उसाच्या वाढ्यांचा जनावरांच्या चाऱ्यासाठी म्हणून मोठ्या प्रमाणात वापर होतो. जनावरांसह दूधवाढीला वाढे शास्त्रीय दृष्टिकोनातून पूरक नसतात. वाढ्यांऐवजी चारा म्हणून "चारा कंद'चा वापर करणे शक्य आहे का, याची पडताळणी कृषी विभागाकडून प्रायो गिक तत्त्वावर केली जात आहे.
जनावरांना पारंपरिक खाद्यापेक्षा सकस आहार देण्याच्या उद्देशाने येथील कृषी विभागाने चारा कंद (फॉडर बीट) लागवडीचा प्रायोगिक प्रकल्प हाती घेतला आहे. जिल्ह्यातील सुमारे अडीचशे शेतकऱ्यांनी 6.27 हेक्टरमध्ये लागवड केली आहे.
या प्रकल्पांतर्गत जनावरे व पिकासं दर्भातील नोंदणी ठेवण्यात येत आहे. याकरिता कृषी विभागाकडून 180 रुपयांचे बियाणे देण्यात येते. शेतकरी कंपोस्ट खत, बुरशीनाशक, मजुरी खर्च, सिंचन खर्च स्वतः करतात. कृषी व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)अंतर्गत हा प्रकल्प कृषी विभाग राबवीत आहे.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश पाटील यांनी सांगितले, की उसाच्या शेतात जरी आंतरपीक म्हणून चारा कंदाचे पीक घेतले, तरी उसावरचा चाऱ्याचा ताण खूप प्रमाणात कमी होऊ शकतो.
1. क्षारपड क्षेत्रास उपयोग; सामू नऊ व जास्त असल्यास चांगले उत्पादन.
2. एका कंदाचे वजन दोन ते पाच किलो.
3. कंदातून बारा टक्के कॅल्शिअम, पाच ते सात टक्के फायबर मिळते
4. कंदाचे तुकडे करून अथवा वाळवून कुट्टी करूनही जनावरांना देता येते.
5. दिवसाला दोन ते अडीच किलो कंद जनावरांसाठी दिले जात आहेत
-----------------------------------------------------------------------------------------------
स्त्रोत: अग्रोवन २ मार्च २०१६
अंतिम सुधारित : 10/7/2020
भारतातील सुपरिचित वन्य गवतांपैकी हे एक गवत आहे. मै...
यंदा राज्यात पाऊस कमी झाल्याने शेतक-यांना व पशुपाल...
चारा पिकासाठी मक्याची पेरणी मार्च महिन्यात पूर्ण ...
मका हे पीक मुरघास बनविण्यासाठी चांगले आहे. त्याचबर...