অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

स्त्रियांसाठी शेतकरी क्षेत्र शाळा

स्त्रियांसाठी शेतकरी क्षेत्र शाळा

धर्मपुरी जिल्ह्यामधील कोट्टूर, सीरीयमपट्टी आणि ईचामपल्लम गांवांमध्ये टोमॅटो हे मुख्य नगदी पीक आहे. मोठ्या प्रमाणावर मजुरी लागणारे हे पीक, या गावांमध्ये रोजगाराचा एक स्रोत देखील आहे. या गांवांमधील शेतकरी खर्चिक बाह्य साधनांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहून टोमॅटोची लागवड करीत आहेत. रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा अंदाधुंद वापर करण्‍यात येत आहे, ज्‍याचे निष्‍पन्‍न उच्‍च उत्पादन खर्चात होते. या शेतक-यांना सर्वसाधारणतः पर्यावरणाला अनुकूल शेती पद्धतींचा अवलंब करता यावा, आणि विशेषतः उत्पादन खर्च कमी करता येण्यासाठी, त्यांना पर्यायी शेती पद्धतींमध्ये सक्षम बनविणे आवश्यक होते. ह्यासाठी शेतकरी क्षेत्र शाळा (FFS), एक शोध शिक्षण व्यवस्था सर्वात योग्य अशी सिद्ध झाली आहे.

प्रक्रिया

शेतीपर्यावरण व्यवस्था विश्लेषण

सहभाग घेणार्‍यांसाठी शिकण्याचा आणि अनुभवाचा आधार म्हणून 0.64 एकर आकाराचा एक सराव प्लॉट वापरण्यात आला. शेतकरी सराव, मानक, दीर्घकालीन प्रयोग आणि IPM विकल्पांसाठी प्रयोग आखून देण्यात आले. वाटाण्यासारखी आंतर-पिके आणि मका, झेंडू आणि बाजरीसारखी कड-पिके कीड व्यवस्थापन आणि अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत म्हणून लावण्यात आली.
या प्लॉट्समध्ये साप्ताहिक AESA निरीक्षणांच्या आधारे उप-समूहांमध्ये चर्चा घेण्यात आली, त्यामुळे अनुभवांची देवाण-घेवाण करता आली आणि निर्णय प्रक्रिया चांगली करता आली. पोषण व्यवस्थापन, कीटकांचे संग्रहालय, आच्छादन आणि पानांची भरपाई, यांवरील अल्प अभ्यास घेण्यात आले जेणेकरुन शेतक-यांना प्रत्यक्ष अनुभव घेता आला.

समूह गतिकी

संघ निर्मिती आणि समस्या निवारण कौशल्याचा विकास करण्यासाठी समूह गतिकी अभ्यास FFS प्रक्रियेचा एक भाग बनले. अनुभवांची देवाण-घेवाण करण्यासाठी FFS सहभागींनी गांवांमधील अन्य समूह बैठकांना उपस्थित राहून FFS मधील शिकण्याचे अनुभव कथन केले. FFS च्या समाप्तीच्या वेळी एका क्षेत्र दिवसाचे (फील्‍ड डे) आयोजन करण्यात आले ज्यामध्ये सहभागींनी जवळच्‍या पांच गांवांमधील टोमॅटो उत्पादकांसोबत त्यांच्या अनुभवांची देवाण-घेवाण केली.

पद्धती

रोपवाटिका निर्मिती

विशेषतः उंच वाफा पद्धतीने, रोपवाटिकांमध्ये टोमॅटोची रोपे तयार करण्यामुळे शेतक-यांना मातीतून उद्भवणार्‍या विषाणूंचा सामना करण्यात आणि सुदृढ रोपे तयार करण्यातील लाभ समजून घेणे शक्य झाले. रोपवाटिकांमध्ये ओळीने बी लावण्यामुळे तण योग्य प्रकारे काढणे शक्य होते.

अवरोधपिके आणि पकड पिकांचा वापर
टोमॅटो हे नेहमी एकमेव पीक म्हणून घेतले जात असे. FFS च्या आधी, शेतक-यांचे असे मत होते की आंतरपिके टोमॅटोशी स्पर्धा करतात आणि कीडीला आमंत्रण देतात. FFS मध्ये सहभागी असतांना, सहभागींना प्रथमच टोमॅटोमधील अन्य पिकांचे महत्व समजले, त्यामुळे त्यांचा गैरसमज दूर झाला. मका आणि बाजरी यांच्यासारख्या अवरोध पिकांनी पांढ-या माशीच्या कारवायांना अडथळ्याच्‍या स्‍वरूपात काम केले. पकड पीक म्हणून लावलेल्या झेंडूने अंडी घालण्यासाठी फळे पोखरणा-या प्रौढ कीटकांना आकृष्ट केले, आणि वाटाणा हा हल्लेखोरांसाठी अन्नाचा एक स्रोत बनला.

आच्छादनामुळे अनेकविध फायदे मिळतात

आच्छादनाचे लाभ समजून घेणे ही एक महत्वाची शिकवण ठरली. टोमॅटोच्या शेतात शेतीतील अवशेष जसे ऊसाचे पाचट, वापरता न येण्याजोगे भात्याण आणि नारळाची पाने यांचा वापर, आच्छादनासाठी करण्‍यात आला. शेतक-यांनी पाहिले की आच्छादन पद्धतीमुळे मातीतील आर्द्रता राखली गेली परिणामी -

  • या पिकाचे भरपूर नुकसान करणा-या लाल कोळी कीडीच्या प्रमाणात मोठी घट झाली
  • पाण्याच्या पाळ्या कमी झाल्या (3-5 दिवसांतून एकदाच्या ऐवजी 7 दिवसातून एकदा)
  • उत्पादन प्रचल जसे पानांची संख्या, झाडाची उंची इत्यादिंमध्ये 30 टक्‍के सुधारणा झाली.
  • तणाची वाढ रोखता आली.

आयपीएम

अनेक IPM पद्धती जसे पिवळा चिकट पिंजरा, फेरोमोन पिंजरा, पिटफॉल पिंजरा, ट्रायकोग्रामा अंडी परजीवी सोडणे, क्रायसोपर्ला परभक्षी, मिरची-लसूण अर्क फवारणी, लँटाना पानाचा अर्क, पंचगव्य, NPV, सुडोमोनास फ्लुरेसेन्स यांचा वापर ह्या पीक संरक्षणातील अन्य नवीन शिकवणी ठरल्या.

मुख्य निष्कर्ष

खर्च कपात

ठराविक बाह्य साधनांचा वापर कमी झाल्याने उत्पादन खर्च दर एकर रु.13,000 अशा मोठ्या प्रमाणात कमी झाला. स्वतःहून टोमॅटोची रोपे तयार करण्यामुळे शेतक-यांना रोपांवरील खर्च 68 टक्‍के कमी करता आला. खते आणि कीटकनाशकांवरील खर्च शेतक-यांच्या आधीच्या पद्धतीच्या तुलनेत 75 टक्के सारख्‍या प्रचंड प्रमाणात कमी करता आला. FFS प्लॉटवर तण काढण्याची आवश्यकता न राहिल्याने, मजुरीवरील खर्च 16 टक्‍के कमी झाला. खर्चातील एकूण कपात इतकी होती की त्यामुळे उत्पादन खर्च 29 टक्‍के कमी झाला.

IPM निर्णय –स्त्रिया बदल घडवून आणीत आहेत

कोट्टूरमध्ये विशेषतः कीड व्यवस्थापनाशी संबंधित शेतीबद्दलचे निर्णय नेहमी पुरुषच घेत असत. परंतु यावेळी, FFS मधून नव्याने मिळालेल्या ज्ञानाच्या आधारे स्‍त्री-सहभागींनी त्यांच्या शेतात पर्यायी पद्धतींचा अवलंब केला आहे त्यामुळे यापूर्वी टोमॅटो पिकाचे प्रचंड नुकसान करणा-या लाल कोळी कीडीचा प्रादुर्भाव कमी होण्यासारखे फायदे झाले. हे फायदे पाहिल्यानंतर, घरातील पुरुषमंडळी, सुरुवातीला जरी साशंक होती तरी, टोमॅटोच्या लागवडीत IPM वरील स्त्रियांचे निर्णय स्विकारु लागली आहेत. दुसरीकडे, त्यांना या ही गोष्टीचा आनंद झाला की ते खर्चिक रसायनांवर पैसे वाचवू शकले. स्त्रियांनी ह्या सत्रांना नियमितपणे हजर राहावे म्हणून पुरुष त्यांना प्रोत्‍साहन देत आहेत. आता, स्त्रियांना आनंद झाला आहे कारण FFS ने त्यांना वाढीव ज्ञानाच्या पातळीद्वारे शेती उत्पादनात सकारात्मक वाटा उचलण्‍यास सक्षम बनविले आहे. आणि, पुरुषांना याची जाणीव होऊ लागली आहे.

तुलनात्मक खर्च आणि लाभ (दर एकर)

क्र.

घटक

अधिरेषा

FFS प्लॉट

फरक (%)

1

उत्पादन खर्च

जमिनीची तयारी

2200

2200

-

साहित्य

12000

12000

साधने (रोपे, सेंद्रीय खते, खते आणि कीटकनाशक)

15590

5125

67%

मजुरी

15860

13260

16%

एकूण

45650

32585

29%

2

उत्पादन

18420

17800

-3%

3

एकूण उत्पन्न

230250

222500

-3%

4

निव्वळ उत्पन्न

184600

189915

3%

वाढीव उत्पन्न

उत्पादन खर्च कमी झाल्याने आणि हंगामात शेतातच जागेवर मिळणा-या उच्च दरामुळे शेतक-यांना दर एकर रु. 5315 चा वाढीव फायदा झाला. रासायनिक शेती ते LEISA पद्धतीत बदल केल्याच्या पहिल्याच वर्षात, उत्पादनात दर एकर 620 किलो घट झाली तरी ही 3 टक्के वाढ झाली.

शेतक-यांचा नवीन उपक्रम – पिवळ्या चिकट पिंज-याला एक स्थानिक पर्याय

पिवळा चिकट पिंजरा म्हणून नारळाच्या करवंटीचा वापर करण्‍यात आला

सहभागींनी पिवळ्या चिकट पिंज-याला एक कल्पक पर्याय शोधून काढला. नारळाच्या करवंट्या आणि शेंड्या गोळा करण्यात आल्या, त्यांना पिवळा रंग देण्यात आला आणि त्यांना बाहेरुन एरंडेल थापून कीड पकडण्यात आली. कीड्यांना प्रभावीपणे पकडता यावे म्हणून दर 3-4 दिवसांनी एरंडेल लावण्यात आले.

पर्यावरण व्यवस्थेच्या जतनाबाबत तरूणांना प्रेरणा देणे

पर्यावरण व्यवस्थांच्या अंतर्गत असलेले संबंध समजून घेण्यामध्ये मुलांना मदत करण्याचा हा एक आगळा अनुभव होता. मुले, त्यांच्या मोकळ्या वेळात, ठराविक FFS कार्यांमध्ये गुंतलेली होती. शेतीचे निरीक्षण, तक्ते तयार करणे आणि ते सादर करणे यांसारख्या कार्यांमध्ये त्यांनी उत्साहाने भाग घेतला. पिके, कीड आणि त्यांचा संबंध, यांच्याबाबत नवीन माहिती घेतलेल्या या तरूण मुलांनी, आपले हे ज्ञान त्यांच्या शाळेतील शिक्षक आणि अन्य मुलांना दिले.

स्रोतः AME प्रतिष्ठान

अंतिम सुधारित : 4/29/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate