অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

हुमणीचे एकात्मिक व्यवस्थापन

सततच्या बदलत्या हवामानामुळे, उन्हाळ्यात पडणारा अवकाळी पाऊस यामुळे हुमणी या किडीचा प्रादुर्भाव मागील दोन वर्ष पासून वाढत आहे. परिणामी प्रामुख्याने पीक उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट आढळून येते. ही कीड  पिकांच्या मुळांवर उपजीविका करते. महाराष्ट्रात प्रामुख्याने सोयाबीन, कापूस, ऊस, अद्रक व हळद या पिकांवर मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे.

ओळख

हुमणीचा प्रौढ मुंगेरा गडद विटकरी रंगाचे ते निशाचर निशाचर असतात. एक मादी सरासरी ६0 अंडी घालते. अंडी घालण्याचा कालावधी पावसाळा सुरू होताच सुरू होतो. अंड्यातून बाहेर पडलेली अळी ही अळी तीन वेळेस कात टाकते.

नुकसानीचा प्रकार

प्रथम अवस्थेतील हुमणीच्या अळ्या अंड्यातून बाहेर निघाल्यावर जमिनीतील कुजलेल्या सेंद्रीय पदार्थावर उपजीविका करतात. दुस-या व तिस-या अवस्थेतील अळ्या ऊस, सोयाबीन, कापूस, अद्रक व हळद या पिकांची मुळे खातात. त्यामुळे पिकांची पाने पिवळी पडून पीक दिवसात अळ्या जमिनीत ९0 ते १२0 सेंमी खोलवर कोष अवस्थेत जातात. कोषातून मुंगेरे निघून जमिनीतच राहतात आणि मे किंवा जूनच्या पहिल्या पावसात ते जमिनीतून बाहेर पडतात. सरासरी या किडीमेळे ५० टक्यापेक्षा ही जास्त नुकसान आढळून येते.

प्रसार

हलकी जमीन, कमी पाण्याच्या ठिकाणी ही कोड जास्त प्रमाणात आढळते. शेणखताच्या माध्यमातून या किडीचा प्रसार मोठ्या प्रमाणामध्ये शेतामध्ये होतो तसेच ही कोड जवळ-जवळ सर्व पिकांवर तसेच भाजीपाला पिकामध्ये जास्त प्रमाणात आढळून येत असल्यामुळे या किडीचा प्रसार जास्त प्रमाणात दिसून येतो.

जीवनक्रम

पहिल्या पावसानंतर मे किंवा जूनमध्ये प्रौढ भुगे सुतावस्थेतून कडुनिंबाच्या झाडावर होते. दुस-या दिवशी सूर्योदयापूर्वी मादी जमिनीमध्ये ७ ते १0 सेंमी. खोलीवर अंडी घालते. एक मादी ५0 ते ७0 अंडी घालते. अंडी ९ ते २४ दिवसांमध्ये उबतात. त्यातून अळी बाहेर पडते. दोनदा कात टाकून ५ ते ९ महिन्यांमध्ये पूर्ण वाढते. जमिनीत कोशावस्थेमध्ये जाते. १४ ते २९ दिवसांनी प्रौढ मुंगे बाहेर पडतात. प्रामुख्याने नोव्हेंबरडिसेंबरमध्ये प्रौढ निघतात. हे प्रौढ जमिनीमध्ये सुतावस्थेत राहून मेजूनमधील पावसानंतर बाहेर निघतात.

प्रौढ ४७ ते ९७ दिवसांपर्यंत या किडीचा अधिक प्रादुर्भाव होतो.

मे, जून, जुलै : प्रौढ सुतावस्थेतून निघतात व मादी अंडी घालते.

ऑगस्ट ते नोव्हेंबर : अळी पिकांची मुळे कुरतडून उपजीविका करते.

नोव्हेंबर : जमिनीत कोशावस्था. नोव्हेबर ते डिसेंबर: कोषातून प्रौढ भुगे निघतात.

जानेवारी ते मे : प्रौढ भुगे जमिनीमध्ये सुसावस्थेत राहतात.

नियंत्रण

एक अळी प्रती चौरस मीटर सरासरी २o अगर त्यापेक्षा जास्त मुंगेरे आढळल्यास पावसाळ्यात कडुनिंब अथवा बाभळीची पाने अर्धचंद्राकृती खालेली आढळल्यास नियंत्रणाचे उपाय योजावेत.

एकात्मिक व्यवस्थापन

● उन्हाळ्यामध्ये खोल नांगरट करावी.

● मे-जून महिन्यांत पहिला पाऊस पडताच मुंगेरे सूर्यास्तानंतर जमिनीतून बाहेर येऊन बाभूळ, कडुनिंब इ. झाडांवर पाने खाण्यासाठी व मीलनासाठी जमा होतात.

● झाडावरील मुंगेरे रात्री ८ ते ९ वाजता बांबूच्या काठीने झाडाच्या फांद्या हलवून खाली पाडावेत. ते गोळा करून रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून त्यांचा नाश करावा. या प्रक्रिया प्रादुर्भाव प्रक्षेत्रातील शेतक-यांनी सामुदायिकपणे केल्यास अधिक फायदा होतो.

● जोपर्यंत जमिनीतून मुंगेरे निघत आहेत, तोपर्यंत हा कार्यक्रम चालू ठेवावा.

● भुगे गोळा करण्यासाठी प्रकाश सापळ्यांचा वापर करावा. सापळ्यातील भुगे गोळा करून मारावेत. एक प्रकाश सापळा एक हेक्टर क्षेत्रास पुरेसा होतो. या उपायामुळे अंडी घालण्यापूर्वी मुंगेरेचा नाश होतो.

● झाडांवर सरासरी २० अगर त्यापेक्षा जास्त मुंगेरे आढळल्यास किंवा झाडाची पाने खालेली आढळल्यास मे-जूनमध्ये क्लोरप्पायरिफॉस (२० टक्के प्रवाही) २५ ते ३० मि.लि. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून झाडावर फवारणी करावी. फवारणीनंतर १० दिवस जनावरांना या झाडाची पाने खाऊ घालू नये.

● निंदणी आणि कोळपणीच्या वेळी शेतातील अळ्या वेचून नष्ट कराव्यात. शेतामध्ये वाहते पाणी द्यावे. त्यामुळे जमिनीतील अळ्या मरतील.

● जैविक नियंत्रणामध्ये परोपजीवी मित्रबुरशी मेटारायझीम अॅनीसोप्ली व सूत्रकृमी हे हुमणीचे नैसर्गिक शत्रू आहेत. त्यांचा वापर करून काही प्रमाणात हुमणीचे नियंत्रण करता येते.  जमिनीतून फोरेट (१0 टक्के दाणेदार) किंवा फिप्रोनिल (0.३ टका दाणेदार) २५ किलो प्रति हेक्टर या प्रमाणात द्यावे.  क्लोरपायरिफॉस (२0 टक्के प्रवाही) २५ ते ३0 मि.लि. प्रति १0 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

● शेणखतामार्फत हुमनीच्या लहान अळ्या व अंडी शेतात जातात त्यासाठी एक गाडी खतात १ किलो ४ टक्के मॅलॅथीऑन भुकटी टाकावी.


स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन

 

अंतिम सुधारित : 7/18/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate