कलिंगड हे अत्यंत कमी कालावधीत, कमी खर्चात, जास्तीत जास्त नफा मिळवून देणारे वेलवर्गातले पीक आहे. त्याला उन्हाळ्यात भरपूर मागणी असते. आरोग्यवर्धक, व्याधीशामक, स्वदिष्ट असून जाम –जेली, सौस निर्मितीत उपयुक्त. सुकवलेल्या बिया आयुर्वेदिकदृष्ट्या गुणकारी आणि पौष्टिक असतात. त्यामुळे शेतकरी आता उच्च तंत्राद्यानच्या आधारे बाराही महिने हे पीक घेऊ लागलेत.
पूर्वी हे पीक फक्त नदीपात्रातील वाळूमिश्रित जमिनीत घेतले जात होते पण अलीकडे उत्तम निचर्याच्या, मध्यम भारी हलक्या पण सेंद्रिययुक्त जमिनीत हे पीक उत्तमरीत्या येते. याला २२ ते २५ अंश सें.ग्रे. तापमान उपयुक्त असून असून भरपूर सूर्यप्रकाश आणि कोरडे हवामान मानवते.
कलिंगडाची लागवड जानेवारीत करावी म्हणजे कलिंगडाची फळे ऐन उन्हाळ्यात एप्रिल-मे मध्ये बाजारात विक्रीसाठी तयार होतात.
कलिंगडाच्या अधिक उत्पादन देणाऱ्या आणि संकरीत अशा अनेक जाती आहेत. त्यातली शुगर बेबी हि २-२” किलो वजनाची फळे देणारी, अतिशय गोड, लाल आणि बारीक बियांची ११ ते १३ टक्के साखरउतारा असणारी हि जात विक्रीयोग्य आहे. फक्त ७५ ते ८० दिवसात हि फळं तयार होतात. अरका माणिक हि लम्बवर्तुळाकार पांढरट पट्टे असणारी ५ ते ६ किलो वजनाची फळं, गर्द लाल रवेदार गार आणि १२ ते १५ टक्के साखर असणारी हि जात वाहतुकीस आणि साठवणीस योग्य आहे हि १०० दिवसात तयार होते. असाही यामोटो हि जपानी जात ४ ते ७ किलो वजनाची फळे देणारी, ९० दिवसात तयार होणारी,गर गोड, बारीक बियांची उत्पादनक्षम अशी जात आहे.
या सुधारित जातींप्रमाणेच काही खाजगी कंपनीच्या संकरीत जाती भरपूर आहेत. त्या जातींचा अनुभव लक्षात घेऊन लागवडीसाठी निवड जरूर करावी. महिको, नामधारी, अमर सीड्स अशा खाजगी कंपन्यांच्या या अनेक जाती उपलब्ध आहेत. या संकरीत जातींची फळे सरासरी ४ ते ८ किलो वजनाची असून एकरी ३० ते ४० टन उत्पादनक्षम असतात.
जमीन पूर्वमशागत करून चांगली भुसभुशीत करून घ्यावी आणि २ अगर २” मीटर अंतरावर ट्रक्टरने सरळ सार्या सोडाव्यात आणि सरीच्या एका बाजूस पोटात ६० अगर ९० सें.मी. अंतरावर ओंजळभर उत्तम कुजलेले शेन खत आणि १० ग्राम ट्रायकोर्दर्मा आणि थोडेसे फोरेट मिसळून या मिश्रणाचे ढीग टाकावेत. याच वेळी मुठभर १९:१९:१९ हे मिश्र खत ही त्यात टाकावे आणि या टाकलेल्या ढिगाच्या ठिकाणी कुदळीने कुदळून छोटासा आळे टाईप आकार द्यावा. आणि मग या आळ्यात २”ग्राम कार्बेन्डॅझिम अगर १ ग्राम बाविस्टीनची प्रक्रिया केलेल्या कलिंगडाच्या ३ बिया विखरलेल्या स्थितीत टोकाव्यात आणि हलकेसे पाणी द्यावे. ठिबक असल्यास अतिउत्तम. दोन तीन पानांवर बिया उगवल्यानंतर काम्जोर्रोप काढून जोमदार अशी एक अगर दोन रोपे ठेवावीत. रूट ट्रेनरमध्ये वाढवलेल्या रोपाद्वारे लागवड केल्यास अतिउत्तम. लागणीच्या वेळी खत दिल्यानंतर १५-२० दिवसांनी पुन्हा १०-१५ ग्राम युरिया, १५ ते २० ग्राम सुफला द्यावा ३ मिली बोरॉन, ३मिलि कॅलसीयम, ३ मिली मोलीनम या सूक्ष्म अन्नाद्रावाची १ लिटर पाण्यातून फवारणी करावी. एकरी ७५० ते ८०० लिटर ग्राम बुटाक्लोर हे तणनाशक १०० लिटर पाण्यातून लागवडीच्या दुसर्या दिवशी फवारावे. त्यानंतर काही तन उगवलेच तर खुरपणी करावी. महिन्यांनी वेलीचे शेंडे खुडावेत. वेळ दान्डांच्या मधल्या भागात वळवावेत. ओलाव्याशी संपर्क येऊ देऊ नये. फळाखाली पाचट अंथरावे. फळे २-३ वेळा हलकेपणाने फिरवावीत. २-३ फळे वाढू द्यावीत. बाकीची काढून टाकावीत.
कलिंगडावर काला करपा, पानावरचे ठिपके, भुरी, केवडा हे रोग येतात यांच्या नियंत्रणासाठी मन्कोझेब २५ ग्राम, १० ग्राम कार्बेन्डॅझिम, मतेलक्ज़िउम २५ ग्राम ३० लिटर पाण्यातून फवारावे. फुलकिडे, मावा, पांढरी माशी, नागअली, फळमाशी या किडीच्या नियंत्रणासाठी १० मि.ली. कार्बोसल्फान १०लिटर पाण्यातून फवारावे. ४ टक्के निंबोळी अर्क फवारावा.
कामगंध सापळे वापरावे. फळाच्या देठजवळचे केस वाळणे,डबडब असा आवाज,कर्रकर्र असा आवाज, रंग बदलणे हि फळ तयार झाल्याची लक्षणे असतात. जातीनिहाय १८ ते २५ टनपर्यंत उत्पादन मिळते. दर चांगलाच मिळतो. एकरातून लाखभर उत्पादन मिळाल्याची अनेक उदाहरणे
माहिती लेखक: प्रल्हाद यादव
स्त्रोत - कृषी प्रवचने
अंतिम सुधारित : 8/19/2020
मध्यम, ओलावा टिकवून ठेवणारी; परंतु पाण्याचा निचरा ...
जमिनीत वाढणाऱ्या खोडाच्या टोकास सु. १मी. लांब, बिन...
द्राक्षास सर्वाधिक दर मुंबई बाजारपेठेत डिसेंबरमध्य...
या विभागात अंजीर या फळ पिकाविषयी माहिती दिली आहे.