडीसाठी सन २oo८ मध्ये शिफारस केलेली आहे. पाचव्या वर्षापासून उत्पादन मिळते. सरासरी प्रति वर्षी प्रती माड १० वर्षापासून १२२ नारळ मिळतात. खोब-याचे वजन १६९ ग्रॅम असून त्यात तेलाचे प्रमाण ६७.१० टक्के असते.
कोकणाबरोबर महाराष्ट्राच्या इतर भागातही नारळ लागवड मोठ्चा प्रमाणात होत आहे. नारळ हे बागायती पीक असल्याने त्याला पावसाळ्यानंतर मे महिन्यापर्यंत कायमस्वरूपी आयुष्यभर पाण्याची गरज असते. त्यामुळे पाण्याची सोय असल्यास नारळाची लागवड सर्व प्रकारच्या जमेिनोंमध्यें करता येतें.
त्यासाठी जमिनीच्या प्रकारानुसार मशागत करावी लागते. जसे रेताड जमेिनीत पाणी धरुन ठेवण्याची क्षमता शेणखताचा वापर करून वठ्ठवायला हवी. तर काळ्या चिकट जमिनीत पाण्याचा निचरा होण्यासाठी वाळूचा तसेच सेंद्रीय खतांचा वापर करावयास हवा. भाताच्या खाचरात लागवड करावयाची झाल्यास पाणी साचणार नाही, याची दक्षता घ्यायला हवी. त्यासाठी चर खणून पाणी बाहेर काढणे महत्वाचे असते. त्याचप्रमाणे शेताच्या बांधावर देखील नारळाची लागवड करता येते. त्यासाठी बांधाची रुंदी आवश्यक तेवढ़ी ठेवणे गरजेचे आहे. कोकणात डोंगर उतारावरील वर्कस जमिनीत या ठिकाणी पाण्याची सोय आहे. तेथे नारळाची यशस्वी लागवड होऊ शकते. सुधारलेल्या खार जमिनीतही नारळाची लागवड करता येते. नदीकाठ्या जमिनीत पावसाळ्यात पाणी काही काळ आत शेिरते. अशा जर्मिनीत पावसाचा जोर ओसरल्यानंतर म्हणजेच ऑगस्टसप्टेंबरमध्ये लागवड करावी. रत्नागिरीत कातळावर घरे बांधल्यामुळे घराच्या आवारात काही नारळ रोपांची लागवड केली जात आहे. कातळात खडुा किती खोल असावा, हे महत्वाचे नसून किती उंचीचा आणि रुंदीचा मातीचा भराव घालणे शक्य आहे. हे महत्वाचे आहे. त्यासाठी कमीतकमी १ मीटर लंच आणि माडाच्या खोंड़ाभावती दौड़ मीटर अंतरावर मातींचीं भर असणे गरजेचे आहे.
नारळ लागवड करताना सर्वात महत्त्वाचा मुद्या विचारात घेणे गरजेचे आहे. तो म्हणजे दोन माडातील अंतर. दोन माडात योग्य अंतर असणे गरजेचे आहे आणि ते जर नसेल तर नारळ उशिरा लागणे किंवा न लागणे यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. नारळ लागवडीचे महत्वाचे सूत्र म्हणजे दोन झाडातील अंतर होय. अंतराचे बाबतीत तडजोड करू नये. कोकणात एक म्हण आहे 'लागे तो न लागे न लागे तो लागे' आणि ही म्ह्ण नारळ पेिकासाठीच योग्य आहे. योग्य अंतर ठेवले नाही तर नारळाची जात चांगली असूनही उशिरा उत्पादन मिळणे, कमी उत्पादन मिळणे या समस्यांना तोंड द्यावे लागते.
योग्य प्रमाणात उत्पादन मिळवेिण्यासाठी माडांची सलग लागवड करताना दोन ओळीत आणि दोन रोपात २५ फूट (७.५ मी.) अंतर ठेवणे गरजेचे आहे. परंतु पाटाच्या, शेताच्या किंवा कुंपणाच्या कडेने एका ओळीत नारळाची लागवड करावयाची असल्यास २० फूटाचे अंतर ठेवले तरी चालेल. तसेच ठेंगू जातीसाठी देखील २0 फूट अंतर चालू शकते.
पिकांच्या मुळांना वाढीसाठी अनुकूल परिस्थिती मिळावी म्हणून पेरणीपूर्वी आपण जर्मनी नांगरून आणि कुळवून भुसभुशीत करतो. तशाच पध्दतीने फळझाडे लागवड करताना खडुा खोदणे जरुरीचे असते. खडुष्याचा आकार हा फळझाड आणि जमिनीच्या प्रकारावर अवलंबून असतो. खडुा खोदल्याने त्यातील दगड बाहेर काढले जातात. त्याचप्रमाणे स्पर्धा करू शकतील अशा झाडांची मुळे तोडली जातात. खडुवातील मातीत खते चांगल्याप्रकारे मिसळणे शक्य होते. सुरुवातीच्या काळात मुळांच्या वाढीसाठी अधिक अनुकूल परिस्थिती उपलब्ध होते. त्यामुळे झाडे पुढे प्रतिकूल परिस्थितीस तोंड देऊ शकतात. खड्याचा आकार जमिनीच्या प्रकारावर अवलंबून असतो. वस्कस किंवा मुरुमयुक्त जमीन तसेच जी जमीन प्रथमच लागवडीखाली आणली जात आहे अशा जमिनीत १ × १ × १ मीटर आकाराचे खडे खोदावेत, परंतु समुद्र किंवा नदी किना-यावरील पुळणीची जमीन, गाळ मिश्रित, रेताड, मध्यम काळ्या आणि भारी काळ्या जमिनीत थोडा लहान आकाराचा खडुा खोदला तरी चालू शकेल.
खडे खोदण्याचे काम पावसाळ्यापूर्वी एक ते दीड महिना अगोदर पूर्ण करावे. कातळावर खडुा खोदताना मातीच्या भरावाचा विंचार करावा. खडुा भरणे रेताड, वरकस किंवा मुरमाड जमिनीत खडे भरताना खडुष्याच्या तळात कमीतकमी १ ते २ घमेली चांगल्या प्रतीची माती टाकावी. तसेच खडुा भरताना आणखी १ ते २ घमेली चांगल्या प्रतीची माती मिसळावी. त्यामुळे जमिनीत पाणी धरून ठेवण्याची शक्ती वाढते परंतु पावसाळ्यात अधिक काळ पाणी धरून ठेवणा-या भारी प्रतीच्या जमिनीत खडुष्याच्या तळाला १ ते २ घमेली रेती (वाळू। घालावी, तसेच खडुा भरताना १ ते २ घमेली रेती मातीत मिसळावी. त्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यास मदत होईल. वालुकामय जमिनीत खडुचाच्या तळाशी सोडणांचा थर दिल्यास उत्तम असते, त्याद्वारे जमिनीत ओल टिकून राहते, तसेच खडुा भरताना खडुवात ४ ते ५ घमेली शेणखत, १.५ केिली शिंगल सुपर फॉस्फेट आणि ५o ग्रॅम फॉर्लीडॉल पावडर वाळवीच्या नियंत्रणासाठी खडुचाच्या मातीत मेिसळावी. जमीन सपाट असल्यास खडे पूर्ण भरून घ्यावेत. त्याचप्रमाणे ज्या जर्मनीत पाणी साचते अशा ठिकाणचे खड़े पूर्ण भरून वर थोड़ी भर द्यावी. परंतु जमीन उताराची असल्यास आणि पावसाळ्यात खडुवात पाणी साचणार नाही अशी खात्री असल्यास खडे अध्यापर्यंत भरावेत. उरलेली माती खडुष्याच्या वरील बाजूवर वरंबा करण्यासाठी वापरावी. म्हणजे पावसाळ्यात बाहेरचे पाणी खडुष्यात येणार नाही. पुढे जसजसा माड वाढत जाईल तसतशी खडुष्यात भर घालावी.
नारळाच्या अनेक जातींची लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे. त्यामध्ये बाणवली, प्रताप, लक्षद्वीप ऑडींनरी तर संकरित टी × डी आणि डी × टी या जाती आहेत. परंतु अशा जातीच्या रोपांचे उत्पादन करणे हे क्लिष्ट व वेळ खाऊ आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ अंतर्गत रोपवाटिकेमध्ये मोठ्या प्रमाणात बाणवली जातीची रोपे तयार केली जातात तर काही प्रमाणात प्रताप आणि संकरित जातींची रोपे तयार केली जातात. त्यामुळे या जातींची रोपे उपलब्धतेनुसार लागवड करावीत. कृषि विद्यापीठाने रोपवाटिकेतील रोपांची वाटप व्यवस्था ही संशोधन संचालक, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी, पीन कोड.-४१५ ७१२ यांचे मार्फत केली जाते. त्यामुळे बागायतदार बंधूंना विनंती आहे की, त्यांनी रोपांसंबंधी मागणी त्यांचेकडे एप्रिल-मे मध्येच पत्र पाठवून नोंदवावी.
महाराष्ट्राचा विचार करता कोकणात ज्या जमिनीत पाणी साचून रहात नाही, अशा जमिनीत पावसाच्या सुरवातीस लागवड करावी तर ज्या पाणथळ जमिनी आहेत, अथवा ज्या ठिकाणी पुराचा त्रास होतो, अशा ठिकाणी पावसाचा जोर ओसरल्यानंतर ऑगस्ट - सप्टेंबरमध्ये म्हणूनच रोपे जूनमध्येच खरेदी करावीत व ती रोपे पिशवीत भरून ठेवावीत विचार करता आणि रोपवाटिकेत रोपे पिशवी ऐवजी जमिनीमध्ये केलेली असल्याने संशोधन केंद्रातील नारळ रोपे पावसाळा सुरू झाल्यानंतरच सर्वसाधारणपणे ७ जूनला विक्रीसाठी उपलब्ध होतात.
रोपे कृषि विद्यापीठ, शासकीय आणि शासकीय मान्याताप्राप्त रोपवाटिकेतूनच खरेदी करावीत. रोपांची निवड खालील प्रमाणे करावी.
सध्या अवास्तव उत्पादन देणा-या नारळाच्या जातीच्या रोपांविषयी जाहिराती येतात. परंतु अशी रोपे खरेदी करू नयेत. परप्रांतातून आणलेल्या रोपांची लागवड करणे धोकादायक आहे. विशेषत: केरळ राज्यात माडाचा मूळकुजव्या (रूट विल्ट) हा रोग मोठ्या प्रमाणावर आहे. रोपांबरोबर हा रोग आपणाकडे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे माडांची रोपे केरळ राज्यातून आणू नयेत. परप्रांतातील एखादी जात पाहिजे असल्यास त्या जातींच्या नारळाची फळे आणून रोपे तयार करावीत.
नारळ रोपांची लागवड केल्यानंतर लगेचच त्याला आधार देणे आवश्यक असते आणि म्हणूनच त्यासाठी लागणा-या साहित्याची जमवाजमाव अगोदर पासूनच करणे आवश्यक आहे. रोपे लावल्यानंतर पश्चिमेकडील वा-याने ते हलू नयेत म्हणून रोपांच्या उंचीच्या दोन काठ्या ४५ सें.मी. अंतरावर रोपांच्या दक्षिणोत्तर बाजूवर रोवून त्याला एक आडवी काठी बांधावी. त्यावर रोप सैलसर बांधून ठेवावे.
माडास भरपूर सूर्यप्रकाशाची गरज असते हे जरी खरे असले, तरी नारळ रोपांना पहिली दोन वर्षे उन्हाळ्यात सावली करणे अत्यावश्यक आहे. विणलेले झाप, गवताच्या तट्या करून कृत्रिम सावली करता येते परंतु ही खर्चीक बाब आहे. त्यासाठी रोपांच्या चारही बाजूला उंच वाढणारी केळी तसेच पपई यांची लागवड करावी जेणेकरून माडांना सावली मिळेल आणि त्यापासून उत्पन्नही मिळेल. केळीची लागवड केल्यास एक एकरचा विचार करता एकरात ७o नारळांची झाडे बसतात. प्रत्येक नारळाभोवती चार दिशांना अडीच फुटावर केळीची लागवड झाल्यास २८o केळीची लागवड करता येईल. त्यापासून दुस-या वर्षी २८० घड प्राप्त झाल्यास कमीतकमी २८,000 ते ३५,000 रुपयाचे उत्पन्न मिळेल. त्यातून काही लागवडीचा खर्च सहज भागविता येईल.
तसेच रोपांच्या चारही बाजूस अडीच ते तीन फुटावर ४ ते ५ फूट उंचीच्या गिरीपुष्पाच्या (ग्लिरिसिडिया) फांद्या लावाव्यात, यामुळे अनेक फायदे होतात. रोपांना आधार देता येतो. लावलेल्या काठ्यांना टोकाकडे फांद्या फुटून त्याचा रोपाला सावली म्हणून उपयोग होतो. मुळांवर असलेल्या नत्र ग्रंथीमुळे नत्रदेखील मिळते तसेच पुढील पावसाळ्यात वाढलेल्या फांद्या तोडून रोपांना हिरवळीचे खत पुरविता येते.
नारळ झाडांस शिफारशीनुसार द्यावयाच्या खताच्या मात्रा
वर्ष | शेणखत (किलो) | नत्र (ग्रॅम) | स्फुरद (ग्रॅम) | पालाश (ग्रॅम) |
---|---|---|---|---|
१ | १० | २०० | १०० | २०० |
२ | २० | ४०० | २०० | ४०० |
३ | ३० |
६०० |
३०० | ६०० |
४ |
४० |
८०० | ४०० | ८०० |
५ | ५० | १००० |
५०० |
१००० |
नारळ झाडे खताला चांगले प्रतिसाद देतात असे प्रयोगाअंती दिसून आले आहे. झाडांपासून उत्पादन कमी मिळणे, वाढ खुरटलेली राहणे, नारळ फळांना तडे जाणे, फळे लहान असतानाच मोठया प्रमाणावरच गळ होणे या मागील प्रमुख कारण म्हणजे त्यांना होणारा अपुरा अन्नपुरवठा होय. अनेकवेळा नारळ झाडांना फक्त शेणखत अथवा युरिया खतच दिले जाते. हे अयोग्य आहे. नारळ झाडास नत्र, स्फुरद आणि पालाश अशा तिन्ही अन्नघटकांच्या योग्य प्रमाणात पुरवठा होणे महत्वाचे आहे. म्हणून नारळ झाडास वयोमानानुसार मागील तक्त्यात दाखविल्याप्रमाणे खते द्यावीत. नत्र आणि पालाश खताच्या मात्रा समप्रमाणात विभागून जून, सप्टेंबर आणि फेब्रुवारी अशा तीन वेळा द्याव्यात. शेणखत व स्फुरद खते इतर खतांबरोबर जूनमध्ये एकाच वेळी द्यावीत. रोप लावल्यानंतर पहिल्यावर्षी रोपांची मुळे ३० सें.मी. अंतरापर्यंत पसरलेली असतात. त्यामुळे खते खोडापासून ३० सें.मी. अंतरापर्यंत सभोवती विखरून टाकावीत आणि खुरप्प्याच्या सहाय्याने मातीत मिसळावीत. त्यानंतर पुढील प्रत्येक वर्षी खते देताना ३० से.मी. अंतर वाढवत जावे व पाचव्या वर्षी त्यापुढे १.५ ते १.८० मीटर पर्यंतच्या अंतरात ती पसरुन टाकावीत आणि मातीत मिसळावीत. या खतांबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्यांचीही नारळास गरज आहे. त्या दृष्टीने या केंद्रावर प्रयोग घेण्यात आले असून त्यामध्ये ऑरमिकेम हे सूक्ष्म अन्नद्रव्य असलेले खत प्रतीमाडास प्रतीहसा ५oo ग्रॅम याप्रमाणे इतर खताबरोबरच ३ हप्त्यात दिल्यास उत्पादनात चांगल्या प्रकारची वाढ दिसून आली आहे. तसेच ब-याच वेळा शेतकरी बाजारात उपलब्ध असलेल्या युरिया खताचीच मात्रा नारळ झाडास देतात. नारळास नत्र खताबराबरच पाळाश खताचीही मोठ्या प्रमाणात गरज आहे आणि म्हणून पालाश खत देणे गरजेचे आहे. जर एकच अन्नद्रव्ये असलेली खते बाजारात उपलब्ध नसतील, अशावेळी मिश्र खतांचा वापर करावा. नारळास सेंट्रीय स्वरूपातही खते देऊन त्याची आवश्यक गरज गिरीपुष्पाची लागवड करून त्याचा वापर, पावसाळ्याच्या सुरुवातीला नारळाच्या अळ्यामध्ये धैचा, ताग, पुरारिया या हिरवळीच्या खतांची पेरणी तसेच बाजारात उपलब्ध असलेल्या सेंद्रीय खतांचा वापर करता येईल.
खताप्रमाणेच नारळाच्या झाडांना पाण्याची आवश्यकता आहे. नारळ झाडांना एकाच वेळी खूप पाणी देण्यापेक्षा थोडे थोडे पाणी (गरजेइतके) अनेक वेळा देणे फायद्याचे ठरते. जमिनीच्या प्रकारानुसार नारळाच्या पाच वर्षावरील झाडांना हिवाळ्यात ४ ते ५ दिवसांनी आणि उन्हाळ्यात २ ते ३ दिवसांनी पाणी द्यावे. रोप लावल्यानंतर त्या वर्षी मात्र रोपाला एक दिवसाआड करून पाणी द्यावे. पाणी पुरवठा करण्यासाठी केलेले आळे पुरेशा रुंदीचे असणे आवश्यक आहे. रोप लावल्यानंतर रोपाच्या सभोवार ३0 सें.मी. रुंदीचे आळे करावे. रोपाच्या वयोमानाप्रमाणे अळ्याची रुंदी वाढवत नेऊन ५ वर्षांनंतर नारळाच्या झाडाच्या सभोवार १.५ मी. रुंदीचे आळे करून पाणी द्यावे. आळयामध्ये दर चार दिवसांनी हिवाळ्यात १८0 ते २00 लिटर तर उन्हाळ्यात २00 ते २४० लिटर पाणी द्यावे. ठिबक सिंचन पद्धतीने नारळाच्या झाडांना पाणी देणे सर्वात उत्तम. त्यामुळे पाण्याची बचत होते. प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये, रत्नागिरी येथे गेली काही वर्षे ठिबक सिंचन पद्धतीने नारळ झाडांना पाणी दिले जात आहे. या पद्धतीने हिवाळ्यात सुमारे ३० लि. पाणी तर उन्हाळ्यात ४० लि. पाणी दर दिवशी दिले तरी पुरेसे होते.
नारळाच्या बागेमध्ये नारळ रोपाची लागवड केल्यानंतर त्यांना पहिली दोन वर्षे सावलीची गरज असल्याने रोपांच्या चारही दिशांना ६० ते ७५ सें.मी. अंतरावर केळीचे चार मुणवे लावणे जरुरीचे आहे. जेणेकरुन सावली तर होईलच त्याचबरोबर केळीची दोन पिके घेता येतील. परंतु त्यानंतर केळी काढून टाकणे तितकेच महत्वाचे आहे. त्याचबरोबर अशा नवीन नारळ बागेत मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध असल्याने केळी आणि अननसासारखी फळपिके, भाजीपाला, कंदपिके, हळद, आल्यासारख्या मसाला पिकांची लागवड करून अधिक उत्पादन घेता येईल. नारळाचे झाड ५ वर्षाचे झाल्यानंतर त्याची खाणारी मुळे आडवी १.८ मीटर तर खोलवर १०० ते १२० सें.मी. पर्यंत पसरतात. त्यामुळे नारळाचे झाड बागेतील फक्त २५ टक्के जागा उपयोगात आणते. त्यामुळे शिल्लक ७५ टक्के जागेवरती आपणांस तात्पुरती अथवा कायमस्वरूपी विविध पिकांची लागवड करता येईल. त्याचबरोबर नारळाच्या पूर्ण वाढलेल्या बागेमध्ये ५० टक्के सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहोचत असतो.
कोकणात या ठिकाणी पाण्याची सोय आहे. अशा ठिकाणीच नारळाची बाग तयार केली जाते. म्हणजेच जमीन, पाणी, सूर्यप्रकाश आणि सावली या झाडांना आवश्यक गोष्टी बागेत उपलब्ध होतात आणि या सर्वांचा विचार करून डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाटये येथे या संबंधात विविध प्रयोग घेण्यात आले असून नारळाच्या बागेमध्ये तात्पुरती अथवा कायमस्वरुपी वेगवेगळ्या भागात पिकांची लागवड करून प्रतिहेक्टरी उत्पादन वाढविता येते, याबाबत शिफारस देण्यात आली आहे. त्याचबरोबर नारळाच्या बागेमध्ये या सर्व पिकांची लागवड कशा पध्दतीने करावी, याबाबतचे आराखडे सुचविण्यात आले आहेत. त्यामध्ये नारळ बागेमध्ये नारळापासून ६.५ फुटावर केळीची लागवड, दोन केळीच्यामध्ये अननसाची लागवड तर दोन केळीच्यामध्ये २ दालचिनीची झाडे, चार नारळाच्या मध्यभागी एक जायफळचे कलम आणि प्रत्येक नारळावर दोन काळीमिरी या प्रमाणे मसाला पिके तर नारळाच्या चार कोप-यांवर सुरणाचे एक झाड अशाप्रकारे एक एकर नारळाच्या बागेमध्ये लागवड केल्यास नारळाची-७o झाडे, केळी-२४६, अननस-३४oo, दालचिनी-२४६, जायफळ-५४, काळीमिरी-१४0 आणि सुरण-१२३ अशी एकूण झाडे बसतात.
हा आराखडा नवीन लागवड केलेल्या नारळ बागेबरोबरच योग्य अंतर ठेवलेल्या जुन्या नारळ बागेमध्ये वापरता येऊ शकतो. अशा प्रकारे लागवड केल्यास केळीची १.५ वर्षात , अननसाची २ वर्षात, दालचिनी व सुरण तिस-या, जायफळ आणि काळीमिरी ५ ते ६ वर्षांनी उत्पादन देतील. तसेच सर्वसाधारणपणे योग्य मेहनत घेतल्यास १० ते १२ वर्षांनी नवीन लागवड केलेल्या बागेपासून दरवर्षी एक लाख रुपये मिळविता येतील. अशा या 'लाखीबागेच्या' संकल्पनेच्या आराखड्याची कृषि विद्यापीठाने शिफारस केली आहे. याचा नारळ बागायतदारांनी जरुर विचार करून लागवड केल्यास ते आपले उत्पन्न निश्चितच वाढवू शकतात. अशा नारळ बागेत नारळ उत्पादनावर विपरीत परिणाम न होता नारळाचे ४0 टक्क्यांपर्यंत उत्पादन वाढल्याचे दिसून आले आहे. नारळाची काढणी: फळधारणेपासून ६ ते ७ महिन्याचे फळ शहाळ्यासाठी काढावे. तसेच सुक्या खोब-यासाठी ११ ते १२ महिन्याचे फळ काढावे. नारळ पाडप करणा-या कुशल मजूराकडून काढणी करावी.
संपर्क क्र. ९४२२४३१२४६
स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन
अंतिम सुधारित : 10/7/2020
विविध सरकारी क्षेत्रांमध्ये सरकारी सेवांचे वितरण अ...
भात रोपांचे वय आठ ते बारा दिवसांचे म्हणजे रोपे दोन...
कर्ण रोपण तंत्रज्ञान (Cochlear Implant) हे एक अत्य...
यावर्षी खरीप हंगामात उशिरा पाऊस पडल्यामुळे ब-याच क...